करायची जातपात नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 4 October, 2012 - 10:51

एक रुबाई......

आले न मला ओरखडे सांधाया!
आले न कधीही तुकडे सांधाया!
आयुष्य उभे खर्च जरी मी केले,
आले न उरातील तडे सांधाया!

..................प्रा.सतीश देवपूरकर
गझल

करायची जातपात नाही!
अशी इथे रीतभात नाही!!

तुझ्या मनाचेच खेळ सारे.....
तसे कुणाच्या मनात नाही!

अनन्य आहे तुझी महत्ता!
असा कुणी ऎकिवात नाही!!

कधी कधी वाटते असे की,
जगात कोणी सुखात नाही!

नको ऋणाची करूस भाषा;
अशी प्रथा आपल्यात नाही!

जनावरेही बरी म्हणवी,
इमान ते माणसात नाही!

कसे मला ओळखेल कोणी?
कुठेच मी येतजात नाही!

वनात गेल्यावरी कळाले.....
‘प्रपंच’ रानावनात नाही!

नकोस कोणास स्वप्न दावू;
कुणीच आता भ्रमात नाही!

खरेच हा शुद्ध पायचाळा!
उनाड मी जन्मजात नाही!!

नकोच ती पायपोळ आता!
फिरायचे चांदण्यात नाही!!

नको कुणाची प्रमाणपत्रे!
अलीकडे मीच गात नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खणखणीत गझल !!

आवडली !!

नकोच ती पायपोळ आता!
फिरायचे चांदण्यात नाही!!

>>>>>यावरून मला माझ्या एका टुकार गझलेतले दोन शेर आठवले (होय विश्वास ठेवा.... हे दोन शेर आहेत !!;))

चन्द्र आज
मन्द मन्द

चालण्यास
पायबन्द !!

Rofl

मतला असा होता

गोटिबन्द ......
मुक्तछन्द !!

Rofl

वैभवा! सुंदरच आहेत शेर!
मी एक सुचवू का?................

मतला मी सांगतो असा कर, व गझल पूर्ण कर.

काफिये सुंदरच!
माझा मूड लागला तर, मी पण या काफियांवर गझल करू का?

तू परवानगी दिलीस तर पहातो करून!

तुझा मतला असा होईल/कर................

चंद्र आज मंद मंद!
चालण्यास पायबंद!!.........वा! वा! व्वा! अप्रतिम!

आता ही गाडी तू पुढे ने! चालू करून दिली बघ मी, किक मारून!

तुझे उत्तर/तुझी परवानगी आल्यावरच मी पुढे सरकेन!
...........प्रा.सतीश देवपूरकर
............................................................................................

परवानगी वगैरे नका मागू ..........करून टाकाच

मी जसे शेर दिलेत तशी "गालगाल" एवढ्या छोट्या बहरात ती रचना केली आहे अन इथे प्रसिद्धही केली आहे पूर्वी आत माझ्या लेखनात लिन्क शोधतोय पण मिळत नाहीये मिळाल्यास आपणास पाठवेन

धन्यवाद सर