कृष्णा रे !!

Submitted by pradyumnasantu on 9 September, 2012 - 14:24

धवल क्रांतीचे जनक, साऱ्या देशाचे गवळी म्हणून नावाजले गेलेले साक्षात भगवान कृष्णच म्हणावे असे वर्गीज कुरीअन आपल्याला सोडून गेले. स्वत: मेटलर्जिकल एंजिनीअर असून त्यांनी आयुष्यभर दुधाची साथ धरली. स्वर्गीय लालबहादुर शास्त्रीजींच्या आग्रहास्तव दूध संस्थेचा कारभार स्वीकारून आणंद येथे चमत्कार घडवला. सारे जग गाईंचे दूध भुकटीसाठी वापरत असताना भारतातून म्हशींच्या दुधाची पावडर बनवून जगाला अवाक केले. कोट्यवधी बालकांची दुधाची तहान भागविली. कुरिअन यांना विसरू तर ती दुधाशीच प्रतारणा होईल. त्यांना ही माझी अल्पबुद्धी आदरांजली.)

किस्ना सम्हाल रे सम्हाल आपुल्या गाई
मन तुझ्याविना मुळीच लागत नाई
तू गाईंच्या आचळी अमृत भरले
भारतमातेला तूच छातीशी धरले
तुप, खवा, श्रीखंडही त्यात
जनतेच्या पडले मुखात
अमुल हे नाव हो सार्थ
दुध पिऊनी बाळे हसली ठायी ठायी
मन तुझ्याविना मुळीच लागत नाई
आणंदाचे गोकुळ तूच बनवले
पांढऱ्या क्रांतीप्रती नेले
काळ्या आयांच्या दुधाची भुकटी करूनी
तू विश्वाचे नेत्र दीपवले
तू असुनी खाण अभियंता
काळ्याची केलीस श्वेता
आनंद दिला भगवंता
जिव कृतज्ञतेने भरुन माझा जाई
मन तुझ्याविना मुळीच लागत नाई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळ्याची केलीस श्वेता
आनंद दिला भगवंता>>>>>>>>

वर्गिस कुरीयन याना अभिवादन ..मानाचा मुजरा !!!
__/\__
धन्यवाद या कवितेसाठी