नाते

Submitted by prafulladutta on 6 September, 2012 - 07:44

तुला पाहून वाटे मजला
आहे नाते पूर्वीचे
नसेन आता कोणी तुझा
पडसाद आहेत अंतर्मनाचे
होतीस कधी पत्नी तू
कधी होतीस माझी सखी
झालीस जेंव्हा मैत्रीण
अन कधी सखी साजणी
रूपे तुझी अनेक पण
आहेस तू अथांग ग
आई म्हणून पाहतो तेंव्हा
मनी येती अनेक अभंग
कितीक जन्मे होतीस तू
माझ्या संगे अनेकदा
का यावेस जन्मास तू
सहचारिणी म्हणून प्रत्येकदा?
माझी कन्या खूपच प्रिय
होती पूर्वी माझी आई
का या जन्मी मी
घालावी नाती दर जन्मापाई ?
असेच माझे अन तुझे नाते
नाही सांगता येत सहजी
म्हणून का काही संकट येते?
नसेल जरी जग याला राजी !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेच माझे अन तुझे नाते
नाही सांगता येत सहजी
म्हणून का काही संकट येते?
नसेल जरी जग याला राजी !>>>>
आई,ताई,मुलगी,पत्नी,प्रेयसी,ही सर्व नाती कवितेत आहेत्,याच्यापेक्षा वेगळं नात आहे का?