आमचा गणपती (घरचा)

Submitted by संयोजक on 5 September, 2012 - 02:47

amacha%20ganapatiCollage.jpg
प्रकाशचित्र तोषवीकडून साभार.

नमस्कार मंडळी,

मोरया रे... बाप्पा मोरया रे!
गणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्‍या गोजिर्‍या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की "अहाहा, क्या बात है!"

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना?
बाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...
गणपती डेकोरेशन निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा, नाविन्याचा विचार, धडपड हे सुद्धा मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.

त्यासंबधीचे थोडेसे.

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे बाप्पा एकदम झकास. आमच्या घरी पण बाप्पा दीड दिवस आले होते. पण ह्या वेळी एक सुख होतं की चांदीची मुर्ती केल्या मुळे बाप्पा ना सोडायला जायचे नव्हते. सजावट वर्षु ताई आणि शोभा १२३ च्या आयडीयांनी आधीच केली होती. इकडे त्याची प्रचि पण टाकली होती. आता बाप्पा बसलेली सजावट

deco1_0.jpgbappa1.jpg

सजावटी साठी प्लास्टीक, बीड्स, मणी, ग्लु ह्यांचा वापर केला. तोरण लोकरीच्या फुलांचे बनवले. बाकी दोन दिवस गोड खाउन आज आता पेढ्यांना हात लावायला कोणी तयार नाही. खुप लोक आली, त्या निमित्ताने भेटी झाल्या. पहिल्या दिवशी आरती करायला रात्री साडे अकरा झाले. मज्जा आली

हा ऑफीस मधला... आमच्या एका पँट्री बॉय ने एका हाती सगळी सजावट केली. मुर्ती लाकडाची आहे.

bappa2.jpg

सगळ्यांचे बाप्पा आवडले....

आमच्याही घरी दरवर्षी प्रमाणे बाप्पांचे आगमन झाले.

IMG_2621-MB-2.jpgIMG_2621-MB.jpgIMG_2621-MB-3.jpg

सगळे बाप्पा मस्तच आहेत!!
बाप्पाची क्षणचित्रे इथे पहाता येतील.
हा आमचा घरी नॅचरल क्लेपासुन केलेला बाप्पा
dsc_6119.jpgdsc_6226.jpg

हा माझ्या माहेरचा गणपती. आरासाची कल्पना व आरास हे वहीनीचे कलाकौशल्य आणि भावाची तिला मदत. त्यामुळे दरवर्षी नाविन्यपुर्ण आरास असते. यावर्षी तुळजाभवानी साकारली आहे.
ganpati.jpg

सगळ्यांचे बाप्प्पा छान आहेत.

प्रिती , तुमची क्लिप खास आवडली. ( हे पाहून पुढल्या वर्षी करायचा विचार आहे (सध्या तरी वाटतय तसं))..

मोरया रे... बाप्पा मोरया रे!
|| ओंनमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरुपा ||
श्री समर्थ रामदास.
श्री गणेशाय नमः

Rushi 228.jpgRushi 236.jpg

सगळ्यांचेच बाप्पा खूप छान आहेत. घरी बनवलेल्या मूर्ती खासच.

हा आमचा बाप्पा.

आरास सासूबाईंनी केली आहे. गरबा खेळण्याच्या टिपर्‍या, छोटा चोरंग आणि साधी साखळी यांनी बाप्पंसाठी झोपाळा बनवला आहे. बागेतल्याच कुंड्यांनी भोवतीची सजावट केली आहे. छोट्या श्रियानी या कामात आज्जीला खूप मदत केली आहे.

Aamacha Bappa1.JPGAamacha Bappa2.JPGAamacha Bappa3.JPG

व्वा वा सुंदर! सगळ्यांचे बाप्पा आणि सजावटी मस्त!

नील. यांची टोपल्याम्ची सजावट आणि गायत्री१३ यांच्या सासूबाईंनी केलील्या सजावटीच्या आयडियाज छानच Happy

प्रीति, यांची क्लिप आवडली Happy बाप्पा पण सुरेख झालेत Happy

Pages