स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी

Submitted by विभाग्रज on 20 August, 2012 - 13:35

स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी

स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी
भुक लागता हंबरते
पाडस गायीचे
धावत येई कुठूनही ती
हृदयची आईचे
पाडस मी तू गाय माझी,पान्हा दे आई......
...............मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी

गडगडता नभ पिल्लू बिलगते
पक्षीणी ऊदराशी
घेई भरारी चार्‍यासाठी
पक्षीण आकाशी
पिल्लू मी पक्षीण तू माझी,चारा दे आई.......
..............मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी

जन्ममृत्यूच्या फेर्‍यामध्ये
जिव का अडकतो
सुख दु:खाच्या जाळ्यामध्ये
गुरफटला जातो
पुर्नजन्मीच्या फेर्‍यांमधुनी,मुक्ती दे आई......
..............मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

चालीत वाचायला छान वाटली.
अश्या आरती स्वरूप रचनांचा एक ठरलेला साचा असतो नाही?
गाय पाडस, पक्षी- पिल्लू. मुक्तीदाता- जन्ममृत्यू फेरा.
केवळ प्रार्थनिय ब्यक्तीचे नाव बदलते.
अशा रचनात काही नाविन्य नसतं का?

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ .
त्यांच्या बद्दल लिहणे त्यांचीच कृपा

खरय विक्रांत साहेब.
धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ .