पानोपानी...

Submitted by sumati_wankhede on 24 September, 2008 - 07:58

पुसट निसटते स्पर्श जरी ते
अंतर्यामी झिरपून गेले
आणि कसे हे जग स्मरणांचे
पानोपानी भरून गेले !

बघ कशी ही वळणांना या
फुटून आली कैक पाऊले
तू म्हटले मज, ' थांब घडीभर'
अन मी अवचित थांबून गेले !

स्वप्न बिलोरी कळले होते
श्वास तरी मम झपाटलेले
तुझे नि माझे जपता धागे
आयुष्याचे गाणे झाले !

संभ्रमाचे जाळे भवती
आस परि अंतर्हृदयाला
उमजून असते सारे 'मीरा'
पीते तरीही विषाचा प्याला !

गुलमोहर: 

आणि कसे हे जग स्मरणांचे
पानोपानी भरून गेले !

तू म्हटले मज, ' थांब घडीभर'
अन मी अवचित थांबून गेले ! >>>>> व्वा !

परागकण

>>स्वप्न बिलोरी कळले होते
श्वास तरी मम झपाटलेले
तुझे नि माझे जपता धागे
आयुष्याचे गाणे झाले !

सुंदर!

क्या बात है..........सहज आलीय.

>>बघ कशी ही वळणांना या
फुटून आली कैक पाऊले
तू म्हटले मज, ' थांब घडीभर'
अन मी अवचित थांबून गेले !.. आहा!

शुभेच्छा.. लिहीत रहा.. Happy

ओहो, सुमतीताई! किती सुरेख. किती ठिकाणी थांबले माहितीये?
अगदी पहिलच कडवं... त्या 'पुसट निसटसे' पासून विकेट पडत राहिली. खूप वेळा वाचली. अगदी मनातलं सांगायचं तर एकदम इंदिरा संतांची कविता वाचतेय असं काहिसं..... वाटून गेलं... पुसट निसटसं? तरीही अंतर्यामी झिरपणारं?
बहोत खूब!

बघ कशी ही वळणांना या
फुटून आली कैक पाऊले
तू म्हटले मज, ' थांब घडीभर'
अन मी अवचित थांबून गेले !>>>>आहा किती छान ग सुमती! जबरी आवडलं हे तर Happy

दाद ची 'दाद' मिळाल्यावर आणखी बोलायची गरज आहे ?
अनिरुद्ध, पराग, चिन्नु, कौतुक, समीर, गिरी, शाल्मली... सर्वांचीच अत्यंत आभारी आहे.

ही सुमतीचीच कविता........इतके दिवस कुठे होती दडलेली..... फार फार सुरेख !!

>>ही सुमतीचीच कविता........इतके दिवस कुठे होती दडलेली.....
अगदी! मनातलं... छान आणि सहज सुंदर!