वरदान

Submitted by स्मिता द on 26 September, 2008 - 02:42

वरदान...

सगळे सुख मागतात
मी दु:ख मागते
सोसायची ताकद मला
अधिक बळकट करते

आदळुन आदळुन लाटा
एकावर एकशा
किनारे झाले खदकांचे
अभेद्य कवचाचे

सुखाचे काटे आता
आरपार बोचतात
वेदना त्याच्या
शरीरभर झिणझिणतात

ओढुनताणुन उसने सुख
नको आता मनाला
दु:खाचे आंदण गाव
वेस त्याची जन्मापार

सरावलेल्या दु:खाना
सुखाचे अडखळणे
मळलेल्या आयुष्यवाटेचे
उगाचच चाचपडणे

गुलमोहर: 

सरावलेल्या दु:खाना
सुखाचे अडखळणे
मळलेल्या आयुष्यवाटेचे
उगाचच चाचपडणे

बासुरीचे सुर हे..........