ज्ञानेशाच्या दरबारी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 10 October, 2012 - 12:54

ज्ञानेशाच्या दरबारी
लावियली हजेरी
शब्दातून वारी
केली पुनःपुन्हा

अर्थरूपी अबीर
उधळला अपार
त्याचे मनावर
जाहले मुद्रण

तृप्तीने गेलो
अवघा भरून
जाय समाधान
ओसंडून

चित शब्दकळा
नव्या नवतीची
तहान मनाची
दुणावली

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञानेशाच्या दरबारी गेल्यावर

तृप्तीने गेलो
अवघा भरून
जाय समाधान
ओसंडून
>>>>> हेच महत्वाचे......

खूप भावपूर्ण.....

चित शब्दकळा
नव्या नवतीची
तहान मनाची
दुणावली>>>>>>>>>>>अतिशय सुरेख

______________
अवान्तर : मी असे बदलून पाहिले..........

चिंब शब्दकळा
नव्या नवतीची
तहान मनाची
दुणावली

धन्यवाद !!

श्यामराव्,वैभव आभार ,
चित हा शब्द चित्कळाशी जवळचा वाटतो ,सत चित आनंद मधला चित , चिंब चपलख बसतो ,पण मी चित स्वीकारीन.पुन्हा धन्यवाद.