गँग ऑफ उडीपुरकर्स...

Submitted by रोहित ..एक मावळा on 20 August, 2012 - 12:55

उड उड के देख जरा उड उड के च्या अप्रतिम यशानंतर मामा उर्फ मायबोलीकर मावळे आपल्या समोर पुन्हा घेऊन येत आहेत.... गँग ऑफ उडीपुरकर्स.

फार फार पुर्वीची ....म्हणजे कालचीच गोष्ट आहे.
बर्‍याच दिवसापासुन तो गायब होता.सगळ्यांच्या तोंडच त्याने पाणी पळवळ होत.सगळेच हवाल दिल झाले होते.पावर बाज लोकांनीसुद्धा (विमानाने बंदोबस्त करण्याची) आशा सोडली होती.मग काय अशा वेळी एका गँगने त्याचा छडा लावायचा विडा उचलला.खबर्‍याने आणलेल्या माहितीनुसार त्याने सह्याद्रीत आसरा घेतला होता.दर्‍याखोर्‍यात लपण्यात तो पटाईत होता.मग काय त्याच्या शोधात उडीपुरकरांची गँग निघाली.ही गँग आपल्या उड्यांसाठी प्रसिद्ध होती.त्यांच्या उड्यांनी भल्याभल्याची बोबडी वळवली होती.उडीपुरची गँग या नव्या आव्हानासाठी सज्ज झाली.
राजरथातुन उडीपुरकरांनी लक्ष्याकडे प्रयाण केले.रात्रीच्या सन्नाट्यात मोक्याच्या ठिकाणी पोहोचले.उडीपुरकरांचे आराध्य दैवत असलेल्या मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन चकमकीसाठी तयार झाले.
उडीपुरकरांची गँग ज्याच्या शोधात होती .. तो आतापर्यंत तुम्ही ओळखला असेलच .. तरीपण सांगतोच ...
पावश्या ... हो पावश्याच..
घाटात त्याने बस्तान बांधल होत.पण पडायच काय नाव घेत नव्हता.. मग काय उडीपुरकर आपल्या हत्यारांसह घाटावर पोहोचले.तुल्यबल युद्धाला सुरुवात झाली.
उडीपुरकरच्या म्होरक्याने पहिला वार केला.

प्रचि १ दगडु उडीपुरकर उर्फ यो रॉक्स ...

मग बाकीचे उडीपुरकर्स सरसावले.

प्रचि २ रो ची फिरकी ...

प्रचि ३ ज्यो ची गिरकी....

प्रचि ४ गिरिविहारने केला ढगविहार ....

प्रचि ५ पुन्हा योने केला वार ..

आमच्यातल युद्ध पाहुन दगडालासुद्धा पाझर फुटला.

प्रचि ६

मग एकत्रित हल्याला सुरुवात केली.
प्रचि ७

प्रचि ८

शेवटी आमच्या उड्यांना पावश्या शरण आला.ढग खाली उतरले.
प्रचि ९

मग काय एकच धमाल सुरु झाली. उडीपुरकर्‍यांनी एकच जल्लोश केला.पावसात चिंब भिजल्यावर त्यांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली.

उडीपुरकरांच्या खास पाण्यावरच्या आनंदउडया....

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

असे हे आपले मायबोलीकर उडीपुरकर्स ...
पुन्हा भेटुया...

प्रचि १५

(टीप : १. कहानी जरी खोटी वाटत असली तरी सत्यघटनेवर आधारित आहे.
२. उड्यांसाठी कुठलाही डुप्लिकेट वापरला नाही.
३.सर्व उड्या मारताना योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे.)

(तळटिप : फोटो - यो,ज्यो अन रो च्या कॅमेरातुन ...... )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Great

वॉव ग्रेटच आहेत ऊडीपूरकर्स !!!
सुप्पर्ब उड्या आणी फोटोज!!!
दुसर्‍या फोटोत थेट दरीतच उडी मारणारेसा वाटला 'रो'

सह्ही फोटोज !!! मस्त आयडिया!!!
जबरी उड्या अ‍ॅज ऑलवेज Happy
शेवटचा फोटो मस्त!!!

पाचव्या फोटोत यो च्या मागे जो कुत्रा आहे तो बिचारा हैराण दिसतोय... 'ये येडा क्या कर्रेल्ला है?? Lol

फोटो छानच आहेत.

पण माझ्या वयाला अनुसरून एक प्रेमाची सुचना नक्कीच करावीशी वाटतेय.

निसरड्या जागा, कड्याचे टोक या जागा, उड्या मारण्यासाठी योग्य नाहीत. सुरक्षितता महत्वाची.

धन्यवाद लोक्स .. Happy

'ये येडा क्या कर्रेल्ला है?? >> Lol

गिरी च्या टोपीखाली काय लपलय ?? >> विन्या ... Biggrin

निसरड्या जागा, कड्याचे टोक या जागा, उड्या मारण्यासाठी योग्य नाहीत. सुरक्षितता महत्वाची. >> हो दिनेशदा धन्यवाद ... आम्ही त्याची पुरेपुर काळजी घेतो. Happy

गँगचा २ रा भाग कधी?? >> हेम ... लवकरच पण कधी ते माहित नाही ... Proud

सगळेच उडीबाबा....अफलातून्...अश्या उन्च उड्या खरोखर मारता येतात ? ग्रेट च आहात सगळे.:-)
फोटो पहिले नसते तर माझा विश्वास बसलाच नसता Happy

Pages