बंदही झाली न डोळ्यांची कवाडे!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 September, 2012 - 04:35

गझल
बंदही झाली न डोळ्यांची कवाडे!
तोच येवू लागली येथे गिधाडे!!

तोडले आधीच लचके जिंदगीने;
राहिली आहेत आता फक्त हाडे!

वाटती झाडे मला मोठ्या मनाची;
माणसांसाठी खुजी होतात झाडे!

केस हे ना पांढरे झाले उन्हाने!
पाहिले मी भाट, निंदक, अन् चहाडे!!

केवढ्या कोत्या मनाची माणसे ती!
चालणारी, बोलणारी ती खुराडे!!

शोध त्यांना काय माझा लागला अन्......
लागली हातास गझलांची घबाडे!

रोज गझलेचाच मी पाऊस होतो.....
काफियांची रोज उलगडतो घबाडे!

जाहली पस्तीस वर्षे नोकरीला......
जाहले पस्तीसही नाहीत खाडे!

पाहते संपूर्ण दुनिया खिन्नतेने......
‘मायबोली’वर कसे होतात राडे!

कोण मालक? कोण भाडोत्री?....कळेना!
भीक घालावी, तसे देतात भाडे!!

जावयाचा शोध घेताना समजले....
हे म्हणे देशस्थ, ते.....को.ब्रा., क-हाडे!

माझियापाशी कळेना काय आहे?
भोवती पडतात माझ्या का गराडे?

कोण जळते, काय विद्युतदाहिनीला?
ती रडत नाही.....रडत नाही धुराडे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोध त्यांना काय माझा लागला अन्......
लागली हातास गझलांची घबाडे! << हा हा

रोज गझलेचाच मी पाऊस होतो.....
काफियांची रोज उलगडतो घबाडे!<< हम्म्म

जाहली पस्तीस वर्षे नोकरीला......
जाहले पस्तीसही नाहीत खाडे! << हम्म्म

यावरून माझा (मला चाळिसाव्वे लागले होते तव्हाचा) एक शेर आठवला.

जाहली चाळीस वर्षे जन्मण्याला
अन म्हणे आयुष्य हे क्षणभंगूर आहे

पाहते संपूर्ण दुनिया खिन्नतेने......
‘मायबोली’वर कसे होतात राडे! << Proud

कोण मालक? कोण भाडोत्री?....कळेना!
भीक घालावी, तसे देतात भाडे!!<<< Lol

जावयाचा शोध घेताना समजले....
हे म्हणे देशस्थ, ते.....को.ब्रा., क-हाडे!<< Lol

माझियापाशी कळेना काय आहे?
भोवती पडतात माझ्या का गराडे?<< Proud

कोण जळते, काय विद्युतदाहिनीला?
ती रडत नाही.....रडत नाही धुराडे!<< खरे आहे

एक प्रश्न...

"शेरात काव्य असणे गरजेचं आहे का?"

टीप - उत्तर कुणीही द्यावे. प्रोफेसर साहेब देणार असतील तर शब्दमर्यादा ५० शब्द.

प्रोफेसर साहेब देणार असतील तर शब्दमर्यादा ५० शब्द.>>>>>>>>

सरळ सरळ "प्रा साहेब सोडून" असे म्हणायचेस ना रे जितू त्याला कमी शब्द लागले असते कि नै??;)

एक यक्षप्रश्न...........
शेर, शेरातील काव्य, पद्य, काव्य, कविता वगैरे समजायला रसिक असावे लागते काय?
उत्तर कुणीही द्यावे!
शब्दमर्यादा: अमर्याद.....अगदी कुणासाठीही!
टीप: नुसतीच भाडोत्री भावमुद्रित उत्तरे नकोत!
..........प्रा.सतीश देवपूरकर

"शेरात काव्य असणे गरजेचं आहे का?"

प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असायला हवीच. अर्थातच, प्रत्येक शेरात काव्य असायलाच हवे. जिथे काव्यात्मकता नाही, तिथे कविता नाही, तो शेर का म्हणावा ?

नुसतेच यमक जुळवून लिहिलेल्या प्रत्येक लिखाणास कविता म्हणायचे झाल्यास रस्त्याच्या कडेला लावलेल्या सूचनाही कविताच की ! -

"मनाचा ब्रेक
उत्तम ब्रेक"

वगैरे......

बंदही झाली न डोळ्यांची कवाडे!
तोच येवू लागली येथे गिधाडे!!

तोडले आधीच लचके जिंदगीने;
राहिली आहेत आता फक्त हाडे!

वाटती झाडे मला मोठ्या मनाची;
माणसांसाठी खुजी होतात झाडे!

माझियापाशी कळेना काय आहे?
भोवती पडतात माझ्या का गराडे?

कोण जळते, काय विद्युतदाहिनीला?
ती रडत नाही.....रडत नाही धुराडे!

एवढीच गझल वाचली. छान वाटली.
(मला वाटते, सरांच्या मूळ गझला एवढ्याच असाव्यात. याशिवाय ते जे काही लिहितात, ते सरांबद्दलचा आदर कमी करण्यास कारणीभूत ठरणारे असते.)

देवपुरकरमामा हट्ट सोडत नाहीत आणि मामींचेही चुकतेच. गणपतीच्या दिवसांत मामांना मोदक वळायला लावायचे सोडून खुषाल गझल-गुलकांड्या वळू देतात!

झटकनी वाळून जाती पायजामे;
हाय पण ओले रहाती दुष्ट नाडे!!!