उत्साहपूर्ण जगण्याने जगणेही उत्सव होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 October, 2012 - 23:36

गझल
उत्साहपूर्ण जगण्याने जगणेही उत्सव होते!
माणूस असा असला की, असणेही उत्सव होते!!

एकेक थेंब अश्रूंचा, होवून गझल, ओघळला.....
हे असेच एखाद्याचे रडणेही उत्सव होते!

ती पणती... विझता विझता, उजळून घराला गेली.....
ते बघून मजला कळले...विझणेही उत्सव होते!

ते फूल आगळे होते, दरवळले सुकतानाही;
शिकवून जगाला गेले....सुकणेही उत्सव होते!

भरडणे कुणाला चुकले? कोणाला घरघर चुकली?
पण गात गात दळल्याने, दळणेही उत्सव होते!

तो सूर्य असो वा ठिणगी, कंदील असो वा पणती;
अंगात आग असली की, जळणेही उत्सव होते!

विजयाची असते तैशी, हरण्याची धुंदी असते!
विजयाचा उत्सव होतो! हरणेही उत्सव होते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्साहपूर्ण जगण्याने जगणेही उत्सव होते!
माणूस असा असला की, असणेही उत्सव होते!!

खूप परिणामकारक मतला वाटला नाही. खासकरून दुसरी ओळ तर काहीच विशेष 'बोलत' नाही.

एकेक थेंब अश्रूंचा, होवून गझल, ओघळला.....
हे असेच एखाद्याचे रडणेही उत्सव होते!

हा एकच खयाल कमी-अधिक फरकाने आपल्या जवळजवळ प्रत्येक गझलेत वाचावयास मिळतो. बुळबुळीत शेर वाटला हा.

ती पणती... विझता विझता, उजळून घराला गेली.....
ते बघून मजला कळले...विझणेही उत्सव होते!

'ती' म्हणजे कोणती ? 'ती' आणि 'ते' हे दोन्ही शब्द पूर्णपणे अनावश्यक वाटले. शेराचा आशय आवडला. पण त्या आशयाला 'ती' व 'ते' कुठलाही विशेष हातभार लावत आहेत, असं मला वाटलं नाही.

ते फूल आगळे होते, दरवळले सुकतानाही;
शिकवून जगाला गेले....सुकणेही उत्सव होते!

इथे 'ते'ला काही तरी संदर्भ मी देऊ शकलो. 'ते फूल'चा रोख 'बकुळी'कडे असावा. बकुळीच्या फुलांचा फूल वाळल्यानंतर वास येतो, असं मी ऐकलं आहे. शेर आवडला.

भरडणे कुणाला चुकले? कोणाला घरघर चुकली?
पण गात गात दळल्याने, दळणेही उत्सव होते!

हा शेर ठीक वाटला.

तो सूर्य असो वा ठिणगी, कंदील असो वा पणती;
अंगात आग असली की, जळणेही उत्सव होते!

सुंदर शेर. ह्या गझलेत सर्वात जास्त आवडलेला शेर. पण इथेही 'तो' काही विशेष हातभार लावतो आहे, असं वाटललंनाही.

विजयाची असते तैशी, हरण्याची धुंदी असते!
विजयाचा उत्सव होतो! हरणेही उत्सव होते!!

इथे मला 'तैशी' हा शब्द खटकला. कृत्रिम वाटला. मी 'विजयाची मस्ती असते, हरण्याची धुंदी असते' असं वाचून पाहिलं.

बेफि, डिफेन्स जमत असेल तरच असे बोला.. हसणेही उत्सव होते पण त्याचे समर्थन , स्पष्टीकरण किंवा नुसतेच वरण तरी करता यायला हवे,
एकंदर आपण वापरत असलेले शब्द आणि चित्रमुद्रा यांचा अनन्वय आपणास स्पष्ट करता यायला हवाच,
वेळ असो वा नसो पण हे मस्टच आहे. नाहीतर अर्थानकलनाने शायर तोंड विटाळून घेऊ शकतात.
,,,,,,

देवपूरकर गझल नाही आवडली.
आपल्या जेष्ठत्वाचा आदर बाळगून एवढेच म्हणू शकतो की, खूपच भंगार लिहू लागला आहात.
स्पष्टीकरण द्यायला मी बांधील नाही. आणि वेळही नाही.
बाकी तुमचा रतीब चालू द्या!

पु.ले.शु!
..............................शाम

रणजीता!
प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
ज्या गांभिर्याने तू गझला वाचू लागला आहेस, त्याचा आम्हास आदर वाटतो!

शेर नं. १......माणूस असा असला की, म्हणजे कसा?.....उत्तर पहिल्या ओळीत दिसेल. एखाद्या माणसाचे व्यक्तीमत्व, स्वभाव, वर्तन असे असते की, तो सभोवताली प्रसन्नताच उत्सर्जीत करतो. हा त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या असण्याचा एक अभिनव उत्सवच असतो!
वरील अर्थ वाचल्यावरही जर तुला आमची दुसरी ओळ अबोल व तोकडी वाटत असेल तर पहिली ओळ कायम ठेवून ताकदीचा बोलका पर्यायी मतला सुचव. वाचायला आवडेल!

शेर नंबर २.......... निव्वळ हाच शेर कुणासमोरही पेश करून पहा. उत्तर तुला मिळेल.
खयालांची वारंवारता कधी कधी होवू शकते. पण याच खयालांची आमच्या अन्य शेरांची उदाहरणे दिलीस तर आम्हाला आमचे खयाल तपासून घेण्यास मदत होईल. माझे लेखन मधे आमच्या तमाम गझला आहेत.
अर्थात तुझ्याकडे तेवढा वेळ व इच्छाशक्ती असेल तर हो!
अन्यथा हा तुझा प्रतिसाद जुजबी व घाऊक आहे समजून आम्ही सोडून देऊ!
टीप: हा शेर जर बुळबुळीत असेल तर त्याला पर्यायी गुळगुळीत शेर दे.

शेर नंबर ३.........ती व ते आम्हास अनावश्यक वाटले नाहीत. तुला जर तसे वाटत असतील तर ते काढून हाच आशय व्यक्त करून दाखवावे!

शेर नंबर ४........नशीबच म्हणायचे आमचे!

शेर नंबर ५...............ठीकठाक वाटले

शेर बर ६............आहो भाग्य!

शेर नंबर ७............
इथे कुठलीही मस्ती, माज, मिजास वगैरे अर्थ अपेक्षित नाही.
इथे उत्सव व त्याचा कैफ हे शेराच्या गर्भस्थानी आहे.

टीप: रणजीता! नुसत्याच चित्रविचित्र मुद्रांऎवजी किंवा बिनबुडाच्या, पायकाढू, पवित्रेबाज व अतार्किक शे-यांऎवजी तू मनमोकळा प्रतिसाद दिलास त्याचा आम्हास आनंद व आदर वाटतो!

.............प्रा.सतीश देवपूरकर

शाम,
भंगा-याला चहूकडे भंगारच दिसते!
(भले तो महालातही का जाइना!)

श्वासांचा कुठे रतीब असतो काय?

गझल हृदयामधे माझ्या! गझल श्वासांमधे माझ्या!
गझल मी रोज अंथरतो, गझल मी रोज पांघरतो!!

टीप: सात्विक संतापाचा बोंबायुक्त आकांत पोचला!
चित्रदर्शी छद्मीपणाही पोचला!

...........प्रा.सतीश देवपूरकर

>>>भंगा-याला चहूकडे भंगारच दिसते!
(भले तो महालातही का जाइना<<<

वर्ग पाचवा, तुकडी क मधे आहात काय? तुमची ही गझल = महाल?? तुम्हाला 'ग' ची बाधा झाली आहे असे वाटते.

ह्रदयात, श्वासांत, अंथरुणात, पांघरुणात ढेकणांप्रमाणे गझला झाल्यामुळे असे त्रास संभवतात. औषधे वेळेवर घ्या.

भंगा-याला चहूकडे भंगारच दिसते!
(भले तो महालातही का जाइना!) >>>>> आत्ता कुठे वळणावर आली गाडी.

"भंगा-याला" हा शब्द प्रथमच वाचनात येत आहे.. भंगार घेणार्‍याला भंगारी म्हणतात का?
म्हणजे आमच्याकडे भंगारवाला म्हणतात म्हणून विचारले....असो.

पण शायर महोदय, पडलेले भंगार आहे हे समजणार्‍याला भंगारी कसे म्हणता येईल , आणि असे असेल तर सगळीच माणसे भंगारी आहेत असे म्हणावे लागेल.. काय?

आणि तसेही मी तुमचे भंगार घेतेलेलेच नाहीये.. बाय द वे... मी खरोखरच काही काळ हा व्यवसाय (भंगाराचा) केलाच असल्याने आपल्या गौरवोद्गाराने कृतकृत्य झालो आहे.

मायबोलीसारख्या साहित्यसमृध्द महालात आपण आणलेले भंगार मी ओळखू शकलो याचा मला मनोमन आनंद होत आहे.........

जय हरी!

खवटुन्निसा,
आपल्या नावास साजेसा आपला प्रतिसाद वाचला.
आमची गझल महाल वगैरे आहे असा भ्रमिष्ट निष्कर्ष आपण काढलात की, काय?
धन्य! धन्य!
आहो तो काय आमचा शेर वाटला काय आपल्याला?, काहीही असे त्यावर बरळायला!

आम्हास ‘ग’चीच काय, कोणत्याही मुळाक्षराची बाधा झालेली नाही.
मेंदूत बिघाड झाला असल्यास त्वरीत तपासण्या करून घ्याव्यात, म्हणजे काहीच्या काही बरळावासे वाटणार नाही.

बाकी, आपल्या एकंदर गझलविषयक अभिरुचीवरून, आपल्या सौंदर्यबोधाला दाद मात्र द्यायला हवी हो!

टीप: वर्ग/इयत्ता (आयुष्याचा/ची).........५८
तुकडी........'अ’मधे आहोत आम्ही.
(अ तुकडी कधीच सोडली नाही अजून आम्ही!)
आम्ही काहीही दडवत नाही!

जे पाहिजे तुला ते, तू वाच पान माझे......
पुस्तक तुझ्याचसाठी उघडे सताड आहे!

..........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

शाम,
सरळसोट चालणारी गाडी आहे आमची, आडवळणांनी चालणारी नव्हे!

रंग देणारा.............रंगारी
भंगार घेणारा.............भंगारी
भले त्याला भंगारवाला म्हणा, अर्थ काही बदलत नाही.

कोणतीही वस्तू भंगार आहे की, नाही हे त्या वस्तूच्या मालकावर अवलंबून असते.
घटकाभर समजू या की, ती वस्तू भंगार आहे, तरी ते भंगार
भंगा-याला/भंगारवाल्याला द्यायचे की, नाही हे तो तो माणूस ठरवणार, भंगारवाला नव्हे.
भंगारवाल्याचे काम असते, दिलेले भंगार घेणे, ते देखिल वाजवी दाम मोजून!

तेव्हा भंगार आहे किंवा नाही, हे भंगारवाला ठरवूच शकत नाही

कोण कुणाचे भंगार घरात आणून अडगळ का निर्माण करेल?
शिवाय एखादी वस्तू एखाद्यास भंगार वाटेल, पण दुसरा त्याच भंगार वस्तूचा असा काही कुशल वापर करेल की, त्या वस्तूला कुणी भंगार म्हणूच शकणार नाही.

आता कोण भंगार देणारा व कोण भंगार घेणारा, हे ज्याचे त्याने ठरवावे!
कोणत्याही व्यक्तीला वा वस्तूला भंगार असे कायमचे लेबल कुणी लावूच शकत नाही.

तसेही भंगारवाल्यांना आम्ही आमच्या आसपास देखिल फिरकू देत नाही.
तेव्हा सोने असो, लोखंड असो, किंवा प्लास्टिक, ते आम्ही योग्य माणसालाच देऊ, भंगारवाल्याला तर निश्चीतच नव्हे!

तेव्हा तू भंगार घेतोस की, सोने, याच्याशी आमचे काहीच देणेघेणे नाही.

ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे व पुण्याईनुसार ज्याचा त्याचा व्यवसाय व आयुष्य परमेश्वराने आधीच लिहून ठेवलेले असते. इथे कुणीही कुणाचा गौरव वा उपमर्द करण्याचा, कृतकृत्य होण्याचा वा न होण्याचा प्रश्नच येत नाही

मात्र तुझ्या भंगारपारखी नजरेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे हो!

शेवटी आपापल्या पिंडानुसार/ अभिरुचीनुसार, मनुष्य आयुष्यात काही गोष्टी वेचतच बसतो ना!

टीप........मायबोलीच्या साहित्य समृद्ध महालात आपण कुठे बसतो ते ज्याने त्याने बघावे, आनंदी वा दु:खी व्हावे.
शेवटी जाता जाता इतकेच सांगतो की, कुठलेही काम असू द्या, आम्ही त्याला कमी लेखत नाही, कुठल्याही माणसांना तर नाहीच नाही!

श्रीहरी! श्रीहरी! श्रहरी!

.............प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................

देवपूरकर सर, गझल आवडली. आपला अभ्यास दांडगा आहे. माझ्याही दोन गझल मी टाकलेल्या आहेत. त्यांचं परखड परिक्षण करता आलं तर पहावं. थोडा त्रास देत आहे त्याबद्दल क्षमस्व !!

टीप: सात्विक संतापाचा बोंबायुक्त आकांत पोचला!
चित्रदर्शी छद्मीपणाही पोचला!<<< Lol

प्रोफेसर साहेब,

वरील रचनेला गझल म्हणवत नाही. म्हणायला गेलोच तर अतिशय सामान्य गझल म्हणावी लागेल. ती असामान्य करून दाखवण्याचे आव्हान पेलणेही इथे अनेकांना शक्य आहे पण वेळ नाही. पण समजा एखाद्याने आव्हान पेलले आणि याच जमीनीत हेच काफिये अगदी याच क्रमाने वापरून सदर रचनेपेक्षा सरस गझल केलीच तर त्याच्या गझलेत कश्या चुका आहेत हे दाखवणे पुन्हा आपल्याला शक्य आहेच. त्यावर पुन्हा सगळे आपल्याला जाहीरपणे सांगतील की तुमच्या गझलेपेक्षा हीच गझल चांगली झालेली आहे. त्यांच्याशी तुमचा वाद सुरू होईपर्यंत तुमच्या आणखीन तीन गझला मायबोलीवर प्रकाशित झालेल्या असतील आणि तुम्ही मागच्या तीन गझलांच्या तुमच्या प्रतिसादांवर आणि पुढच्या तीन गझलांवर त्याच माणसाकडे प्रतिसाद मागत असाल ज्याने या रचनेबरहुकून एक गझल सध्या केलेली आहे.

मी एकदा मनात असा विचार करून बघितला की हा गृहस्थ रोज एक गझल प्रकाशित करत असल्याने तर आपल्याला या गझलांनी पकल्यागत वाटत नसेल? मग एक एक गझल स्वतंत्रपणे मनात घोळवली, जे करणेच योग्य आहे हे कृपया सांगू नका, तुमच्या आयुष्यात अजुन कोणी २४ तासाला एक अशी दहा शेरांची नवी गझल अव्याहतपणे २६ आठवडे दिलेली नसेल.

तुम्ही आत्ममग्न आहात. तुमच्या शरीराची त्वचा ही तुम्ही तुमची मर्यादा बनवली आहेत. तीबाहेर जग वसते हे तुम्हाला ज्ञात असूनही मान्य करायचे नाही असे दिसत आहे. पण म्हणताना म्हणाल, आमच्या गझलेच्या ध्यासाला विश्वातील ते बिंदूही वर्ज्य नाहीत जे अजून स्वतः विश्वनिर्मात्यालाही ठाऊक नाहीत वगैरे!

>>>ती पणती... विझता विझता, उजळून घराला गेली.....
ते बघून मजला कळले...विझणेही उत्सव होते!<<<

या शेरात मधल्या ठिपक्यांना काही अर्थ आहे का? असो! मला हेही सांगू नका की गझलेत पणती म्हणजे पणतीच असते असे नाही वगैरे. पणती ही आयुष्यभर कुटुंबासाठी राबणारी आजीही असेल वगैरे! पण दुसरी ओळ निव्वळ आधीच्या ओळीत ओतलेल्या डांबराचे सपाटीकरण आहे. ही ओळ अन हा शेर भटांनी पाहिला असता तर त्यांनी या शेराची पिसे काढली असती.

>>>ते फूल आगळे होते, दरवळले सुकतानाही;
शिकवून जगाला गेले....सुकणेही उत्सव होते!<<<

केविलवाणा शेर आहे. २५ % भागात फूल आगळे असल्याचे कळते, २५ ते ५० % भागात ते सुकतानाही दरवळल्याचे कळते, ५० - ७५ % भागात ते जगाला शिकवत असल्याचे कळते आणि ७५ - १०० % भागात ते सुकणेही उत्सव होते हे कळते.

इतक्या मात्रा खरच लागतील का हो हा विचार लिहायला प्रोफेसर साहेब?

सुकतानाही फूल दरवळत वदले ( / म्हटले)
माझ्या सुकण्याचाही उत्सव होतो

>>>तो सूर्य असो वा ठिणगी, कंदील असो वा पणती;
अंगात आग असली की, जळणेही उत्सव होते!<<<

शेरात जे सांगायचे आहे ते दुसर्‍या ओळीत १०० % सांगून झालेले आहे. आता तुम्ही म्हणाल सूर्य, ठिणगी, कंदील व पणती यातील सूक्ष्म छटाफरक व त्यानुसार येणारे भावार्थाचे विविध पदर लक्षात घेतले नाहीत तर हा शेर आस्वादताच येणार नाही वगैरे! पण आहे काय आस्वादायला त्यात?

सूर्य, ठिणगी, कंदील व पणती यांच्या अंगात आग असल्याने त्यांचे जळणे उत्सव होते म्हणजे काय बुवा? पूर्वी सती जायच्या बायका, त्यांचेही जळणे त्या काळात उत्सव ठरायचे. एक वरिष्ठ व अनुभवी गझलकार या नात्याने त्या विषयाला स्पर्श करून हा शेर अधिक भारदस्त का नाही म्हणे बनवलात? सूर्य आणि कंदील काय हो, नेहमीचेच झाले की आता? हां! आता सूर्य म्हणजे सूर्य, ठिणगी म्हणजे क्रांतीची, समाजसुधारणेची, कंदील म्हणजे दिशादर्शनाचा, पथदर्शनाचा आणि पणती म्हणजे ज्ञानार्जनाची असे म्हणूनही वेळ नाही मारून नेता येणार. कारण या सर्वांचे जळण उत्सव असते हे एक सपाट विधान होईल. या खयालाचा गझलेचा शेर करायची गरजच काय? ती डफ वाजवून गायची शाहिरी होईल, जी जी जी रं जी जी सारखी! जोमदार शब्दांच्या योजनेने गझलेचा शेर होत नाही, उगाच ठिणग्या, सूर्य वगैरे घेऊन काय उपयोग?

विजयाची असते तैशी, हरण्याची धुंदी असते!
विजयाचा उत्सव होतो! हरणेही उत्सव होते!!<<<

नवोदीताने करावा तसा भरीचा शेर आहे हा! विजय हरणे विजय हरणे हे या क्रमाने येत राहिले आहे एवढेच. या शेराला तीळमात्र वजन नाही. चार वर्षाच्या चिमुरडीने झोका घेताना भीती वाटून आपल्या आईबापाकडे बघून रडावे तसा हा शेर लिहून झाल्यावर आपल्याच कवीकडे पाहात किंचाळून रडताना आम्हास दिसत आहे. पहिली ओळ वाचून समजा आपण म्हणालो की "बरं बुवा, मग काय म्हणणं आहे तुमचं?" तर दुसरी ओळ "विशेष काही नाही, तेच पुन्हा सांगत होते मी" असे एखाद्या साठोत्तरी गोदाक्कांप्रमाणे ठसक्यात बोलून नाक उडवून घरात शिरते.

Sad

थांबतो

-'बेफिकीर'!

बेफिकीर,

तब्येत बरी नसतानाही हे इतके कळकळीचे का म्हणून लिहीता आपण? उपयोग होईल असे वाटते?

प्रोफेसर साहेब,

आपण ज्या पद्धतीने 'खवटुन्निसा, कावळा' वगैरे प्रभृतींशी भांडता ते पाहता आपल्याला गझलेशी काडीमात्र घेणे नसून स्वतःची ऑथॉरीटी अधोरेखीत करण्याचीच कमालीची हौस आहे हे स्पष्ट दिसून येते. गेले अनेक दिवस आपल्याशी चर्चा करण्यात राम नाही हे ठाऊक असल्यामुळे आपल्या अनेक सुमार गझलांवर काहीच लिहिले नाही परंतू आत्मपरीक्षण हा शब्दच आपल्या शब्दकोशात नसल्यासारखे वाटत आहे म्हणून न राहवून प्रतिसाद देत आहे.

आपण ऐकणार नाही आहात ह्याची खात्री आहेच!

आपल्यालाच ह्याच मार्गानेच भविष्यात वाटचाल करण्यासाठी भरपूर शुभेच्छा!!

देवसर बाकीच्यान्चे बोलून झाले आहे
मी खास तुम्हाला पर्सनली एकच मुद्दा सान्गणार आहे ..............माझ्या बाबतीत आहे...........एकदाच शेवटचे सान्गतो आहे यापुढे कधीही विसरू नये ही विनन्ती........

सदा 'विठ्ठल कसा मिळवायचा?' हा घोर आम्हा
गझल मिळवायचा फण्डा नका आम्हास शिकवू !!

.........लक्षात ठेवाल अशी अपेक्षा!!

मात्र तुझ्या भंगारपारखी नजरेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे हो! >>. खूप खूप धन्यवाद!!!

केवळ याच गुणवत्तेवर मी आपणास पारखू शकलो... Wink

पुढी़ल निबंधास शुभेच्छा!!!

विजयजी,
जिवलग सवंगड्यांची आपण करत असलेली फिकीर बिनतोड आहे!
rong>आपला हतबल होवून रेखाटलेला प्रतिसाद वाचून, खालील मुद्दे आम्हासही नाइलाजाने मांडावेसे वाटले...........
१)पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कुणाशीही भांडत वगैरे नाही. हां, वाद जरूर होतात. तेही निखळ साहित्यिक! भांडण आम्हास परवडणारे नाही. तो आमचा प्रांत नाही आणि पिंडही नाही. तेव्हा, हे आपले म्हणणे म्हणजे आम्हास दुर्दैवी भ्रम वाटत आहे.

माझे अता कुणाशी कसलेही भांडण नाही......
माझ्या विषण्णतेला कुठलेही कारण नाही!.............ही आमची धारणा.

आलेल्या प्रतिसादाची जी शैली त्याच शैलीत आम्ही फक्त आमच्या परीने उत्तर देतो. आम्हास स्वत:लाच तोल ढळलेला रुचत नाही.असो.

२)कुणाचे गझलेशी कितीमात्र घेणे आहे व कोण काय अधोरेखित करतो आहे/करू पहातो आहे हे कुणालाही ठरवण्याचा अधिकार नाही. असेच करायचे म्हटले तर, इथल्या काही लोकांना आमचे लिखाण सोसणार नाही.
खूप संयमाने, देवाची प्रार्थना करून आम्ही लिहीत असतो.

३)कोण सुमार लिहितो, कोण बेसुमार लिहितो, कुणात किती दम आहे, राम आहे यावर तोंडाची वाफ दवडणे म्हणजे काठवर उभे राहून पोहायची shadow practice करण्यासारखे आहे, व किती पोहलो, म्हणून कोरडे ढेकर देण्यासारखे आहे.

४)आम्ही प्रतिसाद कोण देतो यापेक्षा, काय व किती प्रांजळपणे प्रतिसाद देतो हे पहातो.
५)विशिष्ट कुणाचा प्रतिसाद येतो का म्हणून आम्ही ताटकाळत वा रेंगाळत बसत नाही.

रेंगाळता न आले, मज भोवती कुणाच्या;
माझ्या शिवाय बाकी सारे हुशार होते!......ही आमची धारणा!

६)कुणाच्या शब्दकोशात काय आहे हे चिवडण्यापेक्षा स्वत:ची साहित्यिक समृद्धी वाढविण्यास व पोषण करण्यास आम्ही जास्त महत्व देतो.

७)कुणाचीही अतार्किक परीक्षणे आम्ही करत बसत नाही. आम्ही फक्त आमची प्रांजळ व व्यक्तीनिरपेक्ष निरीक्षणे नोंदवतो.

८)आमच्याबद्दलचे आपले समज, खात्री, विश्वास थक्क करणारे वाटले.

९)शेवटच्या अनाहूत छद्मी शुभेच्छा आपणांस लखलाभ!

...............प्रा.सतीश देवपूरकर
..............................................................................................

Rofl

गझल हृदयामधे माझ्या! गझल श्वासांमधे माझ्या!
गझल मी रोज अंथरतो, गझल मी रोज पांघरतो!!

जिसे मैं ओढता बिछाता हूं
वोह गजल सुनाता हूं -- अशा आशयाची व शब्दांची गझल एका उर्दू गझलकाराची वाचनात आली होती.

देवपूरकर महोदयांची गझल अच्छी कदाचित असेलही, पण अपनी नक्कीच नाही.

भरडणे कुणाला चुकले? कोणाला घरघर चुकली?
पण गात गात दळल्याने, दळणेही उत्सव होते!

वा वा ! कया बात है !

तुमच्या निवडक दहा मध्ये, दहाही (गझल) तुमच्या स्वतःच्याच आहेत.<<<

ते प्रत्येक गझल निवडक दहामध्ये घेऊन ठेवतात, ती यादी पुढे सरकून मागच्या गझला तेथून हालतात हे मी एकदा त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते, पण तेव्हा हवामान खराब होते