सल्ला हवा आहे

Submitted by एक अबोली on 12 October, 2012 - 01:13

मी मायबोलीची नियमीत वाचक आहे.मला माझ्या भावाबद्दल बोलायचे आहे.माझा भाऊ M.A.economics झालेला आहे. C.H.B.वर एका कॉलेजमधे काम करत होता पण १.५ वर्षांपूर्वी त्याने पार्टनरशिपमधे बीझनेस कराय्ला घेतला.खुप कष्ट पडत होते बिझनेसमधे पन करत होता.पार्टनर फक्त सल्ला देत होता. सगळे काम यालाच पड्त होते.यात त्याला मझ्या वहिनीची फरशी साथ नव्हती.कारण लग्न झाले तेव्हा लेक्चररच काम करत होता आणि तेच करावे असे तिला वाटत होते.
२-३ महिन्यापूर्वी त्याचा १७ महिन्यांचा मुलगा १ल्या मजल्यावरून पड्ला नशिबाने त्याला जास्त लागले नाही पन २ दिवस हॉस्पिटलाइझ करून observationमधे ठेवावे लागले तेव्हा माझा भाऊ घरात होता.त्याला आता असे वाटते आहे की त्याचे बिझनेसमूळे घरात दूर्लक्ष झाले म्हणून असे झाले
आता सगळा बिझनेस बंद करून घरी बसला आहे.अतिशय खचलेला आहे.बघवत नाही त्याच्याकडे.त्याने काय करावे?

मा.बोकरांनी आजवर अनेकांना चांगले सल्ले दिले आहे म्हणून इथे लिहिते आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लवकरात लवकर समुपदेशकाकडे न्या. इथेही सल्ले मिळतील पण इतक्या तीव्र मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी, व्यावसायिक सल्ला घेण्याची नितांत आवश्यकता आहे. इथे पुष्पौषधींवरचा एक लेख आहे तो वाचा, पण तो केवळ पूरक उपचार आहे, याचे भान असू द्या.

मुलगा पडला यात तुमच्या भावाचा काहीही दोष/चूक नाही हे त्यांना पटवण्याची गरज आहे. ते बरोबर असते तरी असा अपघात होउ शकतो. तेव्हा रुनी+१
मी कोतबो मध्ये सल्ले कधीच देत नाही पण या प्रसंगातून स्वतः गेल्याने हे धाडस करत आहे.

je zale tyat tyanchi kahihi chuk nahi he tyana patvun dya. asa malahi anubhav aahe, khup kathin jate, parantu ekhadya positive thinking aani inspiring mansachya sobat thevlyas nakkich farak padto. sobat changlya psycologist cha salla ghya kiva tyana dakhva. aani nehmi tyana inspire karat raha.