हिरकणीच्या कन्यका ("Breastfeeding Mothers Support Group")

Submitted by कपीला on 11 October, 2012 - 14:44

Breastfeeding च महत्व आणि गरज पटलेल्या नवीन व होऊ घातलेल्या आई साठी उपलब्ध सुविधा, प्रश्नोत्तरे अणि अनुभव संकलित करण्यासाठी हा "Breastfeeding Mothers आधार ग्रुप" .

मी घराबाहेर पूर्ण वेळ काम करणारी आई. माझ्या बालाला दूध देण्याचा माझा आग्रह. प्रत्येक बाळाच्या वेळी वेगली अडचण. कोणी अनुभवी मार्गदर्शक नाही, नवीन देश, मोठा दूसरा मूल वगैरे अदचनी. अतोनात परिश्रम, अश्रू, सातत्य वगैरे वगैरे नंतर मी मुलांना वर्षभर दूध देऊ शकले- अगदी पुरेस आईचा दूध. हा प्रवास एकटीला खुप अवघढ़ झाला. माझ्यासारख्या अनुभवी आया अणि नवीन आयान्ना एकत्र अनन्याचा हा प्रयास.

थोडस group च्या नावाबद्दलः शिवरायान्च्या गोष्टीमधली धाडसी हीरकणी लहानपणी
भेट्ली पण मनावर ठसली ती महाराजान्चि गुणग्राहकता, दूरद्रुष्टी! बाळाला दूध पजन्याचि तिचि तळमळ त्या लहानग्या वयात समजली नाही अणि मला वाटत तो धड्याचा उद्धेशही नव्हता. हीरकणीचि महती जाणवली ती स्वत: दूधच्या सनघर्षात सापडल्यावर- जेव्हा ला लीचि च्या सन्केत स्थळावर American author ने लिहीलेल पुस्तक दिसल! " Hirkani's Daughters: Women Who Scale Modern Mountains to Combine Breastfeeding and Working (La Leche League International Book) [Paperback]
Jennifer Hicks "

मायबोलीकर कोणी IBCLC /RN असल्यास फारच उत्तम.

धन्यवाद

माहीतीजालावर उपलब्ध आवडती स्थळ :
http://www.llli.org/
http://kellymom.com/
http://www.breastfeedinginc.ca/
http://www.lowmilksupply.org/

माझी पुस्तक मदतनीस:
The Breastfeeding Mother's Guide to Making More Milk: Foreword by Martha Sears, RN
Breastfeeding Made Simple: Seven Natural Laws for Nursing मोठेर्स
Nursing Mother, Working Mother: The Essential Guide for Breastfeeding and Staying Close to Your Baby After You Return to Work

माझे आवडते साहित्यः
१. breastfeeding उशी: my breast friend pillow
(http://www.amazon.com/My-Brest-Friend-Deluxe-Pillow/dp/B000HZI1QS/ref=sr... products&ie=UTF8&qid=1351703753&sr=1-1&keywords=breastfeeding+pillow)
२. तांब्या-भांडं/ पाण्याची बाटली

३. आरामदायी ठराविक जागा (नाहीतर असाल तिथे जमेल तसं!)

४. शाल (घराबाहेर वापरासाठी)
http://www.amazon.com/Trend-Lab-Nursing-Cover-Bubbles/dp/B00511SEM4/ref=...

५. Any dual automatic pump- Ameda Purely Yours Breast Pump आणि इतर बरेच pumping essentials- पुढच्या ले़खात.

निसर्गाने आईच्या दुधाचि योजना यशस्वी होण्याकरता बनवली आहे. आईचे भरपूर दूध येण्यासाठि ४ गोष्टी आवश्यक आहेत - (Diana Wests's formula) पुरेश्या दुग्ध ग्रंथी + खुल्या नलिका आणि उपनलिका + योग्य प्रमाणात असलेले दुग्धावश्यक स्राव (harmones and harmone receptors) + वारंवार पूर्णपणे दूध पाजणे/काढणे.
बाळाचा जन्म झाल्यावर जमेल तितक्या लवकर बाळाला दूध पाजावे. अगदी C section झाल्यानंतर देखिल! (स्वानुभव). डौक्टरांन्ना, दवाखान्याला अगोदर कल्पना देउन ठेवावि कि बाळ आईचे दूध पिणार आहे.
पहिले २ ते ४ दिवस दुध येण्याअगोदर cholstrum येत असते- हे प्रमणाने खुप कमी पण प्रथिनांनी व antibodies ने युक्त असतात. अंगावर दूध पिणारी बाळं साधारण २ तासांनी दूध पितात. ह्या पहील्या दिवसांमध्ये दूध भरलेले नसले तरि एका बाजुला १० ते २० मि नंतर दुसरीकडे १० ते २० मि पाजावे. पहिल्या ५-७ मि. मध्ये बाळ cholstrum घेते नन्तरच्या पिण्याने जे stimulation मिळते त्यामुळे मेंदुला संदेश मिळतो - अजुन दूधाचि गरज आहे. ह्या पहिल्या दिवसांमधल्या पिण्यावर, आइच्या शरीराला शक्य असलेलि जास्तित जास्त दूध बनायचि क्षमता calibrate होते. म्हणून बाळ पिईल तेवढे दूध (एका बाजुला २० मि पर्यंत असे दोन्हि बाजुला दर २ तासानि) पाजत राहवे. बाळ जर ५-१० मि पिउन समाधान पावत असेल तर उरलेले ५-१० मि पंप केल्यानेही जास्तीत जास्त दूध बनवण्याचा उद्देश साध्य करता येतो. ज्या बाजुला पाजुन संपवले त्याच बाजुला पुढच्या वेळी प्यायला घ्यावे. ह्यासाठी एका बांगडीचा उपयोग करता येतो- पहिल्यांदा डावी मग उजवीकडे पाजले असल्यास उजव्या हातात बांगडी घालवी, पुढच्या वेळेस बांगडीमुळे लक्षात ठेवायला सोपे! ह्यासाठि iphone app देखिल उपलब्ध आहे!
एकदा दूध भरले की बाळाच्या मागणीप्रमाणे दूध पाजत रहावे, सहसा बाळ दर २ तासांनि तर कधि कधि दीड तासांनि दूध मागते. इतक्या छोटया बाळाला कुठल्याही वेळापत्रकाप्रमाणे वागवणे आइ-वडिल आणि बाळ दोघांना मनस्ताप निमंत्रण आहे. बाळाच्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला मुरड घालावी लागते हे जितक्या लवकर मी मान्य केले तितकं मला हे पहिले वहीले दिवस सुसह्य झाले. latch बद्दल शंका असेल तर Dr. Newman चे videos जरुर बघावेत.
http://www.breastfeedinginc.ca/content.php?pagename=videos

प्रत्येक वेळी दूध द्यायला सुरूवात करताना १६ औंस (२ पेले) पाणी प्यावे.

बर्याचदा दिवसाच्या सुरुवातीला दुधाची निर्मीती अधिक असल्याने बाळाचे एकाच बाजुला पिउन पोट भरते. अश्या वेळी व इतर वेळी एका बाजुचे पूर्ण दूध दिल्यावर बाळाला दुसरी बाजू देऊ करावी. सुरूवातीचे दूध (foremilk) प्रथिनांनी व lastose ह्या महत्वाच्या शर्करेने युक्त तर मगिल दूध (hindmilk) creamier fat ने भरलेले असते. बाळाच्या सर्वांगिण वाढ/ वजन वाढ ह्यासाठी पुरेपुर hindmilk अत्यावश्यक आहे.
बाळ एकाच बाजुला पिऊन त्रूप्त झाल्यास ज्या आईला नंतर दिवसा बाळापासुन दूर काम करायचे आहे, तिने दूसर्या बाजुचे दूध pump करुन साठवणीसाठी ठेवावे. बाळाजवळ राहु शकणार्या आईने पुढच्या पाजायच्या वेळी मागल्या वेळी न पाजलेल्या बाजुने प्यायला घ्यावे. " मागणी तसा पुरवठा" ह्या breastfeeding च्या न्यायाने शरीर दूधाचे प्रमाण adjust करेल.
दूध उत्पादनाची शरीराची क्षमता 'शक्य असलेल्या अधिकतम पातळीला" आणणे किन्वा गेलेल्या एखाद्या वेळेचं दूध परत आणणे हे बाळाच्या जन्मानंतर फार फार तर २-३ महिने शक्य असतं. म्हणून दूध प्रक्रिया उत्तमरित्या सूरु होण्यासाठी पहीले १५ दिवस आणि नंतर 'अधिकतम क्षमता गाठण्यासाठी' २-३ महिने हा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. त्यानंतर त्यात बदल करणं जवळ जवळ अशक्य/ अवघड बनतं.

पहिले अनेक महीने बाळ दिवस व रात्र असे २४ तास नियमीत पीत असते. बाळाचि दुधाचि गरज त्याच्या वजनाच्या १.५ पट असते. बाळ रोज साधारण १ औंस वजनाने वाढते. जे आत जाते ते बाहेर येते ह्या नियमाप्रमाणे बाळाच्या शु-शु किन्वा ओल्या diapers ने बाळ पोटभरीचे दुध पित असल्याचा अंदाज येतो. अर्थात बाळाला शांत झोप येणे, दुध प्यायल्यानंतरचे त्याच्या चेहर्‍यावरचे समाधानी भाव इत्यादी गोश्टी निदर्शक आहेतच.
सगळ्यात महत्वाचा मी शिकलेला धडा म्हणजे दुध दिल्यानेच येतं. "दुध येइल मग देउ" असा माझा गैरसमज होता!
ओळिने ३ दिवस एका ठरावीक वेळेचं दूध दिलं नाही तर त्या दूधाचि गरज नाही असा संदेश मेंदुला जाउन ते दूध बंद होतं. त्यामुळे मी बाळाचि एखादी वेळ पाळु शकले नाही तर त्यावेळेचं दूध पंप करत असे.
हा सगळा काळ शक्यतो एखादा breastfeeding support group ला जाता आले तर फार फार उपयोग होतो- इतर आया सारख्याच त्रासांमधुन, प्रश्नांमधुन, अडचणिंमधुन जात आहेत, असं पाहुन आपली सहनशक्ती वाढते, उत्साह कायम राहतो.
ही सगळी माहीती अनेक पुस्तकं वाचुन, माझ्या आदरणीय lactation consultant (L.C.) च्या मार्गदर्शनाने व अनुभवाने पडताळुन पाहीली आहे. आकडे किन्वा मांडलेला विचार डॉक्टरांच्या/ L.C. च्या सल्ल्याला पर्याय म्हणुन वापरु नये.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरकणीचि महती जाणवली ती स्वत: दूधच्या सनघर्षात सापडल्यावर- जेव्हा ला लीचि च्या सन्केत स्थळावर American author ने लिहीलेल पुस्तक दिसल! " Hirkani's Daughters: >>>> हे अगदीच अनोखे पण ग्रेऽऽऽट वाटले - कुठली हिरकणी, कोणाला तिची महती जाणवली व किती वेगळीच पण महत्वाची चळवळ आहे ही .....

आईच्या दुधाची महती काय वर्णन करणार ?? संपूर्ण आहार असलेल्या दुधातून मिळणार्‍या अँटिबॉडीज.... या तर सगळ्यात महत्वाच्या - ज्या त्या बाळाला इतर कुठूनही मिळत नाहीत -

छान धागा आहे. आणि हा धागा सार्वजनीकच राहीला तर बरे होईल. माझ्या ओळखिच्यांमधे आईला नेट वर वाचायला वेळ नसतो म्हणून बाबाच सगळे संशोधन करतात, तेव्हा हा धागा सर्वांना उपयोगी पडेल.

शशांक, अगदी बरोबर. आईच दूध lab मध्ये बनवन शक्य झाल नाहिये. कंपन्यांनी किती पण claim केले तरी. आईच्या दूधाचं composition सकाळ दुपार संध्याकाळ देखिल बाळ्याच्या गरजेप्रमाणे बदलत असं आढळुन आलं आहे. एवढच नाही तर दूध किती देतो त्यापेक्शाही किती काळ देतो हे महत्वाचं असं ला लीची म्हणते-
All the benefits of human milk—including nutritional and health—continue for as long as your baby receives your milk. In fact, as your baby takes less human milk, these advantages are condensed into what milk is produced. Many of the health benefits of human milk are dose related, that is, the longer the baby receives human milk, the greater are the benefits.

adi787, मी सहमत.

Many of the health benefits of human milk are dose related, that is, the longer the baby receives human milk, the greater are the benefits.
येस्स येस्स..... अगदी खरं व अगदी महत्वाचे...

कपीला, या धाग्याकरता मनापासून धन्यवाद व या कामाकरता अनेक शुभेच्छा...

ती अ‍ॅडमिन/मॉडरेटर यांनी उडविलेली दिसते आहे. धागा संयुक्ता मधे हलवावा अशी सूचना तिथे केलेली होती, दुसरे काही नव्हते. माझ्या बर्‍याच पोस्टी ते उडवित असतात Wink

येथिल पोस्ट शशांकच्या सुचनेप्रमणे पहिल्या पोस्टमध्ये अन्तर्भूत केले आहे. धन्यवाद.

नाव अगदी चपखल्!....आज पुन्हा एकदा अभिमान वाटला आई झाल्याचा...
ती बांगडीची idea माहित होती...पण <<ह्यासाठि iphone app देखिल उपलब्ध आहे!>> हे म्हण्जे भारीच!! हे वापरणारी खरी modern हिरकणी..
ह्या group साठी शुभेछा!.. ह्याची खरच गरज आहे...especially जेव्हा आई, आजी नसेल सोबत.

कपीला - तुमच्या शेवटच्या पोस्टमधे इतक्या प्रॅक्टिकल व महत्वाच्या गोष्टी आहेत की त्या कृपया या धाग्याच्या सुरुवातीला टाकणे.
एक अतिशय उपयुक्त माहिती लेख >>> +१०००...

मस्तच माहिती.

मी माझ्या कंपनीत अर्धवेळ काम अर्धे वेतन ह्या तत्वावर आणि थोड्या बदलत्या वेळा घेऊन काम केले आणि बाळाला १० महिनेपर्यंत दुध पाजले.

बाळाला पहिल्यांदा पाजणे देखिल कठीण असते, त्याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर बरीच मदत होईल.

ह्याच गटात दूध सोडवणे.. अंगावरचे आणि बाटलीचे हे पण सांगितले तर बरे होईल. त्याचप्रमाणे वेगवेगळे ब्रेस्टपंप नि त्यांचा वापर ह्याबद्दलपण काही तरी लिहावे.

जाईजुई, तुझ्या सुचनांवरही लिहायचा प्रयत्न करीन. pumping तर बाळापासुन दूर काम करणार्‍या आईसाठी असलेले वरदान! त्यावर वेगळं लिहायचं आहे.
शशांक, सगळा लेख सलग करायचं कसं ते शोधते- मी आत्तापर्यंत मायबोलीची वाचक होते, लेखक म्हणून शिकाऊ आहे! खुप व्याकरणाच्या चुका आहेत- पण सध्या आशयावर लक्श केंद्रित केले आहे. वाचकांच्या समजुतदारपणाबद्दल क्रुतज्ञ.
शेवटच्या लेखामध्ये काही टीपा घालत आहे.

अतिशय उपयुक्त लेख ! कपीला, तुझे खुप धन्यवाद. हा लेख सगळ्या आयांना खुप उपयोगी पडेल.
मला तर सी-सेक्शन पेक्षा फिडींगचा त्रास जास्त झाला होता.
दूध प्रक्रिया उत्तमरित्या सूरु होण्यासाठी पहीले १५ दिवस आणि नंतर 'अधिकतम क्षमता गाठण्यासाठी' २-३ महिने हा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. त्यानंतर त्यात बदल करणं जवळ जवळ अशक्य/ अवघड बनतं.>>>+१
लॅच साठी व्हिडिओची मदत फार होते.
फिडींग सुरु असतांना पाळायची स्वच्छता ह्या बद्दल पण लिही ना. किती तरी जणींना इन्फेकशन्सचा त्रास होतो.

अमेरिकेत राहणार्‍या मम्मीनो:

मला दोन्ही मुलांच्या वेळी इनुशरन्स कं. कडून अतिशय efficient असा ब्रेस्ट पंप १ वर्षभराकरता मिळाला होता. अगदी वरदान होत. नक्की चौकशी करा. बाकी अतिशय छान धागा. मी दोन्ही मुलांच्या वेळी Virginia Tech मध्ये शिकवायचे. प्रसंगी टॉयलेट मध्ये पंपिंग करायला जायचे. मग दुधाच्या बाटल्या कूलर मध्ये ठेवा, आठवणीने घरी न्या असा द्राविडी प्राणायाम असायचा. सुदैवाने..घर अगदी जवळ होते तेव्हा जाण-येण सोयीस्कर असायच. आत्ता काम करते त्या कंपनीत, प्रत्येक बिल्डिंग मध्ये "Nursing Suits" आहेत. मस्त रॉकिंग चेअर, म्युझिक, मंद दिवे अस छान वातावरण असत.

सर्व मम्मीना:

भरपूर दुधाच्या निर्मिती करता आईने चौरस आहार घेण आणि शांत्-आनंदी राहण महत्वाच आहे. अंगावर पाजायच असेल तर काम उरकल्या सारख टिव्ही समोर पाजू नये. बाळाला बाजूला घेउन शांत पाजाव. तो चक्क हक्काच्या विश्रांतीचा वेळ मानावा. आईची मनःशांती , आनंदी वृत्ती राखण्यात घरच्या लोकांनी, मुख्य म्हणजे बाळाच्या बाबांनी, सहकार्य देण खूप महत्वाच आहे.

अजून एक, माझ निरिक्षण अस आहे की आईच्या आहाराचा दुधाच्या चवीवर परिणाम होत असावा. कच्चा कांदा खाल्ला की मुल कमी दुध घ्यायची. हरभरे, चणाडाळ, कोबी, असे गॅस निर्माण करणारे पदार्थ टाळावेत. अजून आठवल की लिहीन. लई वर्ष झाली!

खुप उपयुक्त धागा!
नवीन आई-बाबांसाठी एक चांगलं गाईड होऊ शकेल असा विषय आहे.
मला सुचेल तसे (आणि आठवेल तसे) लिहीनच इथे!

आईने लहान बाळाला दूध पाजल्यानंतर त्याला ढेकर (burping) देणे पण एक skilled task आहे. त्याचाविषयीपण लिहा.

अजून एक, माझ निरिक्षण अस आहे की आईच्या आहाराचा दुधाच्या चवीवर परिणाम होत असावा. कच्चा कांदा खाल्ला की मुल कमी दुध घ्यायची. >>> अगदी बरोबर आहे हे. गावाकडे असताना मी देखील असा अनुभव घेतलाय की दूध देणार्‍या गाई-म्हशीने जर कांदा पात/ लसूणपात खाल्ली असेल तर दुधाला तसाच उग्र वास यायचा - त्यावरुन त्या दूध घालणार्‍या बाईबरोबर आजीची वादावादीही व्हायची..... (आजी कांदा/लसूण बिल्कुल न खाणारी असल्याने तिला हा उग्र वास लगेच यायचा..)
- अति तिखट खाल्ले तरी बहुतेक त्याचाही अंश उतरत असेल दुधातही...

नवीन आई-बाबांसाठी एक चांगलं गाईड होऊ शकेल असा विषय आहे.>>> +१००....

ह्याच गटात दूध सोडवणे.. अंगावरचे आणि बाटलीचे हे पण सांगितले तर बरे होईल>>>ह्याबद्दल माहिती मिळू शकेल का?

ह्याच गटात दूध सोडवणे.. अंगावरचे आणि बाटलीचे हे पण सांगितले तर बरे होईल>>>

कृपया शक्य असेल तर जेवढे दिवस बाळ दूध घेते आहे तेवढे दिवस पाजा. बेबी लेड वीनींग म्हणून सर्च करा. फेसबुकवर अनेक lactation consultants आणि असंख्य अनुभवी मातांनी मिळून "Breastfeeding सपोर्ट फॉर इंडियन मदर्स" हा ग्रुप स्थापन केला आहे अनेक वर्षे. अतिशय उत्तम आहे.