झोपा आता !

Submitted by राजीव मासरूळकर on 23 August, 2012 - 09:58

दि. १६.०४.१२ रोजी रात्री फेसबुकवरील मित्रमंडळीला शुभरात्री संदेश देण्यासाठी लिहायला बसलो आणि ही गझल अवतरली .
सर्व मायबोलीकरांना शुभ रात्री संदेश देण्यासाठी तिला इथे पेश करीत आहे .

**झोपा आता**

थकले विटले असाल दिनभर , झोपा आता !
ओढून घ्या दुःखाची चादर , झोपा आता !

चमक रात्रीची भुरळ घालते भरबाजारी
आयुष्यच बाजारू ! क्षणभर झोपा आता !

मर मर मर मर मरता , फिरता कितीक वाटा
मरणे अंती एक धरोहर ! झोपा आता !

स्वप्नांचा धुरळा झालेला बघता दिवसा
सुख स्वप्नांचे भोगा मनभर झोपा आता !

यंत्रालाही हवीच थोडीशी विश्रांती
यंत्र न होतो तोच खरा नर , झोपा आता !

आभाळाला लख्ख लगडल्या लाख चांदण्या
एक चांदणी तुम्हास सादर ! झोपा आता !

- राजीव मासरूळकर
दि १६.०४.२०१२
रात्री . १०.५० वाजता

Good Night !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाच्या प्रतिक्षेत . . . . . .<<<

ओक्के

१. इलाहींच्या 'चुकले का हो' ची 'चुकून' आठवण झाली

२. र्‍हस्व दीर्घ यात काही ठिकाणी गफलती झालेल्या आहेत (ओढुन घ्या, चमक रात्रिची

३. मतला छान आहे

४. शेवटचा शेर उत्कृष्ट आहे

५. मायबोली रात्री झोपत नाही

६.मला माझ्या काही ओळी आठवल्या. त्या अश्या:

एकाच काळजीने जागून रात्र जाई
की झोप आपल्याला येते कि येत नाही

तसेचः

पाच खोल्या बांधल्या अन घेतल्या गाड्या तरीही
लाभतो आराम कोठे पाठ अपुली टेकताना

आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा

-'बेफिकीर'!

मायबोलीवर झडती धोधो प्रतिसादांच्या फैरी
एक त्यातला ढापून आणला, हा धर! झोप्पा आता!

बेफिकीर जी ,
आपली प्रतिक्रीया , सूचना आणि विशेषतः शेर खूपच आवडले !

मायबोली रात्री झोपत नाही हे खरंच , पण मायबोलीकरांचा तरी डोळा लागत असेलच ना .
असो .
धन्यवाद .
आता इलाहीँची चुकले का हो ही गझल वाचल्याशिवाय मलाही झोप येणार नाही .
कृपया , नेटवर असल्यास लिँक उपलब्ध करून द्यावी .

कस्चं कस्चं राजीवजी!
अहो, एकही प्रतिसाद नव्हता म्हणून र ला ट अन ट ला फ लावलाय. शे'र नव्हेच तो.
शेर बिर म्हणाल तर बेफिजी उद्धार करतील पुन्हा Wink

(फाट्यावरील अहल्या)इब्लिस!

शेर बिर म्हणाल तर बेफिजी उद्धार करतील पुन्हा <<<

यातल्या 'पुन्हा' या शब्दाचा अर्थ काय? मागे काही झाले होते का? माझ्याकडून आगळीक झाली असल्यास क्षमस्व! एखादी तक्रार करा, म्हणजे मला पश्चात्तापाचा घोट घेता येईल. तुमच्या द्विपदीचा अर्थ मस्त आहे, पण तो 'तांत्रिकदृष्ट्या' शेर नाही. Happy

मलाही नेहमीप्रमाणे माझा एक शेर आठवला

स्वतःची मी गझल गातो नि गाते रात्र अन्गाई
तिलाही झोप नाही येत मीही जागतो अहे

बाकी रजीवजी आपली गझल एकदम मस्त आहे
बेफेजिन्नी दिलेला प्रतिसाद पर्फेक्ट आहे . अजून काही सान्गणे न लगे ...........

कोणाला रे वैभ्या?>>>>>>>>

त्याच शेरातली वरची ओळ वाचावीत .........समजली नाही तर पुन्हा वाचावीत
जोवर समजत नाही तोवर असे करत रहावे कधिनकधीतरी नक्की समजेल!!

रात्र अंगाई गाते आणि तू गझल गातोस. दोघांना झोप येत नाही. मग बाकीच्यांनी काय करावे? काहीही आपलं. माझा लिटल जिमी हासत आहे तुला.

लिटल जिमी>>>>>>>
माझा भाचा आहे का ??.....तुमचा मुलगा वगैरे ?? की कोण आहे हा जिमी ओळख करून द्याल का

असो तो हसतो आहे म्हणजे माझे प्रतिसादातले जोक त्यला समजतायत
शिका काहीतरी शिका त्याच्याकडून

जिमी हा माझा अदृष्य व बुटका निरिक्षक साथीदार आहे. तो मला येथे धरून आणतो आणि काय काय दाखवून हासतो आणि मग मी समाचार घेते