बेवारस प्रेत पडावे, तो तसा पहुडला आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 5 September, 2012 - 09:19

गझल
बेवारस प्रेत पडावे, तो तसा पहुडला आहे!
रस्त्यावर रहदारीच्या, तो निवांत निजला आहे!!

एकेक पाश नात्याचा केव्हाच गळोनी गेला....
पण, कळे न त्याला आता, तो कुठे जखडला आहे?

ते स्मशान कोठे आहे? प्रेतही केवढे थकले!
हा स्मशानरस्ता त्याचा केवढा रखडला आहे!!

काहीही बरळत सुटतो, धरबंद कशाचा नसतो!
एखादा आटा त्याचा पुरताच सटकला आहे!!

गगनास खुद्द ना ठावे, गगनात किती ते तारे?
धरणीला विचार.....तारा, कोणता निखळला आहे?

हिंडतात पोरे जगभर....नोकरीत रमती त्यांच्या;
पण, जीव मायबापांचा, पोरांत अडकला आहे!

उद्रेक थांबला आहे गझलेच्या प्रतिसादांचा!
तो वाद चौर्यकर्माचा बहुतेक संपला आहे!!

वाटेवर माझ्या येते माझीच राखरांगोळी!
स्वप्नांचा बागबगीचा मी उगा जाळला आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीही बरळत सुटतो, धरबंद कशाचा नसतो!
एखादा आटा त्याचा पुरताच सटकला आहे!!
Rofl असे लिहितात का हो देवमामा कवितेत? पण पटले बाई. नमस्कार कर मामांना लिटल जिमी, आज परत कविता केली आहे त्यांनी.

उद्रेक थांबला आहे गझलेच्या प्रतिसादांचा!
तो वाद चौर्यकर्माचा बहुतेक संपला आहे!!
अहो थ्रीजी आले आहेत तिथे बघितले नाहीत? गंगाधर गुरुजी आणि गंभीर. देवमामा आजच्या कवितेत पक्षी नाही घेतलात एकही? छानै ही कविता.

मोहिनीजी व लिट्टल जिमी!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
आमचा मामा नको करू हं जिमी बेटा!
तुला पण छान, छान कविता करायच्या आहेत ना? मग भोकाड नाही ना पसरणार? चल मोहिनीताईला promise कर बघू.
थ्रीजींकडे अजून मला पहायचे आहे. पण म्हटले प्रथम मोहिनीताईंशी व जिमीशी बोलू, खुश होवू, म्हणजे पुढील कामाला जरा जोम मिळेल.
जिमी बेटा टाटा!
.........प्रा.सतीश देवपूरकर

वैभु, विनन्ती आणि कम्बर हे शब्द अनुक्रमे विनंती आणि कंबर असे लिही बरे आणि दोन्ही विषयांवर एकेक कविता कर. देवमामा बघ रोज एक कविता करतातच मनःस्वास्थ्यासाठी.

लिटल जिमी आता बघ कशी मज्जा येते

एक एक कविता करावी इतका वेळ नसतो माझ्याकडे
क्षमस्व

फार्फार तर एखादा शेर करू शकेन मी त्यासाठीही खूप माथापच्छी करावी लागते मला पण मी केवळ गझलेच्या प्रेमापोटी हे करत असतो
आजही करीन म्हणतो....बघु जमलेच तर ..............

हाय लिट्टिल जिमी बाबा! कसा आहेस?
तू तर अगदी माझ्यासारखाच आहेस की, बुटका. पण मी काही चिडखोर नाही हं!
जिमी, आपण दोघे बुटके आहोत, पण मनाने, दिलाने उंच आहोत की, नाही?
मग, आता भोकाड पसरून मोहिनीला त्रास नाही द्यायचा हं! ती आपली बेस्ट फ्रेंड आहे ना? बघ कसे लोकांना हसवते की, नाही ती! आता शहाण्यासारखे वागायचे बर का! म्हणजे मोहिनीला छान, छान, विनोदी लिहायला मिळेल. त्रास नाही द्यायचा हं तिला. चल, आता, जरा दुस-यांच्या कविता वाचतो हं! टाटा!
..........प्रा.सतीश देवपूरकर

फार्फार तर एखादा शेर करू शकेन मी त्यासाठीही खूप माथापच्छी करावी लागते मला

पण मग बडबड एवढी कशाला करतोस तू? त्रास नको करून घेऊस बाबा.

जिमीला आवडली कविता वैभु, तो टाळ्या पिटतोय. चला जिमी घरी जाऊ आता, साडे सात नंतर गुंड यायला लागतात इथे वेगवेगळे.

जिमी बाबा, मोहिनीकडे लक्ष नको देऊ हं! काही तरीच बोलते बघ. माझा मामा करते आहे बघ ती. जिमी बाबा खर खर सांग, रोज रोज कुठे कविता सुचते का रे? आपल्याला कुठे मोहिनीसारखे रोज रोज छान छान विनोदी लिहिता येते? ती काय बाबा हुश्शार आहे.आपल्या जवळ जुनी शिदोरी आहे, तीच तर आपण पुरवून पुरवून खातो की, नाही? कधी कधी मूड लागलाच, मोहिनीने खूपच आपल्याला खुश केले तर होते एखादी छान छान कविता. हो की, नाही. मग सांग बर तिला छान छान लिहायला, म्हणाव आम्ही बुटकी माणसं वाट पाहतो आहोत तुझी!
बाय, बाय जिमी बेटा!
..........प्रा.सतीश देवपूरकर

चला जिमी घरी जाऊ आता, साडे सात नंतर गुंड यायला लागतात इथे वेगवेगळे.<<<<<जिमी बेटा, अरे थांब! थांबव मोहिनीला पण. मला एकट्याला गुंडामधे सोडून जाते बघ ती! तिला विचार रे जिमी, तुला कशी गुंडांची वेळ माहिती, लब्बाड, कुठली!

मला फार कळत नाही पण मला असे वाटते की "आहे" हे प्रत्येक ठिकाणी लिहायची गरज नसावी कारण "आहे" च्या आधीच्या क्रियापदातही यमक जुळते. कृपया गैरसमज नसावा, प्रतिसाद आवडला नसल्यास मी सम्पादित करेल.

ठिक ठाक वाटली. काही ठिकाणी वृत्तात बसवण्यासाठी किंवा यमक जुळवण्यासाठी ओढाताण झाल्यासारखे वाटले.

एकेक पाश नात्याचा केव्हाच गळोनी गेला....
पण, कळे न त्याला आता, तो कुठे जखडला आहे?

गगनास खुद्द ना ठावे, गगनात किती ते तारे?
धरणीला विचार.....तारा, कोणता निखळला आहे?

<<< व्वा! दोन्हीतला पहिला फार सुंदर, दुसरा उत्तमच (प्रतिमा गृहीत धरून, शब्दार्थ चांगला आहे, पण प्रतिमार्थ उत्तम आहे) Happy

वाटेवर माझ्या येते माझीच राखरांगोळी!
स्वप्नांचा बागबगीचा मी उगा जाळला आहे!!<<<

'मी उगा जाळला आहे' याचे प्रयोजन नीट समजले नाही. पण उरलेला पंचाहत्तर टक्के शेर << व्वा व्वा

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

चिखल्या

आहे ही रदीफ आहे (प्रोफेसर साहेब तिला 'तो रदीफ' म्हणतात हे वेगळे). रदीफ वगळली तर आधीची प्रत्येक ओळ (प्र्तयेक शेराची पहिली ओळ) थोडी / बर्‍यापैकी / पूर्णपणे बदलावी लागेल. बदलताही येईल, पण गझल सुचते तीच मुळी मनातल्या मनात बरीचशी अश्या प्रकारे सुचते Happy

हाय लिट्टिल जिमी बाबा! कसा आहेस?
तू तर अगदी माझ्यासारखाच आहेस की, बुटका. पण मी काही चिडखोर नाही हं!
जिमी, आपण दोघे बुटके आहोत, पण मनाने, दिलाने उंच आहोत की, नाही?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
..........प्रा.सतीश देवपूरकर

हाय लिट्टिल जिमी बाबा! कसा आहेस?
तू तर अगदी माझ्यासारखाच आहेस टकला पण मी काही चेष्टेखोर नाही हं!
जिमी, आपण दोघे टकले आहोत , पण मनाने, दिलाने चान्गले आहोत की, नाही?>>>>>>>>>>>>>>>>>>>>
...........वैवकु

(टीप :आमच्या गावात एक म्हण प्रसिद्ध आहे " लन्गडे कुबडे बुटके अन टकले..कधी म्हणू नयेत आपले !!" कधी कुणावर काय आफत आणतील काही नेम नासतो म्हणे !!)

हाहाहाहाहाह्ह!!!

बेफिकीरजी!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मी उगा जाळला आहे........याच्या प्रयोजनाचा थोडासा खुलासा करतो...
जीवनात माणूस अनेक स्वप्ने पहातो.एखद्या स्वप्नासाठी जीव टाकतो, पण परिस्थिती अशी येते की, त्याला नेमक्या त्याच स्वप्नावर पाणी सोडण्याची पाळी येते. अशा वेळेस जणू तो तेच स्वप्न स्वत:च्या हातांनी जाळून टाकतो. त्याची राखरांगोळी होते. पण, त्याच्या आयुष्यातील पुढील वाटचालीमध्ये अशी राखरांगोळी झालेली स्वप्ने सुद्धा आडवी येतात. जणू त्या स्वप्नांची राखच त्याच्या मार्गात परत उडून येते, म्हणजेच पुन्हा पुन्हा ते स्वत:हून जाळलेले स्वप्न त्याला कुरतडत रहाते. मन दुसरीकडे वळवायचे असते, पण ते स्वप्न काही पिच्छा सोडत नाही.

कधी कधी बदलत्या काळाबरोबर परत वाटू लागते की, मी उगाचच त्या स्वप्नावर डोक्यात राख घालून पाणी सोडले. कदाचित आता या वयात ते स्वप्न पुन्हा साकारणे शक्य होईल का म्हणून मन परत भंडावते. म्हणून मी म्हटले की, स्वप्नांचा बागबगीचा उगाचच जाळला आहे. कारण जाळण्याने प्रश्न सुटलाच नाही. त्याची राखरांगोळीच उडून परत माझ्या वाटेवर येतेच आहे. न साकारता आलेल्या स्वप्नांमुळे, मीच स्वत:हून केलेल्या राखरांगोळीमुळे, माझी पुढील वाटचालही बाधित होत आहे, असे वाटू लागते.

थेथे माझीच राखरांगोळी, म्हणजे मीच जाळलेल्या स्वप्नांच्या बगबगीचाची राखरांगोळी परत माझ्या मार्गात आडवी येते.
जाता जाता एक माझा जुना शेर देतो..........

एक केली चूक अन् आयुष्य इतके फाटले;
की, पुन्हा हातून माझ्या ते न गेले टाचले!
.............प्रा.सतीश देवपूरकर
......................................................................................