आपल्या या भारत देशात

Submitted by अनिल तापकीर on 29 September, 2012 - 05:19

आपल्या या भारत देशात
आपल्या या भारत देशात
धर्म संस्कृतीचे गोडवे गातात................
म्हणायला आपली पवित्र संस्कृती
अनुकरण मात्र करतात पाश्चाती
धर्माने वागणाऱ्यास गावंढळ समजतात
आपल्या या भारत देशात..............
भ्रष्टाचाराचा उधळतो आहे वारू
दुधापेक्षा महाग आहे दारू
सर्व काही नेत्यांच्या हातात
आपल्या या भारत देशात.......................
शिक्षण नाही गरिबांच्या आवाक्यात
प्रवेशासाठी लाखो मोजले जातात
अपेक्षांच्या ओझ्यांनी विद्यार्थी दडपतात
आपल्या या भारत देशात................
राजकारणात फक्त गुंडानाच प्रवेश मिळतो
सज्जनांना बाहेरचा मार्ग दाखवला जातो
पैसा दारू ओतून निवडून येतात
आपल्या या भारत देशात....................
साध्या नोकरीसाठीहि मागतात लाखो
कोणाचीही निवड होते गुणवंतांना मिळतो खो
पदवीधरही रखवालदार होतात
आपल्या या भारत देशात.................
ऊठ तरुणा आता तरी जागा हो
असा कोमेजून तू जाऊ नको
लढा देणे आहे तुझ्याच हातात
आपल्या या भारत देशात.....................

Group content visibility: 
Public - accessible to all site users