झळाळी

Submitted by मिली२०१२ on 31 August, 2012 - 07:23

झळाळी

उडता शब्दांतीत पाखरे - काजळून जाई मन,

छाया ऊरात दाटते - हाती उरते हे वाण.

अस्तित्वात नसे बक - नीरक्षीर वगळाया,

सर येते अमृताची - संयुक्त त्या सिंचनाला.

मावळतीच्या प्रवासाला - गेला प्रकाश दिवसाचा,

काळवंडला दु:खाने - गोरा चेहरा निशेचा.

पर्वतांशी नाते जोडी - शुभ्र जलदांची माला,

भिन्न वर्तुळ बिंदूंचा - झाला संगम आगळा.

भरतीच्या लाटांनी - ल्याली फेसाळती लकाकी,

मन भावनेच्या पूरा - आली निराळी झळाळी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users