भारतीय सैनिक

Submitted by विश्वजीत दीपक गुडधे on 30 September, 2012 - 06:32

भारतीय सैनिक

प्राशन करून या भारतमातेचे क्षीर
समस्त भारतवासी देती ज्याला धीर
बघता बलिदान ज्याचे दाटते डोळा नीर
तो अमर भारतीय सैनिक वीरांचाही वीर ||१||

दधीचिची ज्याची असे हाडे
रणांगणी पाडी जो रक्ताचे सडे
सज्ज असे जो चारण्या शत्रूस खडे
तो वीर रणावर धारातीर्थी पडे ||२||

देशासाठी मारण्या सज्ज ज्याचा आत्मा
शत्रू पक्षाचा ज्याने केला खात्मा
पाठीशी ज्याच्या टिळक, महात्मा
तो रणांगणी लढता जाहला हुतात्मा ||३||

ज्योतीसम जो जगला जीवन
जिजाऊने केले ज्याचे औक्षण
परि करण्या भारतभुमीचे रक्षण
केले त्या वीराने प्राणही अर्पण ||४||

रणावर ज्याने गाळला रक्ताचा घाम
देशाचे रक्षण ज्याचे असे काम
दिला अन्यायाला विराम
त्या रणवीराला आमचा सलाम ||५||

• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users