निद्राप्रहर

Submitted by भारती.. on 8 September, 2012 - 09:33

निद्राप्रहर

रत्नखचित कुंडलसे खुपते
विमान रात्रीच्या गालावर
तमात झिळमिळत्या लाटांतून
प्रतिबिंबांची झगमग थरथर

काठावरचे शहर निवाले
निद्राप्रहराकडे निघाले
विस्मृत सुंदरतेची गाथा
क्षण माझ्याही मनात डोले

''सुभग अशी ही वेळ एवढीच'' -
सळसळून सांगे गुलमोहर
''जळे एरवी नभी निखारा
धगधगतो अग्नी शाखांवर''

मयवनातल्या चिरयुवतीसम
रात्र चढे घालीत मोहिनी
खिडकीमध्ये रेलून मी तो
रूपसोहळा साठवते मनी

नि:शब्दातच गाज उमटते
नेणिवेत मिटते महदंतर.
संज्ञांमध्ये नीज दाटते
रातराणी दरवळल्यानंतर..

-भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान. रात्री घरी परतताना मी ही घटिका अनुभवली आहे. पण इतक्या छानपणे व्यक्त करता आली नसती कधीच. त्यात घरच्यांचे चेहरे पाहण्याची आणि उबदार वातावरणात परतण्याची हुरहूरही असते. मला तुमचे शब्द वैभव खूप आवडते.

धन्स सुधाकर, अश्विनीमामी.. होय खरेच एक शांतसुंदर अनुभव दिवसाच्या वर्दळीनंतर अन समुद्र सान्निध्याचा संदर्भ त्या शांतीला एक वेगळे परिमाण देणारा.

तुमची शब्दकळा सुंदरच आहे.
पण "खिडकीमध्ये रेलून मी तो
रूपसोहळा साठवते मनी "
"रातराणी दरवळल्यानंतर.. "
या ओळीत भलत्याच वस्त्राचे ठिगळ लावल्यासारखे वाटले. मोहवनातील चितयुवती हे शब्द वाचल्यावर पुढे खिडकीऐवजी गवाक्ष हवे का? असे वाटले.

मोहवनातील चितयुवती Lol ... चितयुवती न्हवे चिरयुवती

पण मयेकर तुमचे म्हणने ही काही अंशी खरे आहे बरका?

ते रात्रीचे विशेषण आहे.. मी फक्त साक्षीभावाने तिचं कालातीत सौंदर्य न्याहाळतेय.

भरतजी, सुधाकर,कवितेत मूळ शब्द 'मयवनातल्या ' असा सुचला होता पण तो उगीच उर्दू 'मय' च्या अंगाने जाणारा वाटला म्हणून बदलला ,त्यामुळे मीही थोडीशी अस्वस्थ होते.

पण गाडे पुनः तिथे आलेच! कवितेची सेंद्रिय संपूर्णता ( poem is an organic whole !) म्हणतात ती हीच असावी.. ते ठिगळ तुम्हालाही जाणवलेच. कमाल आहे.

मूळ शब्द टाकतेय. मयवन- मायावी वन (मयासुराचा संदर्भ) असा मूळ दुर्बोध वाटू शकणारा शब्द. दुर्बोधतेच्या आरोपाच्या भयाने हा बदल केला होता, पण एवितेवी तो आरोप येणारच तर आपल्याला जे अभिप्रेत आहे त्यात तडजोड कशाला :)) ??

आणि हो,'रातराणी दरवळल्यानंतर' हे कडवं वेगळं, समारोपाचं आहे. त्याची गल्लत इथे नको.

धन्स !

सुध्या, का रे स्वतःची दुबळी बुद्धी जेथेतेथे दाखवून देतोस? भरतमामाला ते माहीतच आहे, तो मुद्दाम चितयुवती म्हणतोय. म्हणे काही अंशाने खरे. सुधाकर काव्यछत्र प्रायव्हेट लिमिटेडच्या तंबूखाली निगरगट्टांचा कंपू बनवून नाचू पाहू नकोस.

भारती बिर्जे डि... | - तुम्हाला तुमची कविता समजली की मला अर्थ सांगाल का? समजली नाही तरी सांगा. इथे दोन्हीला परवानगी आहे. एखाद्याच आठवड्याच्या अंतराने तुमचे आणि देवमामांचे पाय माबोला लागल्याने बाफ अन बाफ धन्य झाला. रात्रीच्या गालावर विमान हे उन्हातान्हात विनाकारण नाचणार्‍या मोरापेक्षा विकट व खच्चीकरण करणारे आहे. रात्रीच्या गालावर विमान आणि अंधारात झिळमिळत्या लाटा? एकटाकी कविता आहे ना ही? लब्बाड कुठल्या. लिटल जिमी, या मोठ्या मावशी आहेत, भारती बिर्जे डि मावशी. यांना वाकून नमस्कार कर आणि पळत सूट. या रात्रीच्या गालावर विमान आणतात, तू नमस्कार केलास तर तुझा बेडूकही करतील.

काय म्हणतोस? बेडूकच होतास आधी? मग असा कसा झालास? काय म्हणतोस? 'इतिहासाचा अभ्यास हवाय कशाला'? बरं बाई. राहिलं.

भारती मावशी, ही कविता समजून घेण्यात मदत लागली तर मला सांगा हो, संकोच नको अजिबात

चल जिमी, रात्र झाली, आता गुंड जमू लागतील

सदबुध्दी भाग्यशाली मोहिनीताई,
-------- लोटांगण,

आपण माजसारख्या यःक्श्चीताच्या परम आज्ञातावर केलेले दोषारोप हे सर्वार्थाने अतियोग्य आहेत. मानवी जीवनातल्या अचुक विवेकतेची आपल्या पायात स्वतः ज्ञान लालसेने चालून आलेली परिसिमा व आपल्या
प्रखर तेजाने सदा दैदीप्यमान असलेल्या बुधीवैभवाला मी पामर पुन्हा एकदा मनोभावे लोटांगण घालीतो आहे,
कृपया सविनय स्विकार करावा. आणि माझ्या रिक्त स्थंडिलात दोन ज्ञानाचे कण टाकावेत. आजच्या या सोनेरी क्षणापर्यंत माझ्या गाठी काही अज्ञानाचेच कण होते जे मी माझ्या अगाध अज्ञानाने ज्ञानाचे समजत होतो. त्यातीलच एक म्हणजे काव्य हे सर्वव्यापी असते. परंतू ते एक काव्यछत्र प्रायव्हेट लिमिटेड आहे. हे कळताच मी माझा स्थंडिल पालथा केला. धन्यवाद.

आपला चरणपुजक,
सुधाकर..

काठावरचे शहर निवाले
निद्राप्रहराकडे निघाले

नि:शब्दातच गाज उमटते
नेणिवेत मिटते महदंतर.
संज्ञांमध्ये नीज दाटते

<<<

अनेक ओळी फार आवडल्या.

===========

सुधाकर काव्यछत्र प्रायव्हेट लिमिटेडच्या<<< Lol

माझ्या रिक्त स्थंडिलात दोन ज्ञानाचे कण टाकावेत. आजच्या या सोनेरी क्षणापर्यंत माझ्या गाठी काही अज्ञानाचेच कण होते जे मी माझ्या अगाध अज्ञानाने ज्ञानाचे समजत होतो<<< Lol

भरतीताई प्रतिसादास झालेल्या दिरन्गाईसाठी क्षमस्व

थोडक्यात सान्गतो
मला ही कविता म्हणजे आजची "औदुम्बर" वाटली

सळसळून सांगे गुलमोहर>>>>>>>>>>>

खिडकीमध्ये रेलूनमी तो >>>>>>>>>>>>>>>
अशा अनेक ओळी त्याची साक्ष देत आहेत जणू

खूप खूप धन्यवाद!!

वैवकु

मोहिनी ! ''रात्र चढे घालीत मोहिनी.." पण तू तर रात्र झाल्याबरोबर गुंड जमतील म्हणतेस. तेव्हा कवितेचे अन तुझे जमणे कठीणच. माझी कविता काहीजणांना आवडते, त्यात तू नाहीस, पण तरीही माझी भाची आहेस, कविता हे एक वेगळे धर्मक्षेत्र असते काहीजणांसाठी एवढेच समजून घे सध्या. तुझी बाकीची आकलनशक्ती बदलणे मला शक्य नाही :))

आकलनशक्ती अधू असली तरी तुझी विनोदबुद्धी अफाटच आहे,तुझ्यावर रागावणे कठीण जाते त्यामुळे. पण कवितेवर आचरट कॉमेंट करून टाळ्या अन हशे मिळवण्याऐवजी काही स्वतंत्र विनोदी लेखन कर बाळा , नाहीतर तुझ्या गुंडगिरीपासून कवितेला वाचवावे लागेल..

बेफिकीर, वैभव, विक्रांत, विभाग्रज,धन्यवाद, तुमचे प्रतिसाद वाचून हायसे वाटले.

मोहिनी ! ''रात्र चढे घालीत मोहिनी.." पण तू तर रात्र झाल्याबरोबर गुंड जमतील म्हणतेस. तेव्हा कवितेचे अन तुझे जमणे कठीणच. माझी कविता काहीजणांना आवडते, त्यात तू नाहीस, पण तरीही माझी भाची आहेस, कविता हे एक वेगळे धर्मक्षेत्र असते काहीजणांसाठी एवढेच समजून घे सध्या. तुझी बाकीची आकलनशक्ती बदलणे मला शक्य नाही )

आकलनशक्ती अधू असली तरी तुझी विनोदबुद्धी अफाटच आहे,तुझ्यावर रागावणे कठीण जाते त्यामुळे. पण कवितेवर आचरट कॉमेंट करून टाळ्या अन हशे मिळवण्याऐवजी काही स्वतंत्र विनोदी लेखन कर बाळा , नाहीतर तुझ्या गुंडगिरीपासून कवितेला वाचवावे लागेल..

ऑ? अग ए? तुझी भाची मी नैये. हा जिमी तुला मावशी म्हणतो. मलाच बाळा अशी हाक मारतेस? जिमीचे वय आता ५९ आहे. पुढच्या वर्षी साठी शांत आहे त्याची. मॅनेजमेन्टने आधीच शांत केली नाही तर.

आणि मी लिहिणारच आहे मुळी आज. माझ्या धारदार लेखणीच पाणी मी सर्व कलमी मोरांना पाजणार. मग ते मोर उन्हातच काय पावसातही नाचणार नाहीत ही या मोहिनी पवारची प्रतिज्ञा आहे. माझी आकलनशक्ती अधू? माझी गुंडगिरी? हायजॅक करून तू विमाने रात्रीच्या गालावर नेणार आणि प्रतिसाद दिलेत तरच विमान सोडेन म्हणणार आणि गुंड मी? जिमी, उठलास का? गुड मॉर्निंग. बघ आपण रात्री लवकर निघतो ते बर असत की नाही. आपण गेल्यावर इथे हल्लकल्लोळ उठतो.

मोहिनीजी नमस्ते.............हाय जिमि !!

मला एक सान्गा की रात्र झाल्यावर गुण्ड जे येतात त्याना तुम्ही इतक्या का घाबरता ?
बर स्वतः घाबरता वर आमच्या जिमीलाही घाबरवता हे काही मला मान्य नाही अशाने त्याच्या ५९ वर्षाच्या बालमनावर किती वाईट्ट परिणांम होतात माहित्ये तरी का ??
(५९ वर्शाचे बालपण = म्हातारपण हे दुसरे बालपणच असते या सुविचाराचा सन्दर्भ जोडत आहे)

असो लवकर बर्‍या व्हा या मानसिक आजारातून

वैभ्या, बीबी भरकटेल तुझ्यामुळे आणि पाप माझ्यामाथी लागेल. एखाद्या वाहत असलेल्या पानावर ये हिम्मत असली तर

मोहिनी तू जे कोणी ..... पुरुष की स्त्री कोण आहेस ते अस
वाहत्या पानाची भीती मला दाखवू नकोस
मी तुला अगदी सभ्यतेने सान्गतो की माझा असभ्यपणा तुला झेपणार नाही तुलाच.काय कुणालाही झेपणार नाही ...........

तुझी इच्छाच असेल तर एक काम कर तुझा खराखुरा फोन नम्बर दे तुझा जो काय माज आहे ना तो उतरवीन आज!!
अन हो एक आधीच सान्गून ठेवतो .............एकदाका मी सुरू झालो की कुणाचीही गय करू शकत नाही
अगदी माझा विठ्ठ्ल असला तरी नाहीच जमत मला गय करायला तेन्व्हा साम्भाळून रहा इतकी सूचना मी तुला देवू शकतो फक्त

अन हो ही चेष्टा नाहीये..............
लिटिल जिमीलाही सान्गून ठेव