गाथाचित्रशती विषय क्र. १ मला भावलेला शिवाजी वागळे (नाना पाटेकर)

Submitted by स्मितू on 24 August, 2012 - 07:07

मराठी, हिंदी सिनेमे आम्ही चिक्कार बघितले. मला विशेष असे काही क़ळायचे नाही. पण टुकार सिनेमे पाहाण्याची सुद्धा एक वेगळी मजा असते त्या वयात..
मला सिनेमा खुप उशिरा कळायला लागला... पहिले तर आम्ही १ रु टिकिटाने सिनेमे बघितले मला आणि माझ्या बहिणीला सिनेमे बघण्याचे प्रचंड वेड्... मग काय आठवड्यातनं दोन तरी सिनेमे आम्ही मैत्रीणींना सोबत घेऊन बघायचोच. सिनेमांच्या नावांची बरिच मोठी लिस्ट आहे... किती तरी आठवत सुद्धा नाही ..लहानपणी माझ्या आवडत्या नायकांमध्ये मला धर्मेंद्र, अमिताभ्,राजेश खन्ना ह्यांचे सिनेमे फार आवडाय्चे ..नंतर कॉलेज मध्ये गेल्यापासनं अमिर, सलमान खान, शाहरुख आणि सैफ अली खान ह्यांचे सिनेमे बघायची... शाहरुख चे तर आम्ही सगळ्या भावंडानी एका रात्रीत ३ सिनेमे बघितले बघितले... तेही व्हिडिओ घरी आणुन... Happy पण जसा जसा काळ पुढे चालला तसे तसे माझे नायकां बद्दल चे मतपरिवर्तन होत होते, अर्थात धर्मेंद्र, अमिताभ्,राजेश खन्ना ह्यांचे सिनेमे मी आजही बघते. पण माझ्या ह्या आवडत्या नायकांमध्ये एक नांव आवर्जुन सामिल झाले ते म्हणजे विश्वनाथ दिनकर पाटेकर उर्फ नाना पाटेकर नानाचा, तिरंगा मधला शिवाजी वागळे ,किंवा मग यशवंत मधला यशवंत असो... आजही कितीहीवेळा हे सिनेमे टिव्हीवर आले तरी मी बघतेच... क्रांतीवीर, तिरंगा, यशवंत या चित्रपटातील भुमिका फारच दमदार होत्या...
नानाचे ते रक्त गरम करणारे संवाद... वा!! वा!!krantiveer.jpegनाना पाटेकर मराठी रंगभुमी हिंदी/ मराठी चित्रपट सृष्टीतील एक आगळे वेगळे असणारे व्यक्तीमत्व असणारे अभिनेते. तिरंगा मधील त्याच्या त्या एंट्री सोबत ते बॅकग्राऊंड म्युसिक ढ्याssss उं ढ्याssss उं ढ्याssss उं आणि नानच्या चेहर्‍यावरचे ते हावभाव सगळे कसे... जिवंत वाटते... तिरंगा मध्ये त्यांनी एका सच्चा पोलिस इन्सपेक्टर भुमिका साकारली आहे.. tiraga 1.jpeg
जशीजशी मोठे होत होते तसे मग मला कुठला सिनेमा बघावा, कुठला नाही हे कळायला लागले...
माझ्या जीवनातला सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला तो नानाने दिग्दर्शित केलेला प्रहार... प्रहारचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात नायिकेला म्हणजे (माधुरी) काहीही मेकअप न करता सादर केले आहे. आणि थोडासा रुमानी हो जाए... ह्यातिल तो डायलॉग म्हणा की कविता .... फार म्हणजे फारच मनाला भावले

thodasa rumani jaye.jpeg
हां मेरे दोस्त
वही बारिश
वही बारिश जो आसमान से आती है
बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है
नदियों मैं चलती है
नहरों मैं मचलती है
कुंए पोखर से मिलती है
खप्रेलो पर गिरती है
गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है
फिर आगे निकलती है
वही बारिश

ये बारिश अक्सर गीली होती है
इसे पानी भी कहते हैं
उर्दू में आप
मराठी में पानी
तमिळ में तन्नी
कन्नड़ में नीर
बंगला में… जोल केह्ते हैं
संस्‍कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं
ग्रीक में इसे aqua pura
अंग्रेजी में इसे water
फ्रेंच में औ’
और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं

ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है
लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है
हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है
और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है

पानी तो पानी है पानी जिन्दगानी है
इसलिए जब रूह की नदी सूखी हो
और मन का हिरण प्यासा हो
दीमाग में लगी हो आग
और प्यार की घागर खाली हो

तब मैं….हमेशा
ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं
मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
सिर्फ 5 हज़ार रुपये में
इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो मेरी
आपकी जूती सिर पर मेरी
मेरी बारिश खरीदये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश.
आणि मग मला नानाचे सिनेमे बघायचे वेडच लागले...
sakhshidar.jpg
नाना पाटेकरांचा माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्याच्या अभिनयामुळे इतका गाजला की त्याची हिंदी आवृती 'फांसी का फंदा ही सुद्धा खुप गाजली. खलनायक कसा मोहरे (१९८७ ) आणि सलाम बॉम्बे (१९८८) ह्या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना हिंदी फिल्म इंड्स्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळाले. १९८९ साली 'परिंदा'

मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले.तसेच १९९२ साली 'अंगार' ह्या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. १९९४ साली 'क्रांतिवीर चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा फिल्म्फेअर पुरस्कार मिळाला.

मराठी नायकाने अभिनयाच्या जोरावर हिंन्दी चित्रपट सृष्टीत स्वतःचे असे पक्के स्थान निर्माण केले ह्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले 'नाना पाटेकर ; होय.
नानांना अभिनया व्यतिरिक्त सामाजिक कार्यात सुद्धा रस आहे ,ते बाबा आमटे यांच्या 'आनंदवन' आश्रमात जाऊन डॉ. प्रकाश आमटे ह्यांची मदत करतात.
मराठीतले पक पक पकाक,सध्याचा देऊळ किती तरी नावे आहेत ते सगळे सिनेमे काही टॉकिज वर ,तर काही घरी सिडी आणुन बघितले आहे. Happy पक पक पकाक मधील 'भुत्या' च्या व्यक्तीरेखेचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे...
नानाचे गाजलेले चित्रपट
प्रहार(दिग्दर्शन) १९९१
गमन १९७८
आज की आवज १९८४
अंकुश १९८६
लॉर्ड माऊंट बॅटन १९८६
माफीचा साक्षीदार १९८६
सुत्रधार १९८७
अंध युद्ध १९८७

साधारण रंग रुप असुनही.. आजच्य सुपरस्टार च्या समवेत नानांचे नांव आदराने घेतले जाते.
नानां नी केवळ एकांगी भुमिका नाही केल्यात .वेलकम आणि ब्लफमास्टर सारख्या सिनेमात त्यांनी विनोदी भुमिका पण चांगल्या रितिने साकारल्या आहे. १९९५ च्या 'राजु बन गया जंटलमॅन मध्ये छोट्याश्या भुमीकेत नाना भाव खाऊन गेले. welcome.jpeg

एक साधसुधं व्यक्तीमत्व... प्रत्यक्षात सुद्धा तसाच जगणारा नाना images_0.jpeg नाना आता शिवाजी महाराजांची भुमिका साकारणार आहे असे एकण्यात आले आहे ..त्यांच्या पुढिल कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा Happy
images  nana.jpeg

नानांनी हिंदी चित्रपट सृष्टीला दिलेले गाजलेले सिनेमे.
1978- गमन- वासु

1984- गिद्ध- वीरूपक्षी

1984- आज की आवाज- जगमोहनदास

1986- शीला- डॉक्टर राम-

1986- अंकुश- रवि

1987- सूत्रधार- कुमार

1987- मोहरे- अबुल

1976- अंधा युद्ध-

1987- प्रतिघात- करनवीर

1988- सागर संगम- रामनाथ

1988- सलाम बांबे- बाबा गुलाब

1989- परिंदा- अन्ना

1990- थोड़ा सा रूमानी हो जाए- नटवरलाल

1992- राजू बन गया जेंटलमैन- जय

1992- अंगार- मजिद खान

1994- क्रांतिवीर- प्रताप नारायण

1995- हम दोनों- विशाल

1996- अग्निसाक्षी- विश्वनाथ

1996- खामोशी- जोसेफ

1997- यशवंत- यशवंत

1988- युगपुरूष- अनिरूद्ध

1988- वजूद- मल्हार

1999- हु तू तू- भाऊ

1999- कोहराम- मेजर अजीत आर्या

2000- गैंग- अबुल

2000- तरकीब- जसराज पटेल

2002- वध- डॉक्टर अर्जुन सिंह

2002- शक्ति- नरसिम्हा

2003- भूत- लियाकत कुरैशी

2003-डरना मना है- जॉन

2003- आंच- महादेव ठाकुर

2004- अब तक छप्पन- साधु अगाशे

2005- अपहरण- तबरेज आलम

2005- ब्लफमास्टर- चंद्रू पारिख

2006- टैक्सी नंबर नौ दो ग्यारह- राघव

2006- यात्रा- दशरथ

2007- हैट्रिक- डॉक्टर सत्यजीत

2007- दस कहानियां-

2007- वेलकम- उदय शेट्टी

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.
आभार आर्या आणि मंदार जोशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मितु,
मी त्याच्याशीच असहमत आहे, मला नाही आवडला त्यात त्याचा रोल. सिनेमात सर्वांचेच भडक रोल होते, आणि नाना अश्याप्रकारच्या रोलमध्ये बाप माणूस म्हणून त्याला तर आणखी अति करायला लावले..

असो, आपली आपली मते.. पण बाकी सिनेमा चुकूनही बघू नका.. Happy

अवांतर - सध्याच्या सिनेमांपैकी "राजकारण" मध्ये त्याचा रोल अप्रतिम आहे.. काय रीअ‍ॅक्शन आणि एक्स्परेशन दिलेत त्याने एकेक घडामोडी घडताना.. कलियुगातील कृष्ण वाटावा अश्या.. मस्तच. Happy

'प्रतिघात' मधला नानाने रंगवलेला वेडा (हवलदार कर्मवीर) तर भन्नाटच होता.
लॉर्ड माऊंटबॅटन-द लास्ट व्हाईसरॉय मध्ये मला वाटते नानाने 'नथुराम गोडसेंची' भुमिका केली होती, तीही छोटीशीच भुमिका असुनही खासच होती. ( या चित्रपटातला सगळ्यात मोठा विनोद म्हणजे सरदार पटेलांची भुमिका कै. ए.के. हंगल यांनी केली होती)
वधमधली डॉक्टरची भुमिका किंवा 'पाठशाला' प्रिन्सीपल आदित्य सहाय याही भुमिका खासच होत्या.
मला सगळ्यात जास्त आवडला नाना तो 'खामोशी' आणि 'वजुद' मध्ये. गंमत म्हणजे खामोशीला त्याला एकही पुरस्कार नाही मिळाला.

या चित्रपटातला सगळ्यात मोठा विनोद म्हणजे सरदार पटेलांची भुमिका कै. ए.के. हंगल यांनी केली होती) Lol

मला सगळ्यात जास्त आवडला नाना तो 'खामोशी' आणि 'वजुद' मध्ये. गंमत म्हणजे खामोशीला त्याला एकही पुरस्कार नाही मिळाला. ... हो खरेच आहे खामोशी मधल्या अ‍ॅक्टींग साठी नानांना पुरस्कार मिळायलाच पाहिजे होता .

स्मितूताई, मस्त लेख.. Happy
माफीचा साक्षीदार पाहून किमान १५ दिवस मी एकटी घरातही वावरायला घाबरायचे, एकदा तर झोपेतच वाचवा वाचवा करत किंचाळले होते.. Sad
पक पक पकाक मधला भुत्या सहीच...

रैना, ट्यागो, धन्यवाद Happy

सारिका, त्या सिनेमात त्याने खलनायकाचे काम केलेच तसे गं ... अंगावर शहारे येतात अजुनही Happy

मस्तच लिहिलंत स्मितु.

नाना आवडणार नाही असा कोणी रसिक नसेलच. Happy

अग्नीसाक्षीमधील भूमिकेबद्दल थोडे लिहा ना अजून!

आवडत्या कलाकारावरचा आवडलेला लेख. अभिनंदन

लेख छान. अजुन वाढवता येइल.

नानाचे दोन चित्रपट ऑल टाइम फेवरेट - परींदा आणि थोडासा रुमानी हो जाये

परींदा अर्थातच त्यातील इतर ही अनेक गोष्टींमुळे फेवेरेट आहे

स्मितू,
छान लेख Wink

माफीचा साक्षीदार पाहिल्यावर मला नानाचा फार राग आला होता
नंतर सिनेमा म्हणजे काय ते कळायला लागले.;)

हायला... मी हे कसं काय मिसल होत Uhoh

व्वा स्मितू... मस्तच!

मला नाना कलाकार पेक्षा एक माणुस म्हणुन जास्त आवडतो. पुर्वि थोडा हेकेखोर होता, पण जस जस वय आणि इंडस्ट्रीतला अनुभव वाढत गेला तसा समजुतदार झाला नाना.

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!! Happy

नानांचा गुलाम -ए मुस्तफा हा सिनेमा विसरुनच गेले... रविना टंडन सोबत ,नानाने मस्त काम केले होते , ह्या सिनेमात....:स्मित:

नाना महान आहे!!!
नानाच्या एका मुलाखतीत त्यानी सांगितले होते की त्याच्या आईने जेव्हा 'माफीचा साक्षीदार' पाहिला तेव्हा त्या म्हणाल्या, 'पुन्हा असे रोल करत जाऊ नकोस'. म्हणुन तो सिनेमा पहायची माझी हिंमतच झाली नाही कधी.
नाना महान आहे!!!

लेख खुप छान आहे.
फक्त एक सुचना
तमिळ में कन्नी>>>
तन्नी हवे होते तिथे.
कृपया गैरसमज नसावा.

नटसम्राट आहाहा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ..... नाना पाटेकर जिओ......

Pages