भोगले वर्षानुवर्षे दु:ख कोरे!

Submitted by सतीश देवपूरकर on 23 September, 2012 - 06:01

गझल
भोगले वर्षानुवर्षे दु:ख कोरे!
मी सुखाला पाहिले; पण, पाठमोरे!!

आंधळ्या या डोळसांची कीव येते!
फक्त हे डोळे दिसायाला टपोरे!!

रोज फाटू लागली ही जिंदगानी......
टाकले उसवून मीही धावदोरे!

मी स्वत:ला सारखा बदलीत असतो;
त्यामुळे आयुष्य माझे पाठकोरे!

मी न दातांच्या कण्या करणार आता....
दात बसतो खात, कोणी, दात कोरे!

चेह-यांचा रंग केव्हा सांगतो का?
काळजाने कोण काळे? कोण गोरे?

जायची वाया न डोकेफोड माझी
मीच तो, जो आणतो बोरीस बोरे!

अस्मितेचा गंध नाही लेखनाला......
तेच शायर नेमके करतात तोरे!

होय! पोरोडाच वाटे ‘मायबोली’
थोर गेले, राहिली आहेत पोरे!

या कवींना कोण रे घालेल वेसण?
केवढी मोकाट ही सुटलीत ढोरे!

चेह-याला रोज जखमा मीच करतो!
काय दाढीचे तरी करणार खोरे?

रोज मी उधळेन गझला.....घोर नाही......
कोण गाते? कोण वाचे? कोण चोरे?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताशा, प्रोफेसर साहेबांच्या लेखनात दोन भाग दिसू लागले आहेत.
१. वैयक्तिक
२. वैश्विक
(सौजन्य - कावळा)

'वैश्विक' भागाचा विचार केल्यास, गेल्या काही दिवसांत टाकलेल्या अनेक गझलां/ हझलांहून ही गझल बरीच उजवी वाटली.

वैयक्तिक भाग, ह्या आधीच्या सर्व प्रयत्नांप्रमाणेच मळमळयुक्त आणि मनोरंजनपर वाटला.

चेह-याला रोज जखमा मीच करतो!
काय दाढीचे तरी करणार खोरे? >>>> आफाट शेर

अत्यंत वास्तव आणि विदारक सत्य मांडले आहे पुर्ण गझलेत...

भट असायला हवे होते हे वाचायला ... त्यांनी नक्कीच ......
.

.
.
जाऊद्या ... पु.ले.शु!

मस्त !

भोगले वर्षानुवर्षे दु:ख कोरे!
मी सुखाला पाहिले; पण, पाठमोरे!!
<<< मस्त शेर

जायची वाया न डोकेफोड माझी
मीच तो, जो आणतो बोरीस बोरे!<< मला आवडला हा शेर

अस्मितेचा गंध नाही लेखनाला......
तेच शायर नेमके करतात तोरे!<< Proud

होय! पोरोडाच वाटे ‘मायबोली’
थोर गेले, राहिली आहेत पोरे!<<< Lol

या कवींना कोण रे घालेल वेसण?
केवढी मोकाट ही सुटलीत ढोरे!<<< Rofl

प्रोफेसर साहेब, पाठकोरे हा शेर टेक्निकली पटला नाही.

दाढीचा शेर समजलाच नाही.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

थोर गेले, राहिली आहेत पोरे!>>>>बेफीजी किती हसताय जरा थाम्बा हसू नका विचार करा हा तुम्हाला शाल़जोडीतला असू शकतो Wink

पाठकोरे हा शब्द ज्याना समजला नाही त्यान्नी उद्यापासून देवसराची गझल वाचताना आपापल्या डिक्शनर्‍या सोबत बाळगाव्यात !!( माझ्याकडे नाहीये डिक्शनरी तुम्हाला शब्द सापडला की मला अर्थ कळवत जा रे मित्रानो...डिक्शनरीचे नाव ऑथर प्रकाशन पान नम्बर कळवायची काही गरज नाही )

अस्मितेचा गंध नाही लेखनाला......>>>>>>>> लोका सान्गे ब्रम्हज्ञान ...........
शोभत नाही देवसर आपल्याला या वयात .हे ......अस्मिता जपणे म्हणजे स्वतःवरच प्रेम करणे /स्वभक्ती करणे न्हवे !!

देवसर,
एक विनन्ती आहे तुम्हाला, प्लीज ह्या अशा खटाटोपात अडकु नका.
तुमच्या आधीच्या गझला छान असायच्या कारण त्या लिहिण्यामागे कुठला छुपा उद्देश नसायचा.
आजकाल तुमच्या गझलामध्ये द्वेषच जास्त जाणवतो.
पहा जरा विचार करा, स्वत:साठी गझला करा, असे वाद वाढवण्यासाठी/कुणाला हीन लेखण्यासाठी नका करु प्लीज.
बाकी तुम्ही ज्ञानाने, वयाने, मानाने मोठे आहात, मी काय सान्गणार तुम्हाला?
कृपया गैरसमज नसावा.

चेह-याला रोज जखमा मीच करतो!
काय दाढीचे तरी करणार खोरे?
हजामत,
भादरणे,
बिनापाण्याने,
इ. अनेक शब्द आठवले.

मोहिनी पवार व त्यांचा छोटा जिमी यांना मनःपूर्वक श्रद्धांजली. असा खतरररररररनाक आयडी होणे नाही.. फाऽर आठवण येतेय त्यांची..

चिखल्याशी चिखल्या सहमत, माझ्याशी मी आणि वैवकुशी वैवकु

तीनही आय डी भिन्नभिन्न

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी, धन्यवाद!
पाठकोरा शेर असा आहे.........
मी स्वत:ला सारखा बदलीत असतो,
त्यामुळे आयुष्य माझे पाठकोरे!
भूषणराव, मला अभिप्रेत असलेला अर्थ सांगतो, पहा पटते का ते..........

पाठकोरे कागद असतात, हे माझ्या मनात आले. माझी टाचणे, माझे लिखाण, मी नेहमी पाठकोरेच ठेवतो, कारण पाठीकडील बाजू कोरी असली की, काहीही बदल (कमीअधिक) करायचा असल्यास लिहायला वाव असतो, जागा असते.

पाठकोरे ही प्रतिमा आम्हाला आयुष्याला लावावी वाटली. जगात माणूस सवत:ला सोडून कुणासही बदलू शकत नाही, अशी आमची धारणा व अनुभव आहे. म्हणून आमचे आयुष्य हे आम्ही पाठकोरे ठेवतो, म्हणजेच बदल करण्यास वाव असणारे ठेवतो. आम्ही elastic रहाण्याचा, आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे आम्ही सतत प्रसन्न (serene) रहातो.
बदलास वाव असणे या अर्थी आम्हाला पाठकोरे प्रतिमा सूचक वाटली.
आपणास काय वाटते ते कळवाल का?

माझा वर दिलेला अर्थ जर आपणास पटला असेल व तो तसा अर्थ जर शेरात अभिव्यक्त होत नसेल, तर तो कसा आणता येईल, किंवा पाठकोरे काफिया वापरून स्वतंत्र शेर रचाल काय? वाचायला आवडेल!

दाढीचा शेर असा आहे..............

चेह-याला रोज जखमा मीच करतो!
काय दाढीचे तरी करणार खोरे?

माझ्या मनातील अर्थ असा...........

चेहरा, जखमा, दाढीचे खोरे या प्रतिमा आम्ही का वापरल्या?

I am responsible ही आमच्या मनातील मूळ भावना! माझ्या आयुष्यात जे काही भलेबुरे होते, त्याला केवळ मी, आणि फक्त मीच जबाबदार आहे असे आम्ही समजतो. दुस-यांकडे बोट दाखवले नाही की, निदान आपली प्रसन्नता तरी ढळत नाही. आपण आपल्याला स्वीकारायला शिकतो व त्याने आपल्यात सुधारणा व्हायला वाव मिळतो.

आता चेहरा ही माणसाची ओळख समजतात. माझ्या चेह-याला मीच रोज जखमा करतो, म्हणजे माझ्यात झालेल्या बिघाडाला मीच जबाबदार असतो, असे आम्हाला महणायचे आहे.

घाईघाईत दाढी करताना आम्हाला ब-याचवेळा कापते, म्हणून दाढी करता करताच (मी रोज दाढी करतो!) मला हा शेर सुचला. अनावधानाने, धसमुसळेपणाने, घाईगडबडीने, असे आमच्या हातून होते. चेह-याला झालेल्या जखमांना मीच जबाबदार असतो. कारण माझे लक्ष नसते. त्यात दाढीचे खोरे (rezer), वा ब्लेड यांची काय चूक? इथे दाढीचे खोरे हे प्रतिक आम्ही वापरले ते इतर व्यक्ती अशा अर्थी. कुणाचाही, काहीही दोष नसतो, दोष माझाच असतो,ज्यामुळे मी घायाळ होतो.
चेहरा, जखमा आले म्हणून दाढीचे खोरे ही प्रतिमा आम्हाला चपखल वाटली. पहा पटते का ते. आपली मते जरूर कळवा भूषणराव! अर्थ अभिव्यक्त होत नसेल तर खोरे काफिया घेवून स्वतंत्र शेर द्याल का?

टीप: हस-या मुद्रांचा अर्थ समजला नाही हो भूषणराव!
शालजोडीतील नाहीत ना? मी फार भोळा आहे हो, वस्ताद नाही.
..............प्रा.सतीश देवपूरकर