मायबोली

Submitted by sameer_ranade on 1 October, 2008 - 08:05

मायबोली एक अथांग सागर
विचारांचे विस्तृत आगर

कुणी सांगे कथा कविता
कुणी वाचे मदतपुस्तिका

कुणी विरंगुळ्यावर रेंगाळे
कुणी शोधिसी अक्षरधागे

कला, साहित्य, क्रिडेचे अंगण
नित्यच देई ज्ञानाचे आंदण

निळ्या-पांढर्‍या या क्षितिजाला
रंगिबेरंगी मोत्यांची झालर

बहरत राहो हे नंदनवन
हिच सदिच्छा सर्व सकलजन.

गुलमोहर: 

पहिलाच प्रयत्न आहे. तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही..
विशेष आभार दक्षिणा...

सुंदर...खरच मायबोलीबद्दल अगदी मनातलं...

झकास! मायबोली छानच शब्दांकित केलीय.
लगे रहो.

समीर,
गझल मस्तच जमली आहे Happy
पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा! Happy
फक्त एक सुचवते, शेवटून दुसर्‍या कडव्यात 'रंगबिरंगी'
ऐवजी 'रंगिबेरंगी' असं छान चांगलं वाटेल. तू ठरव. Happy

धन्यवाद मित्र आणि मैत्रिणिन्नो...:)
दक्षिणा बदल करतो. चांगला बदल सुचवल्याबद्दल धन्यवाद..

समीर,
मग काय रे? आता कविता "पाडणे" चालू का? Proud

हा मंद समीराचा झोका...

कुणी विरंगुळ्यावर रेंगाळे
कुणी शोधिसी अक्षरधागे.....
कुणी शोधिती किंवा कुणी शोधितो.....असे केल्यास व्याकरणाच्या दृष्टीने जास्त योग्य होईल.
बाकी कविता छान जमलेय.