ओळखिच्या माणसांना ओळखिचा त्रास होता

Submitted by मयुरेश साने on 21 September, 2012 - 11:43

समजलो सहवास ज्याला तो खरा आभास होता
ओळखिच्या माणसांना ओळखिचा त्रास होता

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता

जन्मभर ओल्याच होत्या पापण्यांच्या ओंजळी अन्
जन्मभर माझ्या तृषेला मृगजळाचा ध्यास होता

पाहिले जेव्हा तुला मी बस् पहातच राहिलो गं
पण किती कोट्यावधीचा अर्थ त्या शून्यास होता

.............मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तास, ध्यास हे शेर उत्तम!
अंतिम शेरात शून्याचा संदर्भ कळला नाही.
जयन्ता५२

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता

जन्मभर ओल्याच होत्या पापण्यांच्या ओंजळी अन्
जन्मभर माझ्या तृषेला मृगजळाचा ध्यास होता

हे आवडले ज्जाम!

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता

हे मस्तच्........ Happy

समजलो सहवास ज्याला तो खरा आभास होता
ओळखीच्या माणसांना ओळखीचा त्रास होता

छान...

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता. .वा !!

आवडली गझल.