अस्सा पाऊस-पाऊस...

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 August, 2012 - 09:48

भर दिवसा-ढवळ्या
गच्च अंधारुन आल
तुझ्या आठवात सख्या
मन वेड-पिसं झाल

को-या अंगणात सरी
अश्या अश्या कोसळल्या
बांध बांधल्या मनाचा
जागो-जागी ढासळला

थेंब-थेंब झेलावया
रंध्र-रंध्र आसावला
जणु साजणाचा स्पर्श
ओल्या सरीतुन झाला

तुझ्या विरहात सख्या
खोळंबली रात्र-रात्र
ओली झुळुक वा-याची
सुखावते गात्र-गात्र

जशी-जशी पावसाशी
गट्टी जमली जमली
तना-मनाची धरेच्या
लाही शमली शमली

निथळत्या काळजाला
तू ही- मी ही टिपू नये
सख्या मिलनाचा ॠतू
अर्ध्यावर संपू नये

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

को-या अंगणात सरी
अश्या अश्या कोसळल्या
बांध बांधल्या मनाचा
जागो-जागी ढासळला

थेंब-थेंब झेलावया
रंध्र-रंध्र आसावला
जणु साजणाचा स्पर्श
ओल्या सरीतुन झाला<<<

मस्त आहे

आवडली कविता

सुप्रिया..सुप्पर्ब गं!!! नि:शब्द करतेस तू नेहमी.. नेमके शब्दच सुचत नाही तुझ्या उत्कृष्ट कवितेला साजेसे..
असंच गोड मानून घे Happy

पुरंदरे शशांक,
बागेश्री,
विभाग्रजजी,
मयुरी
वर्षू नील....:-)

धन्स !

छान जमलेय कविता.

"थेंब-थेंब झेलावया
रंध्र-रंध्र आसावला
जणु साजणाचा स्पर्श
ओल्या सरीतुन झाला" >>> हे अधिक आवडलं.

खूप छान! शब्दांच्या रिपीटीशनमुळे एक वेगळीच लय मिळालीये आणि पावसासाठीची ओढ जशीच्या तशी व्यक्त झालीये. मस्त!

को-या अंगणात सरी
अश्या अश्या कोसळल्या
बांध बांधल्या मनाचा
जागो-जागी ढासळला

थेंब-थेंब झेलावया
रंध्र-रंध्र आसावला
जणु साजणाचा स्पर्श
ओल्या सरीतुन झाला

तुझ्या विरहात सख्या
खोळंबली रात्र-रात्र
ओली झुळुक वा-याची
सुखावते गात्र-गात्र

क्लास !!

dhanyavaad !