आठवणींच्या पागोळ्यांनी पाख मनाची ठिबकत होती!

Submitted by सतीश देवपूरकर on 14 September, 2012 - 11:26

गझल
आठवणींच्या पागोळ्यांनी पाख मनाची ठिबकत होती!
डबडबलेल्या डोळ्यांमधुनी हताश आशा निथळत होती!!

डोक्यामध्ये राख घालुनी शिवले त्याने ओठ स्वत:चे;
हृदयामध्ये एकसारखी मुकी वेदना ठणकत होती!

दुनियेला आताशा दिसते गझलांचे कारंजे माझ्या;
कितीक दशके गझलच माझ्या काळजामधे झिरपत होती!

प्रत्येकाच्या चेह-यात मी तुझा चेहरा पहात होतो!
माझ्यासाठी तेच सत्य! दुनियेसाठी ती फसगत होती!!

तुझे बहर उधळीत निघाली ही वा-याची झुळूक बहुधा;
तुझ्याच गंधामुळे कितीदा झुळूक सुद्धा झिंगत होती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझे बहर उधळीत निघाली ही वा-याची झुळूक बहुधा;
तुझ्याच गंधामुळे कितीदा झुळूक सुद्धा झिंगत होती! ... व्वा अफलातून सर. खुप आवडले? Happy

दुनियेला आताशा दिसते गझलांचे कारंजे माझ्या;
कितीक दशके गझलच माझ्या काळजामधे झिरपत होती! -------- इथे थोडीशी लय खटकते.

दिसते गझलांचे कारंजे माझ्या;>>>>>>>>> दिसती गझलांचे कारंजे माझ्या......असे हवे बहुधा

चुकत असल्यास क्षमस्व!!!