आय लव्ह यू

Submitted by pradyumnasantu on 26 September, 2012 - 19:25

मी लहान होतो तेंव्हा
खेळता खेळता पडलो
थोडेसे खरचटलेले
पण हमसाहमशी रडलो
*
कुठूनसा हात तो आला
सुकलेला सुरकुतलेला
त्या हाताने हळुवार
ओघळता अश्रू टीपला
*
आजीने कसली जादू
त्यावेळी मजवर केली
हसवायचि रडणाऱ्याला
तिज अवगत किमया कसली
*
थँक्सही म्हणालो नाही
मी कसा अडाणी होतो
अन आज म्हणावे म्हटले
तर हाती केवळ फोटो
******
आईचे सांगू काय
देवता खरी ती होती
माझ्यासाठी धडपडणे
सार्थक ती समजत होती
*
हर एक अडचणीत माझ्या
मी तिच्याच जवळी गेलो
पण मूर्ख मात्र इतका ते
कर्तव्यच तिचे समजलो
*
कधी थँक्सही म्हटलो नाही
मी स्वार्थी असला होतो
अन आज म्हणावे म्हटले
तर हाती केवळ फोटो
*******
मग अशाच दिवशी एक
ती परक्या घरची लेक
मज पत्नी म्हणुन मिळाली
सहचरी ती बनली नेक
*
पंचवीस वर्षे झाली
मजसाठी राबत आहे
पाणी मागितले, पाणी;जेवण मागितले, जेवण
इतकेच नव्हे तर नंतर
खरकट्यास थांबून राहे
*
पण राक्षस जणु मी कोणी
कधी कौतुक केले नाही
कधी ’थकलीस’ म्हटले नाही
आभार मानले नाही
*
परी प्रिये मी तितका आज
नच राहिलो मी नासमझ
जरी झाला खूप ऊशीर
व्यक्त मी प्यार करणार
*
तू करते आहेस शॉपिंग
येथूनच आय कॅन सी यू
कान तू जरा कर इकडे
ओरडतो मी आय लव्ह यू
आय लव्ह यू.........लव्ह यू........लव्ह यू......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्सही म्हणालो नाही
मी कसा अडाणी होतो
अन आज म्हणावे म्हटले
तर हाती केवळ फोटो
खूप हृद्य! आवडली कविता .

टची आहे, विशेषतः आजी आणी आईच्या बाबतीत ( वडलांच्या सुद्धा ). त्यांचे निरपेक्ष प्रेम आपण किती सहजपणे गृहीत धरतो ना.:अरेरे:

भारतीजी, रुतुजा, टुनटुन
स्त्रीचा सन्मान करणारी ही कविता आपल्याला आवडली यात माझ्या कवितेचाही सन्मान झाला. आभारी आहे.

स्त्रीचा सन्मान करणारी कविता .
विशेषतः आजी आणी आईच्या बाबतीत ( वडलांच्या सुद्धा ). त्यांचे निरपेक्ष प्रेम आपण किती सहजपणे गृहीत धरतो ना.>>>>खरय टुनटुनजी.

खूप भावली. आई आजीचे प्रेम समजायला उशीर झाला त्याची खंत छान व्यक्त केली आहे. हृदय्स्पर्शी कविता. आयुष्यात असे होते खरे.