`त्या'ची कथा !

Submitted by कवठीचाफा on 27 September, 2008 - 11:27

गेल्या आठवड्याभराच्या बातम्या पहाताना अचानक ही कल्पना डोक्यात गरगरली आणि म्हणुन टाईपली काही टेक्नीकल चुका असल्या तर समजुन घ्या !
*******************************************************
तो एक उगवता लेखक होता. अर्थात त्याच्या कथा जरी काल्पनिक असल्या तरी त्या सत्यांशावर आधारीत असायच्या. त्यामागची कारणमिमांसा शोधण्यासाठी त्याची चालणारी धडपड नक्कीच उल्लेखनिय होती. अशिच एक कथा लिहीताना त्याला आलेल्या अनुभवाची नोंद त्याने करुन ठेवलेली आहे. आणि योगायोगाने ती माझ्या वाचनात आली. ` सोड यार, लोकांना पटणार नाही' या त्याच्या विरोध दर्शवणार्‍या वाक्याकडे दुर्लक्ष करुन मी त्याची ती नोंद आपल्या समोर मांडत आहे. त्याच्याच शब्दात.

*************************************************************

सृष्टीतल्या पॉझेटिव्ह आणि निगेटीव्ह ह्या दोन्ही बाजु मला नेहमी आजपर्यंत संभ्रमात टाकत आल्या आहेत. विज्ञानाच्या नियमानुसार जर एखाद्या ठिकाणी पॉझेटीव्ह शक्ती उपलब्ध असेल तर निगेटीव्ह शक्तीही अस्तित्वात आहे. या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजु आहेत. जसे दिवस हा पॉझेटीव्ह मानला तर रात्र ही निगेटीव्ह मानावी लागेल. आगदी तसेच. आता गुरुत्वाकर्षणाला निगेटीव्ह मान्य करुन त्या विरुध्दची पॉझेटीव्ह शक्ती शोधण्यात नाही का वैज्ञानिक अत्यंतीक मेहनत करत आहेत.
आजुबाजुला पहाता अश्या अनेक घटना दिसुन येतात. माणुस जागा असतो म्हणजे कार्य करत असतो थोडक्यात तो काहीतरी पॉझेटीव्ह करत असतो. त्यावेळाची त्याची शरीरावस्था आणि रात्री तो झोपल्यानंतरची शरीरावस्था आगदी एकमेकांच्या विरुध्द असतात. माणसात जशी सत्प्रवृत्तीची माणसे असतात तशी खलप्रवृत्तीची माणसेही असतात. म्हणजे पुन्हा हे अधिक उणे सारखेच झाले की.
माझ्या मनात अशी अनेक उदाहरणे येत राहीली. आपण देव मानतो की नाही ? जर देव म्हणजे पवित्रता आणि मांगल्याचे प्रतिक मानले तर कुठे ना कुठे अपवित्रता आणि अमांगल्याचे वास्तव्य असणारच. आणि खरोखर असे असेल तर आपले पुराण ग्रंथ सांगताहेत ते खरच मानायला हवं. म्हणजे मला तरी असं वाटतय की आता कली युगाचा काळ चालु आहे. म्हणजे इतर तिन युगांना या त्यांच्या अगदी उलट कार्य करु पहाणार्‍या युगालाही मान्यता द्यावि लागलीच होती.
आता माझा प्रश्न असा आहे की जर पृथ्वीवर कलीयुग चालुच आहे तर त्याचा स्वामी कली हा काही एकटा काम करु शकणार नाहीच ना! मग त्याच्या सोबत कदाचीत आणखी काही अहीतकारी शक्ती कार्य करत असतील. आणि जर तसे असेल तर या शक्तींना मर्यादा घालण्यासाठी मानवच पुढे सरला पाहीजे. अंSSहं गैरसमज करुन घेउ नका मि काही अध्यात्माविषयी बोलत नाहीये. मानव या अमंगल शक्तींशी सामना करण्यासाठी सरसावला पाहीजे हे मी अश्या कारणाने म्हणतोय की केवळ मानवी वारसाच सर्व युगातुन पुढे पुढे सरकत आजच्या पिढीपर्यंत आला आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर बाकी तिन्ही युगात आपले पुर्वज असलेच पाहीजेत. नावे जुळत नसतिल तरीही कारण नावे अडनावे ही भौगोलिक परीस्थीती आणि अधिकार यावर ठरवण्याची रुढीच आहे. मग अश्या मानवाशी संघर्ष करुन या निगेटीव्ह पॉवर्सना काही साध्य करायचे म्हंटले तर खुपच कठीण जाईल ना? पुन्हा त्यांची बरीचशी शक्तीही त्यात खर्च होईल. मग त्या अमंगल शक्तींना या पृथ्वीतलावर राज्य करण्यासाठी वेळ आणि ताकदही फ़ार कमीच मिळेल हे ही तितकच खरं.
या गोष्टीवर फ़ार विचार केल्यावर आणि थोडा अभ्यास केल्यावर मी काही अनुमान केले. कदाचीत चुकीचेही असतिल पण तरी नोंद करुन ठेवतो आहे. त्यांचे प्रयत्न सहजासहजी यशस्वी होत नाहीत असे जाणवल्यावर जर त्यांनी आपल्याच इतीहासाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला तर ? आगदी पुराणापासुन जरी पाहीले तरी देव असो की मानव गैरसमज झाल्याने पाशवी कृत्य केल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. जर नेमक्या याच दोषाचा वापर करायचा म्हंटल तर? जवळपास सगळेच मानव एकमेकांबद्दल गैरसमज करुन घेउन आपापसात लढुन नष्ट होतील. आणि पुर्ण पृथ्वी त्यांच्या ताब्यात जाईल.

***********************************************************

इथपर्यंत त्याचे लिखाण सलग होते पण इतके लिहील्यावर त्याचा पी.सी. अचानक बंद पडला. विशेष म्हणजे त्याच्या हार्डडिस्कचा हेड खराब झाला. हे सहजासहजी घडत नाही पण तसे घडले त्यामुळे त्याचे हे लिखाणही उडायचेच पण तो ते सवयीप्रमाणे पेनड्राईव्हवर सेव्ह करत असल्यामुळे वाचले. या नंतर बराच काळ मधे गेला. पण त्याच्या डोक्यातुन त्या विषयाचे वेड कदाचीत गेले नाही. तो अनेक ग्रंथ पालथे घालत राहीला आणि अनेक जाणकारांच्या भेटी घेत राहीला. त्यानंतर त्याचे लिखाण पुढे चालु झाले अर्थात दुसर्‍या पी.सी. वरुन.

****************************************************************
मागचे माझे लेखन अर्धवट राहील्याचे दुख: व्हायच्या ऐवजी मला आनंदच होतोय. जरा चमत्कारीक विधान वाटत असेल ना हे ? पण खरे आहे ते. कारण त्या नंतर मी अश्या काही व्यक्तींच्या भेटी घेतल्या. मला वाटणार्‍या शंकेबद्दल त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची मते विचारली. विचार केला होता कदाचीत त्यांना माझी कल्पना हस्यास्पद वाटेल. एक-दोन तसे अनुभवही आले पण सगळ्यांकडूनच नाही. काही असेही लोक मला भेटले की ज्यांना माझ्या कल्पनेत रस वाटला. त्यांच्या मते फ़ार पुर्वीपासुन असा चांगले विरुध्द वाईट असा लढा चालु होता. पुराणांमध्ये असा उल्लेख अढळतो. फ़ार पुर्वीपासुन जगातल्या वाईट शक्ती जगाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण प्रत्येक वेळी आपल्या दैदिप्यमान वारसा लाभलेल्या मानवांच्या काही प्रतिनीधींनी त्यांचा प्रयत्न हाणुन पाडला आहे. त्यांनी दिलेली उदाहरणे कदाचीत खुप क्लिष्ट होती. पण त्यातल्या त्यात समजु शकेल असे उदाहरण म्हणजे `महाभारत' जरी महाभारत कलीयुगात घडले नसले तरी त्यावेळची लढाई ही केवळ मानवांची नव्हती तर सुष्ट आणि दुष्ट शक्तीं मधली लढाई होती. आणि श्रीकॄष्णाच्या अमोघ मार्गदर्शनाखाली सुष्ट शक्तींनी ती जिंकलीही होतीच.
एकंदरीत अनेकांची मते ऐकल्यावर मला मी योग्य वाटेवर आहे असे वाटले. माझा पी.सी. ऐनवेळी बंद पडल्यामुळे मी त्याच्याच विचारात होतो. आणि आता या दुसर्‍या पी.सी. वर लिहीण्यासाठी बसल्यावर माझ्या मनात सहजच विचार आला. जर आजच्या काळात काही दुष्ट शक्तींना ज्यांना या त्रिमीत अवकाशात जागा नाही. अर्थात मी हे याच कल्पनेच्या आधारावर म्हणतोय की आत्तातरी त्या पृथ्वीवर पुर्ण स्वरुपात अस्तित्वात नाहीत पण कदाचीत पृथ्वीवर प्रवेश करु शकतात आपण पाताळलोकाची कल्पना नाही का मान्य करतो? अश्यांना जर पुन्हा पृथ्वीवर आपले राज्य प्रस्थापित करायचे असेल तर त्या कोणता मार्ग अवलंबतील? त्यांना सहज मार्ग मोकळा नसेल तर ? पुराणातलाच दाखला घ्यायचा तर कलीने सोन्यात रहाण्याची मागणी केली होती. म्हणजे जिथे सुवर्ण असेल तिथे त्यांचा संचार होवु शकेल हे नक्की. कारण या दुष्ट शक्ती अखेर कलीचा वरदहस्त लाभलेल्याच आहेत. मग आज तरी भारत तोही काही प्रांतच सोडला तर सुवर्णाचा वापर करतच कोण? म्हणजे हा त्यांच्या संचाराचा मार्ग बंद होणार हे नक्की. तरीही त्यांचा वावर आपल्या जवळपास होणे अनिवार्य आहे. आणि मी चमकलो कधीतरी कुठे तरी वाचलेली माहीती आठवली की आजकाल मायक्रोचीप बनवण्यासाठी किंचीत का होईना सोने वापरले जाते. आणि मायक्रोचीपने तर अख्खं जग भरुन गेलय. जर त्यांनी त्यात प्रवेश मिळवलेला असेल तर?

**************************************************************

या वेळी तो वापरत असलेल्या पी.सी. च्या बिघाडामुळे त्याचे लिखाण खंडीत झाले होते. पुन्हा एकदा पेन ड्राईव्हवर लिहीलेले सेव्ह करुन घेतल्यामुळे ते लिखाण मात्र वाचले. आजकाल पी.सी.त व्हायरस कुठून शिरतील ते कळत नाही. पण आपल्या पुन्हा दुरुस्त केलेल्या पी.सी. वर त्याने पुढेचे लिखाण चालु ठेवले.

****************************************************************

पुन्हा एकदा पी.सी. ने दगा दीला. पण त्याबरोबरच माझ्या विचारांची दिशा एका ठीकाणी वळवली. आजकालच्या सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या वस्तु कोणत्या? मोबाईल, कंप्युटर जवळपास पाउण जगाचे काम त्यावरच चालते. आणि या दोन्ही वस्तुंमधे मायक्रोचीप असतात.
आता माझ्या कल्पनेनुसार मानवावर समोरासमोर लढून मात करता येणार नाही मग त्याला संपवण्याचा दुसरा मार्ग कोणता? मानवाला आपापसात लढायला भाग पाडणे. जर असे घडले तर. पुन्हा विध्वंस, जसा त्यांनी काही मानवी मनांच्या अंतरंगात शिरुन पुर्वी दोनवेळा घडवला होता. पण यावेळचा विध्वंस पुर्ण मानवजात नष्ट करण्या इतपत मोठा असेल हे सर्वांनाच माहीत आहे.
पण मुळात मानवाला आपापसात लढवणार कसा? कदाचीत त्यांच्यात एकमेकां विषयी गैरसमज पसरवुन. त्या साठी कदाचीत या मायक्रोचीपचा वापर करण्याचा त्यांचा मानस असेल. आजकालच्या घटना पहाता मला त्याच प्रकाराची सुरुवात वाटते.

एका मान्यवर मोबाईल कंपनीने मोबाईल बनवले काही वर्षे ते ठीकठाक आपले कार्य बजावत राहीले आणि अचानक त्यांचे स्फ़ोट व्हायला लागले एका मागोमाग एक असे. त्या कंपनीने आपल्या मोबाईलच्या बॅटरीज बदलुन दिल्या पण स्फ़ोट नक्की बॅटरीच्या दोषामुळे झाले होते? कारण मोबाईल मधे मायक्रोचीप असते.
एका देशाच्या अती गुप्त संस्थेच्या वेबसाईटवर अचानक घुसखोरी होते तिथे काही प्रक्षोभक वाक्ये लिहीली जातात आणि आणि ती एका परक्या देशाच्या नावे असतात. नक्की ते हॅकींग असते? कारण कंप्युटर मधेही मायक्रोचीप असते.
आपल्याच देशात ठिकठिकाणी धमकीचे ई-मेल केले जात आहेत आणि ज्याच्या पी.सी. वरुन ते केले जात आहेत त्यालाच त्याचा पत्ता नाही. आता हा हॅकींगचा प्रकार असेल असे आपण गृहीत धरतो. पण खरोखर तसे नसेल तर? कारण पुन्हा सर्वर म्हणजेच एक मायक्रोचीप असलेले उपकरण आहे.
हळुहळु या प्रकाराची तिव्रता वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीच ना ? आणि जर ती तशी वाढत गेलीच तर? अण्वस्त्रधारी देशांचे बहुतांश संचालन कंप्युटर द्वारे होतेय आणि मायक्रोचीप हा त्यातला अविभाज्य घटक आहेच.

पण हे सारे शेवटापर्यंत निदान मानवजातीच्या अस्तापर्यंत जाण्या आधी आपल्याकडे एक मार्ग आहे. तो ही आपल्या धर्मग्रंथांत सांगितलेला आहे की.
`[][][][][][][][][][][][][][][][][][[][][][][]][][][][]][][][][]][][][][[][][][][][][]][][][][]][][][]][][][][][][[]][][][][[]][][][][][][][]][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][[][][]][][][][][][][][][][][][]
***************************************************************

या पुढे त्याने असे विचीत्र भाषेत काय लिहीले आणि का लिहीले ते मला तरी अजुन लक्षात आले नाहीये. आणि त्याचा काहीच पत्ता नाही, जर त्याला मार्ग तर सापडला मग त्याने तो अश्या भलत्याच निरर्थक खाणाखुणांनी का लिहीला? की व्यवस्थीत लिहीलेला तो भाग बदलल्या गेलाय? काही सांगु शकत नाही कारण मी देखील हे सारे लेखन त्याच्या पी.सी. मधुनच घेतलेय.
सध्यातरी या सुवर्णयुगात सांभाळून राहीलेले बरे नाही का ?

गुलमोहर: 

चाफ्या मस्त रे!
जमली आहे.
तो लेखक जरा "हा"च आहे पण.
त्याच्या डोक्यात <<मायक्रोचीपने तर अख्खं जग भरुन गेलय. जर त्यांनी त्यात प्रवेश मिळवलेला असेल >>
ही कल्पना चमकुनदेखील पीसीवरच सगळ लिहित राहिला. Happy

चाफ्फा, सही रे.. कथा चाफ्फा स्टाईलच आहे पण मांडणी वेगळी आहे जरा कथेची .. आवडली... Happy

अफाट कल्पना. चाफा भन्नाट.

मस्त.. कल्पना खरंच भन्नाट आहे..

कल्पना भन्नाट सुचली...
मस्तच !!!
-----------------------
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

कसं काय रे सुचतं तुला असं भन्नाट काय्च्या काय! Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल , पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

चाफ्या जमली आहे रे Happy
मस्तच एकदम Happy

नेहमीप्रमाणे खुप छान!

एक सुचना...

सध्या टीवीवर सगळ्या टाइपच्या मालिका आहेत (गुढकथा, हॉरर सोडुन्..सॉरी "वहिनी साहेब" हा सन्माननीय अपवाद वगळुनः) तुमच्या काही कथा वाहिन्याना पाठवा..त्यावर चांगली मालिका होउ शकेल्..आम्हाला पहायला आवडेल.

चाफ्फ्या रे............चाफ्फ्या रे................ खुप छानच रे..........

mansmi18 ला सहमत....

मस्तच.......... माझ्या लॅपटॉप मधली मायक्रोचिप बदलायला पाहीजे............

चाफ्या,
वाचायला उशिर झाला खूप. कथा एकदम सही आहे. Happy