शेंगदाण्याची सोलापुरी पद्धतीची झटपट चटणी - shengdana chatni

Submitted by अवल on 22 August, 2012 - 00:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजलेले शेंगदाणे १ किलो ( न सोललेले )
लसूण पाकळ्या १०
तिखट ५ चमचे
मीठ १ चमचा
शेंगदाण्याचे तेल अर्धी वाटी

क्रमवार पाककृती: 

मूळ सोलापूरी शेंगदाणे आकाराने मोठे अन तेलाचे प्रमाण जास्ती असणारे असतात. इतरत्र मिळणार्‍या शेंगदाण्यांना तेव्हढे तेल सुटत नाही. त्यामुळे इतरत्र मिळणार्‍या शेंगदाण्याची चटणी वेगळी होते. त्यावर शोधून काढलेला हा पर्याय आहे.

भाजलेले शेंगदाणे (सालासकट), लसूण, तिखट, मीठ आणि पाव वाटी शेंगदाणा तेल कढईत घ्यावे.

1345605193620.jpg

मंद गॅसवर थोडा वेळ परतावे. चांगले खरपूस झाले की गॅस बंद करावा.

1345605219024.jpg

गरम असतानाच हे सर्व मिक्सरमध्ये "विप"वर दोनचारदा फिरवावे. अधमुरे वाटलेले थोडे काढून ठेवावे.

1345605241526.jpg

यात लसून आला असेल तर तो काढून पुन्हा मिक्सरमध्ये घालावा.
आता मिक्सरवर हे बारीक वाटावे.

1345605266692.jpg

आता मघाशी काढून ठेवलेले अधमुरे वाटलेले पुन्हा मिक्सरमध्ये घालावे. त्यात पाव वाटी शेंगदाणा तेल टाकावे. अन मिक्सर पुन्हा एकदा फिरवावा.
तयार आहे खमंग, झणझणीत शेंगदाण्याची चटणी.

1345605311503.jpg

अर्धातास तशीच ठेवली की असे तेल सुटते. अन तोंपासु दिसते Happy

1345605291570.jpg

वाढणी/प्रमाण: 
झेपेल तेव्हढे ;)
अधिक टिपा: 

यात शेंगदाणा तेलच वापरावे तरच चव पर्फेक्ट येते. इतर तेलांनी ती मजा येत नाही.
या चटणीत खाताना दही घालून खावे. एकतर चवही मस्त लागते अन पचायलाही बरे पडते Wink

माझा नवरा सोलापूरला राहिलेला. पुण्यात अनेक वर्षे राहिला तरी त्याला सोलापूरचे भारी प्रेम Sad लग्न झाल्यापासून सोलापूरच्या चटणीची अती कौतुकं ऐकली. अन माझी नेहमीच्या पद्धतीची चटणी नाकं मुरडत खालेली. मग एकदा सोलापूरची चटणी बघितली, खाल्ली. अन मग केला हा प्रयोग. आता अगदी नावाजत खातो Happy
shengdana chatni in marathi solapur

माहितीचा स्रोत: 
स्वतः केलेला प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages