काही 'दीडोळ्या ' (दीड ओळी)

Submitted by वैवकु on 13 October, 2012 - 04:25

कुठे जायचे हे कळाले न तेंव्हा
पुढे जात गेलो

पहा मी कसे एकवटले किनारे
प्रवाहात गेलो

नशीबात माझ्या जरी चाल न्हव्ती
तरी गात गेलो

मला एकटेपण नको वाटले अन ;
समाजात गेलो

म्हणे आत अपुल्या विठू राहतो तो
किती आत गेलो

________________________-

अनेक दिवसापूर्वी एकदा सहज सुचला म्हणून हा काव्यप्रकार करून पाहिला आहे .पहिल्या ओळीत प्रस्तावना ;मग अर्ध्या ओळीत समरोप केलाय. पहिल्या ओळीत एक वृत्त घेतले अन नन्तरच्या ओळीत त्याच्या अर्धे केले (एक+अर्धे =दीड ; म्हणून दीडोळी!!)

गझलेप्रमाणे काफिया रदीफ पाळले आहेत ( प्रस्तुत रचनेत मतल्यासारखा प्रकार ठेवलेला नाही आहे हवा असेल तर तसेही करता येवू शकेल )

हा प्रकार आवडल्यास जरूर कळवणे ही विनन्ती

आपला नम्र
-वैवकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रस्तुत रचनेत मतल्यासारखा प्रकार ठेवलेला नाही आहे हवा असेल तर तसेही करता येवू शकेल )

मतला कसा, कुठे ठेवणार? पहिल्या मोठ्या ओळीच्या शेवटी?

येस
शेवटी ही सगळी हातचलाखी असते .......... शब्दान्च्या विशिष्ट मांडणीतून वाक्ये अन वाक्यांच्या विशिष्ट मांडणीतून कडवी अन कडव्यान्मधून कविता करायची असते
आजकाल कडवी २/३ /४/५ ओळींची असतात
एका कडव्यात एक कविता हाच फोर्मेट हायकू /अभंग /ओवी/ त्रिवेणी / शेर / चारोळी यात सहसा पाळलेला आढळतो
मी ही हीच चालाकी वापरली आहे

धन्यवाद आंबा
_______________

मतलासदृश्य काही हवे असेल तर तो सुरुवातीसच असायला हवे !
(मतला = वृत्त +काफिया[अलामतीसह] +रदीफ ...म्हणजेच 'जमीन' स्पष्ट करणारा गझलेचा पहिलाच शेर )

ते माहीत आहे. मला म्हणायचे आहे, दोन कवाफी कुठल्या कुठल्या ओळीत ठेवणार?

---------------------
--------- >>>>>
----->>>>>

म्हणजे असे का? >>>> म्हणजे कवाफी / कवाफी + रदीफ

की असे,

------- >>>>>>>>>>
------------------------
---->>>>>>>>>>>

पहिल्या ओळीत काफिया + रदीफ असेल खालच्या ओळीतही असे आणता येईल

म्हणालो तुला ते खरे वाटले ना ??
बरे वाटले ना ??

आता या जमीनीची दुसरी दीडोळी

क्षितीजापुढे फक्त आकाश आहे !!
धरे.....; वाटले ना??

-वैवकु
_________________________________________

पहिल्या ओळीत काफिया दुसरीत रदीफ असे ही करता यईल खालील उदाहरणात वर काफिया खाली अ़ख्खी रदीफ बसवली आहे

मला वाटते ते तुला वाटतेका
खरे सान्ग देवा !!

दुकाळात माणूसकी आटतेका
खरे सान्ग देवा !!

नभी मेघ येता मनी दाटते! का?
खरे सान्ग देवा !!

-वैवकु

अशा प्रकारात प्रत्येक दीडोळी जमीनीची होवून गेली आहे .हे विशेष............

___________________________

वर सादर केलेल्या रचनेत काफिया रदीफ खालच्या ओळीत आले आहेत तिथेही प्रत्येक दीडोळी जमीनीची होवून जातेय .........

कुठे जायचे ते कळाले न तेन्व्हा
पुढे जात गेलो

पहा मी कसे एकवटले किनारे
प्रवाहात गेलो

म्हणे आत अपुल्या विठू राहतो तो
....किती आत गेलो

-वैवकु
__________________________________
अजून वेगवेगळे प्रकार ट्राय करायला हवेत नै ?? !!!

धन्यवाद !!

कुठे जायचे हे कळाले न तेंव्हा पुढे जात गेलो
पहा मी कसे एकवटले किनारे प्रवाहात गेलो

नशीबात माझ्या जरी चाल नव्हती तरी गात गेलो
मला एकटेपण नको वाटले अन समाजात गेलो

म्हणे आत अपुल्या विठू राहतो तो किती आत गेलो
(इथे एक ओळ कमी पडते)

>>>>>>>>>>>>>> असे केल्यास द्विपदी संरचनेची कविता किंवा गझलही होतेच. केवळ द्विपदीतील दोन ओळी स्वतंत्र केल्या आहेत असं वाटलं.
माझ्या मते बेफिजींच्या 'शेवटची बस..' प्रमाणे यमकमुक्त असावे किंवा प्रत्येक यमक त्या-त्या कड्व्यात साधला जावा. म्हणजे - 'लगागा लगागा लगागा तगेलो, लगागा तगेलो' - असं काहीसं. असे केल्याने ती ती द्विपदी स्वतःत 'पूर्ण' होईल आणि पुढील द्विपदींतील यमक वेगले असल्याकारणाने सर्वान्ना स्वतन्त्र अस्तित्व लाभेल. मग म्हणता येईल की 'दीड ओळीचं कडवं' आहे.

नशीबात माझ्या जरी चाल न्हव्ती
तरी गात गेलो

मला एकटेपण नको वाटले अन ;
समाजात गेलो<<<

छानच

प्रयोग चांगला आहे,रसप म्हणतात तोही एक दृष्टीकोन ठेवला तर वेगळी गंमत आहे. कवी/गझलकार अभिव्यक्तीच्या कॅलिडोस्कोपमध्ये आशयाचे आकार बदलत रहातो.. सौंदर्यपूर्ण अनुभूती/ विषयविस्तार हा परिणाम साधण्यासाठी.

ही हातचलाखी असली तरी सुग्रणीच्या स्वयंपाकासारखी. Wink

खूप शुभेच्छा.नवनवीन नवनवोन्मेषांसाठी.

जितू ,उकाका ,बेफीजी ,भारतीताई, प्रतिसादासाठी मनःपूर्वक आभार

जितूभाय:
१)तू म्हणतो आहेस तसा दोन दीडोळ्या एकत्र करून शेर होतो आहे ते बरोबर आहे .........कारण माझ्या हातून त्या बर्‍यापैकी मुसलसल झाल्या आहेतHappy

२)यमकाबाबत तुझे मत योग्यच ........पण मी आकृतीबन्ध ठरवताना गझलेप्रमाणे यमक स्वरचिन्ह व अन्त्ययमक असा प्रघात ठेवला आहे
..........दीडोळीच्या निर्यमकतेबद्दल मी नक्कीच विचार करीन !!(तू खूप मस्त मुद्दा दिलाय्स यार!!धन्स रे) ..........तसेच अलामतविरहीत यमकाचाही विचार मी करणार आहे.
...........अक्षरछन्दान्चाही विचार मी करतो आहे!

३) आता सकृतदर्शनी वर सादर केलेल्या दीडोळ्यामध्ये (मूळ रचना व माझे प्रतिसाद !)ज्या अभिव्यक्तीच्या त्रुटी जाणवत आहेत त्या माझ्या शायरीच्या सुमार कूवतीमुळे राहिल्या आहेत. त्यासाठी क्षमस्व!!
........एकूण दीड ओळीन्च्या या माण्डणीत दोष नक्कीच नहीयेत असे मी अत्यन्त विशवासपूर्वक /खात्रीलायकरित्या सान्गू इच्छितो!

धन्यवाद
सर्वान्चे पुनश्च आभार
-वैवकु