झोम्बि टायिप

Submitted by अभ्या on 23 August, 2012 - 09:58

दर माणशी चिडत गेलेल्या फुग्याला
वेदना झाली
त्याने एक आकोडा तिरपा घुसवून केसाळ मासातून रिब्ज ला अडकवून खचकन खेचला बाहेर
काळी जांभळी वाफ
पिवळ चिकट पाणी
त्याची दाढी गरम झाली
म्हटला बहुतांची ऐसियापरी वाफ काढावी
गरम हनुवट्यान्चे लोंढे
झोंबी टायीप.

दर माणशी किडत गेलेल्या फुग्याला
वेदना झाली
एवाना पाणडांबर्या रस्त्यांवरती सेक्स वाहू लागला
अवयवी दु:खे नरम होऊन गाऊ लागली
तुझे याद न मेरी आई किसीसे अब क्या केहना
कोण शक्ती आहे म्हटला कुणास ठावूक
उलटे लटकवून ठेवावे आपण आपले त्रिकोणी जान्घ्यात
म्हटला बहुत सुकृताची जोडी गुरुत्वे जिरावी खोडी
ऊर्ध्वगामी वीर्यवन्तांचे झुलते लोंढे
झोंबी टायीप.

दर माणशी सडत गेलेल्या फुग्याला
वेदना झाली
म्हटला प्रोब्लेम कायय कि
झुरुझुरू झालंय
कधी व्हायचं नाही
कुणी लिंबू फिरवलाय का काय कळायला मार्ग नाही
एक लिंबू एक मिरची फिरवावी म्हटला सृष्टीवरून
हरेक जण सडावा
आणि युगंधर व्हावे का झोंबी लोंढ्यांचे
झोम्बलेल्या वेदनेची फुटकी स्वप्ने
युगंधर टायीप.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभ्या लेका पाचवेळा वाचली,
काहीच समजलं नाही
सोडून जावीशीही नाही वाटली,तुच रसग्रहण कर.
आणि हो असच काही भन्नाट लिहीत जा,आणि समजवत जा.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!