१ मध्यम सफरचंद
२ छोटे किंवा १ मोठा बटाटा
गरजेनुसार तांदळाचे पीठ
जिरं
भरडलेले मिरे
दाण्याचं कूट
हिरवी मिरची
कोथिंबीर
मीठ
तूप
सफरचंद सालासकट किसून घ्यावे.
बटाटा साल काढून किसून घ्यावा. ( बटाटा कच्चाच किसावा, उकडून नव्हे. )
त्यात आवडीप्रमाणे दाण्याचं कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, भरडलेले मिरे, मीठ घालून थालिपीठ थापण्यासाठी लागेल तेवढेच तांदळाचे पीठ घालावे ( साधारण तीन-चार छोटे चमचे. )
तव्यावर तूप सोडून पातळ थालिपीठ थापावे. झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी खालची बाजू सोनेरी कुरकुरीत झाली की उलटावे. झाकण न ठेवता दुसर्या बाजूनेही शिजवून घ्यावे.
गरमागरम खावे
झटपट होणारा प्रकार आहे.
सफरचंद असल्याने वेगळी साखर घालायची गरज नाही.
गोड-तिखट आवडेल त्याप्रमाणे सफरचंद-बटाट्याचे प्रमाण कमी जास्त करु शकता.
अगो भारी आणी झेपणेबल!! ़
अगो भारी आणी झेपणेबल!!
़ करून खाण्यात आला आहे!!
हे मस्त लागतं. मी त्यादिवशी
हे मस्त लागतं. मी त्यादिवशी उपासाची भाजणी वापरून केलं..एकदम यमी..कधी नव्हं ते हिरवं सफरचंद पुन्हा आणावंसं वाटतय...:)
धन्यवाद लोकहो. खूपजणं थालिपीठ
धन्यवाद लोकहो. खूपजणं थालिपीठ करुन बघत आहेत आणि आवडल्याचे सांगत आहेत. मस्त वाटतंय अगदी
काल आषाढीनिमित्ताने केले होते
काल आषाढीनिमित्ताने केले होते राजगिरा पीठ वापरुन. झ का स झाले. धन्यवाद अगो.
धन्यवाद रैना
धन्यवाद रैना
मी एकादशी दिवशी नाही पण अधे
मी एकादशी दिवशी नाही पण अधे मधे अनेकदा केले आईला खायला
आमच्याकडे हिट्टं डिश आहे ही. मला सफरचंद नुसतंच खायला आवडत नाही
रीया, छान वाटलं वाचून !
रीया, छान वाटलं वाचून ! :थंब्ज अपः
(No subject)
मस्त आहे... करुन बघते....
मस्त आहे... करुन बघते....
खुपच छान आणि वेगळी आहे
खुपच छान आणि वेगळी आहे रेसिपी. नक्की करुन बघेन.
मोठ्ठ्या सफरचंदाच काय करावं
मोठ्ठ्या सफरचंदाच काय करावं ह्या विचारातच हा धागा वर दिसला.. लगेच ट्राय केला.. मस्त झालेत थालिपीठ!
अगो, मस्त रेसिपी! काल
अगो, मस्त रेसिपी!
काल सफरचंदाऐवजी पेअर (नाशपती) वापरून करुन बघितली. थोडं आलंही घातलं होतं किसून. फारच चविष्ट!
चनस, छान दिसत आहेत
चनस, छान दिसत आहेत थालिपीठं.
अदीजो, आल्याची अॅडीशन मस्तच. मीही घालून बघेन पुढच्यावेळी.
धन्यवाद
Pages