आकडेमोड

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 September, 2012 - 13:21

कितीक आली
कितीक गेली
मोजदाद ना ज्यांची,
नुसती खाडा-खोड !

जीवन म्हणजे सुखदु:खांची आकडेमोड !!!

कुणी करावी
किती करावी
मोजमाप ना ज्याचे,
नुसती डोके-फोड !

आयुष्याचा मूलमंत्र आहे तडजोड !!!

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

छान