मनासारखं

Submitted by पल्ली on 15 October, 2012 - 04:29

माणसानं च्यायला अगतिक होउ नये...
आपण किती दु:खी आहोत ह्याची खात्री व्हायला लागते...
तरी होतंच मन अगतिक...
बिच्चारं.... भिकारडं....
अगदी चहाच्या कपाबाहेर सांडलेला सुखाचा थेंबही
चाटून घेतं....
इकडं तिकडं सांडलेली दुखर्‍या मनाची
सडलेली घाण पुन्हा पुन्हा
लाडक्या रुमालानं पुसत बसतं....
ह्या मनाला काही कळतच नाही.
नको म्हणलं तरी तेच करतं.
कर म्हणलं तरी तेच करतं!
व्यवहार, योग्य - अयोग्य
नादान मनाला काहीच कळत नाही.
अर्धवट जळालेल्या झाडातही
ओळखीचा सुगंध हुंगत फिरतं....
मन सालं फारच मनासारखं वागतं.............

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी चहाच्या कपाबाहेर सांडलेला सुखाचा थेंबही
चाटून घेतं....

मन सालं फारच मनासारखं वागतं..

ह्या दोन ओळी फार आवड्ल्या.