हासलो मी ब-याच वर्षांनी!

Submitted by सतीश देवपूरकर on 20 August, 2012 - 00:15

गझल
हासलो मी ब-याच वर्षांनी!
बहरलो मी ब-याच वर्षांनी!!

काय केलीस नेमकी जादू?
झिंगलो मी ब-याच वर्षांनी!

वाटला तो खरेच वाटाड्या;
बहकलो मी ब-याच वर्षांनी!

आग ती लावली कुणी? केव्हा?
पेटलो मी ब-याच वर्षांनी!

आज दारे खुली कशी सारी?
परतलो मी ब-याच वर्षांनी!

कल्पवृक्षास वाटला हेवा....
डवरलो मी ब-याच वर्षांनी!

मी धनादेश एक उरलेला!
चाललो मी ब-याच वर्षांनी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटला तो खरेच वाटाड्या;
बहकलो मी ब-याच वर्षांनी!>> सुंदर!

आग ती लावली कुणी? केव्हा?
पेटलो मी ब-याच वर्षांनी!>>> वाह, वाह!!