वाहिली धुंद आज सरिता

Submitted by किंकर on 2 September, 2012 - 17:17

सोडूनी बंध, फोडुनी बांध, वाहिली धुंद आज सरिता
ओढ हि तिला कशाची कळेना, झुगारली बंधने कोणाकरिता ?

ओसरता पूर, धपापला उर, तुटले नुपूर, सारे निशब्द क्षणाकरिता !
थांबला खेळ, बसेना मेळ का अशी धावली कशा करिता ?

कुठे गेले तिचे संयमी पात्र, मर्यादेत राहणे,गतिशील वाहणे न पाही किनारा,
होता दूरवर माझाच पसारा, गतीशिलतेचा असे ठावूक दरारा !

आता वाटते तुजला कि ,मी झाले बेधुंद, न दिसे मला किनारा,
कोणाची मर्यादा कोणी मोडली ? उत्तरात आहे प्रश्नाचा पसारा.

न बंध मानिले, न साहिले अकारा,
उरे मागे एक केवळ दीर्घ सुस्कारा!!!

ओसरता पूर, आशेचा सूर
इथे होते मंदिर इथे होता पार

खुणा शोधीत धावे रस्ताच दूर
न सापडे गाव , न दिसे भाव

प्रत्येक नजर घेई काळजाचा ठाव

शोधण्या आधार उचलता नजर
नजरेस दिसेना काहीच आरपार ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users