सगळ्या मायबोलीकरांना कोणती एक गोष्ट एकत्रित बांधून ठेवते माहितीये? आपलं मराठी भाषेवरचं, संस्कृतीवरचं आणि आपल्या भूमी बद्दलचं प्रेम!
(कोण म्हणतयं रे की "मराठी माणसं एकमेकांना मदत करत नाहीत" म्हणून?)
तर मंडळी, ही एक गट/टीम/कंपू/चमू स्पर्धा आहे.
महाराष्ट्रातील कोणताही एक विभाग/जिल्हा/शहर/खेडेगाव निवडून त्यावर एक जाहिरातवजा लेख लिहायचा आहे. (संदर्भः Incredible India campaign). मात्र हा लेख लिहायचा आहे कंपूबाजी करून! कंपूबाजी काही मायबोलीकरांना नवीन नाही!
गट/ टीम/कंपू/चमू यांसाठीचे नियम :-
१. कंपू साठी नाव ठरवणं आवश्यक आहे.
२. कंपू कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ५ आयडींचा असावा.
३. एक सभासद एकाच कंपूमध्ये भाग घेऊ शकतो.
४. ह्यात प्रत्येक सभासदाचं पुरेपूर योगदान असावं अशी अपेक्षा आहे.
लिखाणाचे नियम :-
१. लेखाला नाव असणं आवश्यक आहे. याशिवाय लेख महाराष्ट्रातील कोणत्या भागाबद्द्ल आहे त्याचाही उल्लेख करावा.
२. तुम्ही जो भाग निवडाल त्याची ही जाहिरात आहे. त्यासाठी तुम्ही गद्य, पद्य, संवाद इत्यादि लेखन प्रकारांचा वापर करू शकता.
३. छायाचित्रे (यात हस्तकला, पाककला, चित्रकला इ. सर्व आलं) - जास्तीत जास्त ६
वापरण्यात येणारी सर्व छायाचित्रे प्रताधिकारमुक्त वा स्वतः काढलेली असावीत.तसेच चलतचित्रे (व्हिडीओ)/ युट्युब यांचे दुवे जरुर देऊ शकता मात्र ते त्या त्या चमूने स्वतः तयार केलेले पाहिजेत. कुठल्याही व्यावसायिक/सरकारी हॉटेल, रिसॉर्ट, कंपनी यांचे दुवे देऊ नयेत. रेल्वे, बस यांची माहिती चालेल मात्र त्यांची वेळापत्रके वगैरेंचे दुवे देऊ नयेत.
मायबोलीवर पूर्वप्रकाशित लेखांची वा प्रकाशचित्रांची मदत घ्यायची असेल तर त्याच्याशी संबंधित सभासदांची परवानगी घेणे व लेखामध्ये तसा उल्लेख करणे अनिवार्य आहे.
४. शब्दमर्यादा नाही, मात्र यातील माहिती वाचनीय, प्रेक्षणीय व उद्बोधक असेल याची काळजी घ्या.
५. लेखन स्वातंत्र्य असलं तरी कृपया धार्मिक विषयावरचे वाद, प्रांतवाद, जातीयवाद, राजकीयवाद आणू नयेत.
६. जास्तीत जास्त लोकांना तो प्रदेश पहाण्याची इच्छा होइल असा लेखाचा उद्देश असावा.
७. नियमात न बसणार्या प्रवेशिका बाद ठरवल्या जातील.
प्रवेशिका कधी, कुठे व कशा पाठवाव्यात ?
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, १९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाण वेळ), अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेची पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) पाठवता येतील. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य-नोंदणीकरता १९ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
१. 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घेण्याकरता, या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
२. कंपू मधल्या कोणत्याही एका आयडीने याच गृपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (मायबोलीवरील नवीन लेखन करा, गणेशोत्सव २०१२ गृप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
गर्जा महाराष्ट्र माझा! - लेखाचे नाव - कंपूचे नाव
४. विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यु) मधून 'मायबोली, उपक्रम' हा पर्याय निवडा.
५. शब्दखुणा या चौकटीमध्ये गर्जा महाराष्ट्र माझा, मायबोली गणेशोत्सव २०१२ हे शब्द लिहा.
६. मजकूराच्या सुरवातीला आपल्या कंपूतील सर्व सभासदांची नावे लिहावीत.
लेखाच्या शेवटी श्रेयनामावली लिहीण्यास हरकत नाही.
७. मजकूरात प्रकाशचित्र टाकायचे असल्यास मजकूराच्या चौकटीखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' वर टिचकी मारुन तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटी मध्ये त्याची पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
९. Save ची कळ दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थोडी कळ काढाच आता तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
११. या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येइल.
भारी!! मस्त स्पर्धा आहे .
भारी!!
मस्त स्पर्धा आहे
. लेखामध्ये 'मायबोली गुलमोहोरातील' जास्तीत जास्त लेखन प्रकारांचा समावेश असावा. उदा. कविता, ललित, हस्तकला, चित्रकला, छायाचित्र, चारोळ्या, नाट्यप्रवेश, पाककृती इ.>>> हा मुद्दा नीट समजला नाही, जरा समजावून सांगाल का संयोजक?
ही पण स्पर्धा भारीये...
ही पण स्पर्धा भारीये...
innovative idea!! liked it
innovative idea!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
liked it
लेखामध्ये 'मायबोली
लेखामध्ये 'मायबोली गुलमोहोरातील' जास्तीत जास्त लेखन प्रकारांचा समावेश असावा. उदा. कविता, ललित, हस्तकला, चित्रकला, छायाचित्र, चारोळ्या, नाट्यप्रवेश, पाककृती इ.>>> हा मुद्दा नीट समजला नाही, जरा समजावून सांगाल का संयोजक?
>>>>>>>
+१००
आपल्या लेखात, कविता, ललित,
आपल्या लेखात, कविता, ललित, हस्तकला, चित्रकला, छायाचित्र, चारोळ्या, नाट्यप्रवेश, पाककृती अशा विविध लेखन प्रकारांचा समावेश करू शकता.
एकदम झक्कास.. ही स्पर्धा एकदम
एकदम झक्कास.. ही स्पर्धा एकदम भारी होणार... मस्त वेगळेपण मस्त युक्ती.. सही !
खान्देशी कोन कोन शेतस आठे?
खान्देशी कोन कोन शेतस आठे? बठ्ठा लोके मियिसन एक कंपू करूत, आन हाऊ पारितोषिक आप्ला खान्देशी लोकास्ले भेटालेच जोइये आसं देखूत. इच्चारपूशीतून हाक मारा. मी तैयार हाये.
-व्हालिंटियर नं.१ (इब्लिस)
फारच झकास स्पर्धा!
फारच झकास स्पर्धा!
स्पर्धा मस्त आहे. पण
स्पर्धा मस्त आहे.
पण जाहिरातवजा लेख म्हणजे जाहिराती सारखे वाटले पाहीजे की लेखा सारखे? नक्की काय अपेक्षीत आहे ते समजले नाही. (विणा पाटील अनेक वर्षे लोकसत्तेतून लिहून पकवायच्या तसे पर्यटनाचे जाहिरातवजा लेख हवे आहेत का? :फिदी:)
वीणा पाटील अजूनही पकवत आहेत.
वीणा पाटील अजूनही पकवत आहेत. शिवाय सचिन जकातदारही पकवतात. मला नाही वाटत संयोजकांना पकवणारे लेख अभिप्रेत आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भार्री स्पर्धा आहे. नगरवाले
भार्री स्पर्धा आहे.
नगरवाले कंपू जमाओ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी आयडीया. अगदी अनोळखी
भारी आयडीया. अगदी अनोळखी ठिकाणांबद्दल वाचायला मिळेल. सगळे भटके लोक यात भाग घेवू शकतील
कोकणातलं आहे का कुणी??? मी
कोकणातलं आहे का कुणी???
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी नवीनच आहे माबो वर.... कंपूशाही आहे वगैरे वाचत्ये सध्या.... खरंच असेल तर नवीन लोकांचा कंपू बनवूया का??
अरे वा! भारीये आयडिया
अरे वा! भारीये आयडिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाह्नवी, कोकणातले लोक गजाली
जाह्नवी, कोकणातले लोक गजाली बाफावर सापडतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी आहेत सगळ्याच स्पर्धा/ आयडियाज्! एकदम हटके. संयोजकांचं अभिनंदन!
मस्त आहे ही स्पर्धादेखील ! पण
मस्त आहे ही स्पर्धादेखील ! पण एक शंका...
पाच जण मिळुन लिहीणार, पण वरील माहितीनुसार पाच जणात मिळून एकच लेख लिहायचा आहे. त्यातही <<लेखामध्ये 'मायबोली गुलमोहोरातील' जास्तीत जास्त लेखन प्रकारांचा समावेश असावा. उदा. कविता, ललित, हस्तकला, चित्रकला, छायाचित्र, चारोळ्या, नाट्यप्रवेश, पाककृती इ>>> आणी असे असुन शब्दमर्यादा फ़क्त ३०० शब्द ?
कंपू कमीत कमी २ आणि जास्तीत
कंपू कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ५ आयडींचा असावा.
अले एकाचेच सगले दु आयदि बाग गेतिल ना आता...
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
२. लेखामध्ये 'मायबोली
२. लेखामध्ये 'मायबोली गुलमोहोरातील' जास्तीत जास्त लेखन प्रकारांचा समावेश असावा. उदा. कविता, ललित, हस्तकला, चित्रकला, छायाचित्र, चारोळ्या, नाट्यप्रवेश, पाककृती इ.>> समावेश अनिवार्य आहे की ऐच्छिक? म्हणजेच, गुलमोहरमधल्या जास्तीतजास्त विभागांचा समावेश करू शकता (अशी परवानगी आहे?) की करावा (असा आदेश आहे?)
उत्तरांमध्ये संयोजकांनी 'समावेश करू शकता' असे लिहीले आहे. समावेश ऐच्छिक असेल, तर कृपया तसा बदल हेडरमध्ये मूळ स्पर्धेच्या मजकूरातही करावा.
एकदम अभिनव कल्पना आहे.
एकदम अभिनव कल्पना आहे. आवडली.
वर काहींनी विचारलेले प्रश्न मलाही विचारावेसे वाटतात
- जाहिरात कि लेख? नियमावलीत संदर्भ दिलेल्या जाहिरातवजा लेखाची लिंक मिळु शकेल का?
- गुलमोहरातील कलाकृती/साहित्यकृती वापरताना मुळ लेखक/कलाकार मायबोलीकराची परवानगी घ्यावी लागेल का?
- लेखामध्ये 'मायबोली गुलमोहोरातील' जास्तीत जास्त लेखन प्रकारांचा समावेश असावा. समावेश अनिवार्य आहे की ऐच्छिक? गुलमोहराव्यतिरिक्त इतर काही चालणार नाही का?
- शब्दमर्यादा ३०० आहे पण किती प्रकाशचित्रे असावीत यावर पण काही बंधन आहे का? चलचित्रे (व्हिडीओ) चालु शकतील का?
कंपुना हे नाही जमत, म्हणजे
कंपुना हे नाही जमत, म्हणजे जाहिरात नाही पण एखाद्याला डोक्यावर घेणे आणि एखाद्याला धोपटणे जमते, तशी ठेवा बुवा स्पर्धा !
संयोजक, सुधारीत नियमावली
संयोजक,
सुधारीत नियमावली पाहिली. गुलमोहरातील साहित्य/ छायाचित्रे वापरताना परवानगी घ्यावी लागेल की गुलमोहरातील सगळे काही ह्या स्पर्धेसाठी पुर्वपरवानगी घेता वापरु शकतो?
<फाईल अपलोड झाली की कालच्या
<फाईल अपलोड झाली की कालच्या करड्या चौकटी मध्ये त्याची पावती (मेसेज) दिसेल> टायपो ?
मस्त स्पर्धा आहे.. पण
मस्त स्पर्धा आहे..
पण शब्दमर्यादा फक्त तीनशेच ????
धन्यवाद भरत, बदल केला आहे.
धन्यवाद भरत, बदल केला आहे.
सगळ्याच स्पर्धा मस्त आहेत
सगळ्याच स्पर्धा मस्त आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महागुरू मला वाटते कथा, कविता,
महागुरू
मला वाटते कथा, कविता, गझल, ललित असे गुलमोहोर विभागात जे कुठले प्रकार लिहीता येतात ते जास्तीत जास्त साहित्यप्रकार वापरून प्रवेशिका लिहायची आहे. गुलमोहोरातले, इतरांनी लिहीलेले साहित्य नाही.
संयोजक सांगतीलच.
माफ करा संयोजक ! पण फक्त या
माफ करा संयोजक !
पण फक्त या धाग्यातील शब्दसंख्याच ५६० आहे जवळ-जवळ ! एखाद्या शहराबद्दल जर संपुर्ण माहिती देणारा लेख लिहायचा झाला तर ३०० शब्दात बसवणे कसे शक्य आहे? ते चुकुन झालेय का? ३०० च्या ऐवजी ३००० हवेय का?
जाहिरातवजा लेख म्हणजे ३००
जाहिरातवजा लेख म्हणजे ३०० शब्द बरोबर आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विशाल, <<त्यावर एक जाहिरातवजा
विशाल,
<<त्यावर एक जाहिरातवजा लेख लिहायचा आहे >>
मग संपूर्ण माहिती देणारा लेख लिहायचा की कसा हे त्या त्या ग्रूपनेच ठरवायचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटग लेखन स्पर्धा वाचलं...
गटग लेखन स्पर्धा वाचलं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages