तू आणि ती

Submitted by shuma on 16 October, 2012 - 02:14

तू काय किंवा तुझी आठवण काय
तुम्ही दोघेही आयुष्यात पुरते मुरलायत माझ्या
एखादं लोणचं मुरावं ना अगदी तस्सं!

विचार न करताही अधुन मधुन
डोकावत असता अनाहूत पणे
आणि संदर्भारहित हिंडत रहाता
माझ्या विचारांच्या वर्दळीत

कुठलंही पान उघडा आठवणींचं
आयुष्याच्या पानापानांतून
जपलेल्या गुलाब पाकळीगत
गळून पडता माझ्या समोर टपकन

आणि मी देखिल वेडी मग
भान हरखून निरखत बसते तुम्हाला
मला समोर दिसत असते फक्त एक
ताजी टवटवीत गुलाबाची पाकळी
न वाळलेली.........

कदाचित अगदी कधीच न वाळणारी....???

शमा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"विचार न करताही अधुन मधुन
डोकावत असता अनाहूत पणे
आणि संदर्भारहित हिंडत रहाता
माझ्या विचारांच्या वर्दळीत" >> अगदीच!!

आवडली कविता!

आवडली !