विज्ञान आणि अध्यात्म

Submitted by Mandar Katre on 19 September, 2012 - 22:58

श्रीगणेश

या वर्षी गणेश चतुर्थी निमित्त माझ्या मनात आलेले हे काही विचार-प्रवर्तक विचार!

अध्यात्म आणि विज्ञान यांच्यात एक सूक्ष्म सीमारेषा असते ,असे म्हणतात कि जिथे विज्ञान संपते ,तिथून पुढे अध्यात्म सुरु होते.म्हणून अध्यात्माला "सुपर-सायन्स"म्हणतात .

अध्यात्मात नव-नवीन विचार-प्रवाह सतत येत असतात .१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विवेकानंद ,योगानंद आणि इतर अनेक योगीजनांनी भारतीय अध्यात्माची विजय-पताका युरोप-अमेरिकेत फडकवल्या नंतर तेथील अनेक जिज्ञासू साधकांनी अध्यात्माचे वैज्ञानिक पृथ:करण करून प्राचीन भारतीय अध्यात्म एका नवीन दृष्टीकोनातून मांडले. नंतरच्या काळात २० व्या शतकात आणि २१ व्या शतकात सुद्धा अध्यात्माचे अनेक पाश्चात्य अभ्यासक भारतीय अध्यात्म नव्या दृष्टीकोनातून मांडत आलेले आहेत.

२१ व्या शतकात अन्तरिक्ष आणि विश्व यासंदर्भात झालेल्या नवीन संशोधनातून मिळालेली माहिती आणि पचिन भारतीय अध्यात्मिक तत्त्वज्ञान यांची सांगड घालून पहिले असता काही आश्चर्यकारक तथ्ये समोर येतात .आपल्या पूर्वजांचे अवकाश,काल आणि मिती यासंदर्भातील ज्ञान हे आधुनिक वैज्ञानिक संशोधनाशी बर्याच प्रमाणात मिळते-जुळते आहे. तसेच विश्वात अनेक ब्रह्मांडे आहेत ,हे स्टीफन हॉकिंग यांनीही मान्य केले आहेत .

आपण पूर्वीपासून विष्णुलोक ,शिवलोक ,गणेशलोक इत्यादी नावे पुराण-कथा मधून ऐकत आलो आहोत. प्रत्यक्षात ही नावे विश्वातील अनेक ब्रह्मांडातील अन्य स्थानांची असू शकतात .कदाचित येणाऱ्या काळात आपण त्यांचे भौगोलिक स्थान ही निश्चित करू शकू .उदा. शिवलोक हा पृथ्वी पासून ५ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे इ.

आपल्या विविध उत्सवातील गणपतीसारखी देवते ,त्यांच्या पूजा ,मंत्र इत्यादी गोष्टी या "त्या" मिती तून देवतांशी (म्हणजेच थोडक्यात ब्रह्मांडातील गणेश-लोकातील रहिवाश्यांशी) संपर्क साधण्याची साधने असू शकतात. नास्तिक विज्ञान-वाद्यानां ह्या भाकड-कथा वाटतील ,पण जरा विचार करा ,आपण आज ज्या वायरलेस तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य करतो, त्या गोष्टी इ.स.१८२० मध्ये जर कोणाला सांगितल्या असत्या तर त्यावर त्यांचाही विश्वास बसला नसताच!

याचा अर्थ देव आहे ! फक्त विज्ञानाला देवाचा शोध लागायला आणि देव समजून घ्यायला काही वेळ जावा लागेल इतकेच !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

-मंदार कात्रे ,भाद्रपद शु.५, शके १९३५ ,दिनांक २० सप्टेंबर २०१२.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अध्यात्माचे ज्ञान शुन्य आहे... त्यामुळे येथे जास्त लिहीणे योग्य नाही.
मायबोलीवर असा काही नियम नाहीये.
प्रत्येक गोष्टीला का, कशावरून, कुणि सांगितले असे विचारणे, जे लिहीले त्यात पदरचे थोडे टाकून त्याला हास्यास्पद बनवणे, विकृत अर्थ काढायचे, हे असलेच धंदे इथे आलेले एक 'विद्वान' तरी सर्वत्र करत असतात!

त्यांना राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक अशा कुठल्याहि विषयावर असलेच प्रतिसाद देणे जमते.

त्यात काही वाईट नाही म्हणा, अहो माकडाला सुद्धा टाईप करायला दिले तर शंभर वर्षात कदाचित, एखादे अर्थपूर्ण वाक्य लिहील्या जाईल. हे त्यापासून फार वरच्या पातळीवर पोचलेल नाहीत. ते.असेच शंभर वर्षे करत राहिले तर एखादा तरी विचार करायला लावणारा प्रश्न सापडेल त्यातून.
Proud

जुने प्रतिसाद दुसर्‍या का तिसर्‍या कोणत्यातरी 'मिती'त गेले.
झक्की, माकडाचे उदाहरण मस्त आहे पण ते कुणाचे ढापलेय ते ही लिहा Proud

मला जे काही अध्यात्मिक अनुभव आलेले आहेत ,त्याच्या वर समग्र विचार-मंथन करून हा लेख मी लिहिलेला आहे,, पण बरेच चिकित्सक त्या अध्यात्मिक अनुभवांना "मेंदूतील केमिकल लोच्या" असे विशेषण लावून त्या अनुभवांची वासलात लावतात ..............

अध्यात्म जर खरे असेल ,तर त्याचा वैज्ञानिक पडताळा मिळायलाच हवा,,अशा मताचा मी आहे .

अध्यात्म खरे असेल तर वैज्ञानिक पुरावा मिळायला हवा असेही म्हणायचे आणि पुरावा दिला की केमिकल लोच्या केला असेही म्हणायचे.

अध्यात्म आणि विज्ञान यांच्यात एक सूक्ष्म सीमारेषा असते ,असे म्हणतात कि जिथे विज्ञान संपते ,तिथून पुढे अध्यात्म सुरु होते.

>>>>>>>>> म्हणूनच आधी डिस्कवरी चॅनेल बघून झाल्यावर मगच आस्था चॅनेल बघा. त्या दोघांच्यामधे रिमोटचे एक सूक्ष्म बटण असते.

>>>>>>>>> म्हणूनच आधी डिस्कवरी चॅनेल बघून झाल्यावर मगच आस्था चॅनेल बघा. त्या दोघांच्यामधे रिमोटचे एक सूक्ष्म बटण असते.
------ मामी Happy

कोणीही कितीही भौति,/वैज्ञानिक प्रगती केली ,तरी त्या राष्ट्राचा मूळ पाया धर्माधिष्ठित आहे ,हे त्या वाक्यातून सूचित होते,, ........................

देवाचा आणि धर्माचा संबंध असायलाच पाहिजे का ? मी निधर्मी आहे, तरीही ईश्वराला मानतो, असे होऊ शकत नाही का?

सगो, देवाचा धर्माचा नी अध्यात्माचा काहिही संबंध नसू शकतो.
आपल्या आयुष्याशी या तिघांचाही काहिही संबंध नसू शकतो.
(इथे धर्म हा सध्या प्रचलित अर्थानुसार. धर्म म्हणजे जीवन जगायची पद्धत म्हटले तर गोष्ट वेगळी. )
अध्यात्मिक असून आणि धार्मिक असून देव नाकारणारी दर्शने तर भारतीयच आहेत आणि सुसंस्कृत ही आहेत.

मामी, आमच्या केबलवर डिस्कव्हरी आणि आस्थाच्या मधे झूम-इसको देखो, स्टार वर्ल्ड, महुआ, आणि काय काय लागतय त्याचं काय करायचं?

ते अध्यात्माच्या वाटेवरले अडथळे आहेत, वत्सा! ते टाळून जो आस्थावर डायरेक्ट जाईल तो 'पोचलेला' असं मानण्यात येईल. त्याकरता रिमोटचं टॉगल बटण वापरणे हा एक उपाय आहे. स्थितप्रज्ञ लोक ही उपासना करतात. पण काही नतद्रष्ट लोकं अशा स्थितप्रज्ञ लोकांना आळशी म्हणतात.

aamhi jara yegalya panthatale haavo tyakaranane madhalya thesanancha manamurad aswad ghetalyabigaar mokshala pochta yet nhayi.. Happy

हायला, एक मिनिटापूर्वी ३० प्रतिसाद होते.. रिफ्रेश केल्यावर १५. बाकीच्याना मुक्ती मिळाली की काय?

त्यात काही वाईट नाही म्हणा, अहो माकडाला सुद्धा टाईप करायला दिले तर शंभर वर्षात कदाचित, एखादे अर्थपूर्ण वाक्य लिहील्या जाईल. हे त्यापासून फार वरच्या पातळीवर पोचलेल नाहीत

लोक अमेरिकेत गेले तरी माकडच रहातात , तिथे भारतातच राहिलेल्यांची काय कथा! भारत हा मुळातच वानरसेनेचा देश आहे.

मंदारजी,
टी एम हा एक बोगस कल्ट आहे. त्याची लिंकच द्यायची तर योगिक फ्लाईंग चे व्हिडिओही पहा. करमणूक होईल.

अध्यात्म आणि भौतिक विज्ञान यांचे नियमच मुळात फार वेगळे आहेत, त्यामुळे एकाचे दुसर्‍यात करायला गेलात तर जमणार नाही. काय खरे मानायचे याचे नियम अध्यात्मात वेगळे आहेत. जरी बरेच शब्द दोन्हीकडे वापरत असलो, तरी ते वेगवेगळ्या अर्थाने वापरले असतात. ते माहित नसले तर चुकीची माहिती पदरी पडते. स्वतः अंतर्मुख होऊन, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन, प्रचंड विचार करून स्वतः 'अनुभवणे' हे अध्यात्मात महत्वाचे. काही लोकांना आयुष्यभर ते जमत नाही, संत महात्मे लोकांना ते समजते. तसे जमले नाही तर विज्ञान वापरून कळणार नाही.

माकडाचे उदाहरण मस्त आहे पण ते कुणाचे ढापलेय ते ही लिहा फिदीफिदी
लक्षात नाही. आता हे विचारायचे म्हणजे तू २ +२ = ४ हे ज्ञान कुणाकडून ढापलेस , असे म्हणण्यासारखे आहे. अनेक वर्षांपूर्वी ऐकले होते.
लोक अमेरिकेत गेले तरी माकडच रहातात ,
अमेरिकेत आले म्हणजे काही विशेष होते असे काही नाही. ज्यांना चांगले काम करायचे आहे ते कुठेहि करतात, काही जण कुठेहि गेले तरी नालायकच. अमेरिकेत जरा जास्त वाव मिळतो, शंभर वर्षे नुसते टायपिंग करायला. भारतात तेव्हढा वेळ कुणि वाया घालवत नाहीत.