पुणे गणपती विसर्जन मिरवणूक 'द बिग फाईव्ह'

Submitted by आशुचँप on 2 October, 2012 - 08:20

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्य वाटले.

पन खरेच तुम्हाला(जिप्सी वगैरे) कसे काय इतक्या गर्दीत जावून फोटो काढायला मिळते?

(पुण्यात राहून सुद्धा विसर्जनाच्या दिवशी आम्ही बाहेरच पडत नाही गर्दीच्या भितीने...)

मस्त रे आशू...

रात्रीतर अक्षरशः झुंबड असते.. त्यात असे फोटो काढायला मिळाले हे सहीच..

फोटो काढायचेच असतील तर बिनधास्त आत घुसायचं कोणी काही बोलत नाही.. मंडळाच्या कार्यकर्त्यांची काही तक्रार बहुतेक नसते. बिनधस्त रस्त्याच्य मध्यात जाऊन फोटो काढायचे.. दोन पथकांच्या मध्ये बहुतेक वेळा जागा मिळून जाते..

फोटो काढायचेच असतील तर बिनधास्त आत घुसायचं कोणी काही बोलत नाही.. मंडळाच्या कार्यकर्त्यांची काही तक्रार बहुतेक नसते. बिनधस्त रस्त्याच्य मध्यात जाऊन फोटो काढायचे.. दोन पथकांच्या मध्ये बहुतेक वेळा जागा मिळून जाते..
>>> मी तर पथकाबरोबरच जातो. DSLR camera va zoom lense असेल तर बर्‍याचदा सगळ्यांना प्रेस फोटोग्राफर आहे असे वाटते, नाहीतर पथकामधील बॉस लोकांचा फोटो काढायचा की आपोआप तुम्ही पथकातलेच एक होऊन जाता. अशी मजा असते. Happy

सर्वांना खूप खूप धन्यवाद...
अतुलनीय धन्स हो....

मी तर पथकाबरोबरच जातो. DSLR camera va zoom lense असेल तर बर्‍याचदा सगळ्यांना प्रेस फोटोग्राफर आहे असे वाटते, नाहीतर पथकामधील बॉस लोकांचा फोटो काढायचा की आपोआप तुम्ही पथकातलेच एक होऊन जाता. अशी मजा असते.

सेम हिअर....:)

हा उत्साह संपल्यानंतर पायाचे शेकडोने तुकडे पडतात पन

अगदी अगदी...माझी तर यंदा खूपच जास्त वाट लागली होती...वरून फोटो काढायचे म्हणून एका डीपी वॉक्सवर चढलो होतो...तिथून उतरताना उडी मारली आणि गुढगा कामातून गेला...त्यामुळे घरी येऊन पायाला क्रेप बँडेज बांधून मगच रात्रीच्या मिरवणूकीला गेलो....मिरवणूक संपल्यावर बेलबाग चौकातून नवी पेठेत येताना एक एक पाऊल १०० पावलांसारखे वाटत होते...

अप्रतिम !!
पण मला एक प्रश्न कधीपासून विचारायचाय. हे सगळे मानाचे गणपती........खरोखर विसर्जन करतात का ? मिरवणूकीत खरी मूर्ती असते की विसर्जनाची वेगळी मूर्ती असते ?

विसर्जनाची छोटी मूर्ती (Moorthy :)) पुण्यात वेगळी असते. मात्र मुम्बईत त्या महाकाय 'मूर्थ्या' समुद्रात विसर्जित करतात कारण त्या बुडेल एवढे पुरेसे पाणी समुद्रात दरवर्षी उपलब्ध असते Happy
पुण्यातल्या नदीला मूर्थी बुडेल एवढे पाणी नसते. कधीच नव्हते.

मग पुण्यातल्या मोठ्या मुर्त्या मिरवणूकी नंतर विअर्जन न करता काय करतात?

मी तर एकलं की विसर्जन करतात म्हणून...

पुण्यातल्या गणपतींची मूळ मूर्ती आणि पूजेची मूर्ती वेगवेगळी असते..दरवर्षी त्याच मुर्तीची लहान प्रतिकृती बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि तिच मूर्ती विसर्जन केली जाते. मूळ मूर्ती ही सोन्या चांदीने, दागिन्यांनी मढवलेली असते व ती फक्त मिरवणूकीपूरती बाहेर काढली जाते...बहुतांश मंडळांच्या मूर्त्या या कायमस्वरूपी छोटेखानी मंदिरात ठेवल्या जातात व संकष्टी, अंगारिका, गणेशजन्म अशा वेळी त्यांची पूजा केली जाते...

दगडूशेटच्या दर्शनाने मन आणि डोळे भरुन आले...

वारे अँन्ड सन्सच्या "त्या" ज्येष्ठ मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच...

मिरवणूक संपल्यावर बेलबाग चौकातून नवी पेठेत येताना एक एक पाऊल १०० पावलांसारखे वाटत होते...>>>> याकरता आशुचँपला दंडवतच....
त्याच्या एवढ्या कष्टामुळे इथे घरबसल्या दर्शन होतंय आम्हा सर्वांना....

Pages