मन पाखरू पाखरू
स्नेहा नुकत्याच झालेल्या स्वत:च्या साखरपुड्याच्या समारंभाचा कोम्पुटर वर लोड केलेला अल्बमचा स्लाईड शों पहात होती.आणि बाजूला मराठी गाणी लावली होती .
मी मनांत हसता प्रीत हसे
हे गुपित कुणाला सांगू कसे ?
गाणे वाजत होते गाणे. गुणगुणत मनाशीच हसत , पुन्हा पुन्हा दोघांचे फोटो न्याहाळीत होती. लग्नात कुठल्या प्रकारच्या,कोणत्या रंगाच्या साड्या घ्यायच्या ,पैठणी कोणत्या रंगाची घ्यायची, हेअर स्टाईल कशी करावयाची ब्युटी पार्लरची अपोईटमेंट कधी ,किती दिवस अगोदर घ्यायची ? हनीमूनला जाताना कोणते कपडे न्यायचे ? वगैरे विचार करत होती .मनाचे पाखरू इकडून तिकडे बागडत अनेक विचार करत होते .मन पाखरू थेट लग्न समारंभा पर्यंत जाऊन पोहचले होते. खरच आहे . असेच असते .मनच ते.त्याला पाखरू काय उगाच म्हणतात ? पाखरू जसे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छदाने उडत भरकटत असते.तसेच मन पण या विषयावरून त्या विषयावर उड्या मारत असते. म्हणून तर त्याला कधी चंचल तर कधी उच्छ्रुंखल असे म्हटले जाते
महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला जे प्रश्न विचारले त्यातील एक प्रश्न होता.जगात सर्वात गतिमान काय ? तर युधिष्टीराने क्षणात उत्तर दिले " मन " मनासारखे गतिमान काहीच नाही . क्षणात बसल्या जागी पृथ्वी प्रदक्षिणा करून येणारे,तिन्ही लोकात , तिन्ही जगात इतकेच नव्हे तर तिन्ही काळात फिरून येणारे मनच असते .गत जन्माच्या स्मृतीतून गेल्या जन्मात फिरून येते.
जुन्या आठवणीत मन भूतकाळात जाते. जुन्या वस्तू हाताळताना, फोटो पहाताना मन सहजतेने भूतकाळाशी समरस एकरूप होते. विचारांनी ,कल्पनांनी ,स्वन्पातून मन भविष,भूत ,वर्तमानात सहजतेने विहरते,बागडते,भरकटते भरारी घेते .
देवाने माणसाला डोक्यात मेंदू व शरीरात मन बहाल करून खूपच कृपा केली आहे.त्या मनाचा तो राजा असतो. दोन अक्षरी साधा सुधा वाटणारा शब्द "मन " त्याला किती पैलू आहेत. राग ,लोभ ,द्वेष,भय, आनंद ,दु:ख मद,मोह मत्सर इत्यादी. या पैलू मुळेच मनाला भावना प्राप्त होतात .हेच मन माणसाला मस्त मजेत जगावयाला शिकवते.हे मन सुंदर ,सुद्दृढ , निर्मल असे असते. त्यासाठी त्यावर चांगली जडण घडण करावी लागते ..
लहानपणात मन निरागस असते.त्याला लोभ ,दु;ख ,काळजी , किंव्हा भय वगैरे पैलू पडलेले नसतात .पुढे जवाबदारी मुळे, मोठे झाल्याने, विशिष्ठ संस्कार धडवून वा करून त्या मनाची जडण घडण होते. चांगले- वाईट,आपले-दुस-यांचे ,तुझे-माझे,वगैरे भावना स्पर्शतात .मग मनाचा कठोरपणा वाढतो. दुजाभाव,मोह,स्पर्धा इर्षा स्वार्थ वगैरे पैलू दिसू लागतात . हेच मन पाखरू , भरकटणारे मन या व्यावहारिक जीवनात रागाने द्वेषाने,इर्षेने, स्वार्थाने बसल्याजागी इतरांचा हेवा करते .वाईट चिंतते वा इच्छ्ते .म्हणूनच इंग्लिश मध्ये म्हण
आहे ना , empty mind is devil work shop
हेच मन पाखरू प्रियजनांची काळजी,चिंता करत असतांना कटू प्रसंगी नको नको तेचिंतते.अगदी शत्रूपण विचार करणार नाही असे वाईट विचार करत रहाते.म्हणून त्या मन पाखरा साठी "मन चिंती ते वैरी पण न चिंती "म्हण रूढ झालेली आहे .तर कधी हे मन पाखरू शेख चील्लीतल्या गोष्ट्यी सारखे विचारांच्या ढगात गुरफटत भरकटत जाते . "मी हे करीन, मी ते करीन,मग असे होईल, मला असे वा अमुक करता येईल, मला असे काही मिळवता येईल,.मी अमुक करून दाखवीन.' असे विचार करत, विचारांच्या ढगातले मन, काचेचे भांडे खळकन फुटावे तसे विचारांचे ढग हवेत कोलमडतात .आणि म्हणतात ना जसे,"मनातले मांडे मनातच रहातात "
. यौवनात स्वप्नाळू पणे भविष्याची स्वप्ने हेच मन पाखरू रंगविते. मनानी अनेक प्रवास करते अथवा केलेली प्रवास ठिकाणे गप्पा गोष्टीतून पुन्हा फिरून येते .नवीन घर बांधते ,सजवते ,त्यात मन विसावते सुखावते . आकाशात सूर्योदयी व सुर्यास्ती जसे रंग बदलतात त्या प्रमाणे मन पाखरूचे रंग क्षणोक्षणी बदलत असतात .
स्वप्न म्हणजे पण काय ? दिवस भरात वा कधी काळी केलेल्या विचारांचे मनाचे खेळ .म्हणून म्हणतात्त 'मनी वसे ते स्वप्नी दिसे ' मनातील विचार अंधुकपणे स्वप्नात दिसतात .
रामदास स्वामींनी या मनास जिंका, त्यावर काबू मिळवा याबद्दल "मनाचे श्लोक" लिहून मनास कसे वळण लावावे .हे उत्तम रित्या सांगितले आहे ..जो मन जिंकतो तो जग जिंकतो .हे काही खोटे नाही .पण हे मन पाखरू फार चंचल असल्याने त्यावर ताबा मिळविणे फार कठीण आहे. संत लोकांचे वेगळे आहे त्यांचे तृप्त मन जगाला आनंद देण्यासाठी आहे." आर्ट ऑफ लीविग" अथवा योगशिबिरातून पण आज काल थोडा फार मनावर ताबा काबु मिळवण्याचे प्रयत्न आपण करतो .
यश ,वैभव आनंद ,प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात .पण आपणास हे प्रयत्न करण्यास आपले मनच उद्युक्त करत असते .यशस्वी आयुष्य जगण्यासाठी जिद्द हवी असते. धैर्य हवे असते .आत्मविश्वास हवा असतो. आणि हे सारे आपल्या मनातच असते. आपल्याला जे हवे असते ते मनच आपल्याला देऊ शकते. मन आपल्याकडे खूप काही सतत मागत असते, पण या मनाकडे आपणही खूप काही मागू शकतो .म्हणून हे मनच प्रसन्न झाले तर आपण हवे ते मिळवू शकतो. म्हणूनच म्हणतात ," मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन " तेव्हा या भरकटणा-या मनास प्रसन्न करणे आवश्यक आहे .मन प्रसन्न तर सर्व काही प्राप्त होते .
मन पाखरु पाखरु
Submitted by वैशाली अ वर्तक on 6 September, 2012 - 05:35
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो हो ते सगळ ठिके, पण
हो हो ते सगळ ठिके, पण स्नेहाचे पुढे काय झाले? का तिचे मन उडाले?
अवतार आपण इतकी टोकाची
अवतार आपण इतकी टोकाची प्रतिक्रिया का बर दिली असेल?
बाकिच्या लेखात काहीच वाचण्या सारखे नाहिये का?
वैशाली चांगला प्रयत्न आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.