दिल्लीचा पावसाळा

Submitted by विवेक पटाईत on 26 August, 2012 - 02:12

काळे कुट्ट मेघ
आकाशी दाटले.
विजेच्या कडाक्यात केल्या
त्यांनी पावसाळी घोषणा.

तेंव्हा त्यांचा चेहरा मला
नेत्यानं सारखा भासला.

दोन-चार थेंबच
अंगावर सांडले.
पावसात भिजण्याची
हौस मनी राहिली.

दिल्लीचा पावसाळा हा
असाच असतो.
भर श्रावणात हा
मृगजळ दाखवितो.

आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users