विषय क्र १ नाना आठवणी

Submitted by घारुआण्णा on 30 August, 2012 - 16:59

गेले १५ दिवस गाथा च सगळे लेख वाचतोय, या ग्रुप मध्ये सामीलही झालो, आणि वाचता वाचता सहज जुन्या आठवणी जाग्या झाल्या....
खरतरं या विषयावर काही लिहावं इतपत काही मी लेखाधिकारी नाहीच पण तरीही या अठवणी काही गमतीशीर आणि चटका लाउन जाणार्या.अर्थात या सगळ्या आठवणीना जोडणारा समान धागा म्ह्णजे नाना
विश्वनाथ पाटेकर हे खरंतर अगदी सहज साध वाटाव असं नाव ... पण नुस्तं नाना म्हटल की मन: पटलावर उभी राह्ते ती एक बंडखोर, भाउक आणि अतिशिस्तीची प्रतिमा. कोकणातला जन्म आणि स्वभावही फणसासारखा वरुन काटेरी आतुन गोड आणी म्रुदु.
नानाची पहीली ओळख पुण्यातली..! ओळख कसली नुस्त दर्शन ते....आम्ही सगळी मावस भावंड पुण्यात राहयला जायचो आजोळी मे च्या सुट्टीत.घरासमोरच भोपट्कर बंगला ८७च्या मे मधली ही आठवण नुकताच माफीचा साक्षीदार रीलीज झाला होता."जक्कल" पुणेकरांच्या मनात फारच खोलवर रुतला होता. बंगल्यात "नाना पाटेकर" येणार आहे अशी कुणीतरी खबर आणिली आणि आम्ही सगळे तिथे सकाळी १० वाजल्यापासुनच जमा झालो. साधारण २ वाजता नाना आला. अगदी साध्या वेशात निळसर रंगाची जीन्स आणि पांढरा शर्ट.....आम्ही अति उत्साही त्याची लगबगीनी त्याची सही घेतली आणि आनंदात उड्या मारत घरी गेलो तिथेच सगळा घोटाळा झाला. आजोबांना सही दाखवली, खाडकन एक मुस्कटात्च बसली ना राव!! वर दण्कुन दम "खुन्याच्या कसल्या रे सह्या घेता" ....सगळा राग जोशी अभ्यंकर हत्याकांड हे सगळे संदर्भ नंतर लागले.. पण कोणतीही आदळाअपट न करता नुस्ता आवाज आणि चश्म्याआडुन दिसणारी भेदक नजर मनात खुपच भीती ठेउन गेली.
त्यानंतर आलेला प्रतिघात , आधीचा अंकुश या सर्वांनी हे विचीत्र रसायन मनाच्या कोपर्यात सतत उकळवत ठेवलं.आणि मग आला नानाचा आण्णा संपुर्ण चित्रपटभर तोच थंड आवाज आणि काहीही घडलं तरी फारशी प्रतिक्रिया न देणारे खुनशी डोळे...आणी शेवटी आगीच्या तांडवातला तो क्लायम्याक्स
नंतर आलेला प्रहार माझ्या आठवणीत राहीलेला....... कारणं खर तर खुपच गमतीचं. माझ्या मित्रांसोबत प्राहार टाकायचा ठरलं आणि बरोबरच माझी मैत्रिणही येणार होती आणि तीला कंपनी म्हणुन तीची ही एक मैत्रीण त्यावेळी नुकतच कॊलेज सुरु झालेलं त्यामुळे अर्थातच कोणीच घरी काही सांगायचा प्रश्न नव्हता. सगळी तयारी झाली तिकीटांचा जुगाड झाला( चक्क ३० ची तिकीटं ४५ ब्ल्याक नी घेतल्ली)... दुपारी ३ चा शो. मी आणि माझे ३ मित्र थिटराबाहेर पोहोचलो घरुन निघताना मैत्रिणीला सांगुन निघालो. काहीतरी गडबड नक्की झाली होती.. ३.३० झाले शो सुरु झाला आणी तरीही य दोघी काही पोहोचल्याच नाहीत बाकीच्या मित्रांना "तुम्ही आत व्हा ३ तिकीट माझ्याकडे ठेवा" म्हणुन आत पिटाळलं,बाकी सगळे आत गेले आ्ख्खा कॊरीडोर रीकामा झाला.साडे तीनला माझी मैत्रीण येताना दिसली समोरच्या रस्त्यावरुन ते ही तिच्या पिताजींसोबत स्कुटर्वर . आता मात्र बोंब होती मी ही एकटाच समोरच्या फुट्पाथवर तिला सोडायला आले आले आणी थांबले... सव्वा चार झाले. पिताजीचं माझ्याकडे माझ्याकडे लक्ष नव्ह्तं आणि माझी मैत्रीण लक्ष असुन नसल्यासारखं दाखवत होती. तीला सोडुन हे निघतील आणि पटकन उरलेल पिच्चर पाहता येइल म्हणुन मी वाट पाहात होतो. बराच वेळ झाला पिताजी काही तरी म्हणाले आणि दोघेही जण चक्क स्कुटर वरुन निघुन गेले..... चरफडत उरलेली तिक्कीट चक्क १५ रुपयात विकुन मी सरळ घरी आलो.. त्या नंतर अनेकदा प्रहार बघितला अर्थात प्रत्येक वेळी ही आठवण मनात ठेउन कारण होणा-या
बायकोबरोबर पहीला चित्रपट पाहाण्याची ही चुकलेली संधी होती!!
आजतागायत नानाचे सगळेच चित्रपट पाहात आलोय,तिरंगातला यशवंत,अब तक छप्पनमधला साधु, अपहरण चा तरबेज,गुलाम चा मुस्तफा
या सगळ्या भुमिकांनाना असलेली कधी साधेपणाची तर कधी खलनायकी किंवा बंडखोरीची किनार नेहेमीच जाणवत राहाते.
आणि मग आठ्वतो १९९८ला विद्यार्थी परीषदेच्या व्यासपिठावरुन सहज बोललेला नाना..."या देशात सर्व युवकांनी सैनिकी शिस्त आणि शिक्षण घेतले पाहिजे. जिथे विद्यार्थी रस्त्यावर उतरता तो देश नेहेमीच निरंतर प्रगती करत राहातो"
जे.जे.चा कला शाखेचा हा विद्यार्थी ,घरच्या गणपतीला स्वत: फुलांची आरास सजवणारा, नाटकं,सिनेमातला अभिनयकार
आणि तरीही सैनिकी शिस्तीचा खाक्या असणारा...
आजच्या केवळ आर्थिक प्रगतीलाच माप दंड मानणार्या समाजाला सर्वांगिण प्रगती कशी असु शक्ते याचे उत्तम उदाहरण

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"प्रहार"चा किस्सा उगाळून तू आणि शिल्पा अजून एकमेकांना चिडवता की नाही? काय पोपट झाला असेल तुझा ते इमॅजिन करुन ::हहगलो:

युगपुरुष हा एक नानाचा उत्कॄश्ट चित्रपट आहे .>>> त्यान्चा वजूद पिक्चर पण छान आहे.