तुझा उल्लेख झाला की, मनाचा डोह थरथरतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 1 October, 2012 - 09:46

गझल
तुझा उल्लेख झाला की, मनाचा डोह थरथरतो!
स्मृतींचा लाघवी काटा तळागाळात सळसळतो!!

तुझ्या वाटेकडे माझे कधीचे लागले डोळे,
तुझा आवाज ऎकाया, जिवाचा कान तळमळतो!

तुझ्या बागेतला वारा घरी रेंगाळतो माझ्या!
पहाटे रोज दाराशी, तुझा प्राजक्त दरवळतो!!

गझल हृदयामधे माझ्या! गझल श्वासांमधे माझ्या!
गझल मी रोज अंथरतो, गझल मी रोज पांघरतो!!

कुणी गझलेवरी टीका, करे नाहक कुणाच्याही.....
कळेना जीव हा माझा, कसा आतून कळवळतो?

कुणी देतात काहीही अरे, प्रतिसाद गझलेला!
कुणी साक्षात जळफळतो, कुणी साक्षात मळमळतो!!

विसावा घ्यायचा असतो मनाने.....हेच मी शिकलो!
भले लागेल ना डुलकी, पथारी मात्र अंथरतो!!

कळेना कोण मी आहे? जिथे जातो, तिथे बघतो....
मला बघताच बघणारा, मनापासून गुरगुरतो!

खटकते काय त्याला अन्, कुणाचा राग तो करतो?
पहा आतून मुसमुसतो, कसा आतून धुसफुसतो!

न नाचायास येते अन् म्हणे हे वाकडे अंगण!
मनाजोगे कितीही द्या, तरी तो फक्त कुरबुरतो!!

पहा उलट्याच चोराच्या किती बोंबा सुरू झाल्या!
कळे ज्याचेच त्याला की, कुणाला कोण वापरतो!!

पहा रांगेमधे येती मला भेटायला यमके!
जरा मी फक्त एखादा नवा मिसराच गुणगुणतो!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा सर,आपला प्रतिसादावरचा प्रतिसाद आत्ता वाचला.. नेटवर जाऊ शकले नव्हते काही दिवस.

तुझा उल्लेख झाला की, मनाचा डोह थरथरतो!
स्मृतींचा लाघवी काटा तळागाळात सळसळतो!!

विसावा घ्यायचा असतो मनाने.....हेच मी शिकलो!
भले लागेल ना डुलकी, पथारी मात्र अंथरतो!!

या द्विपदी विशेष आवडल्या.. शुभेच्छा.