बेन ओक्रिची कविता

Submitted by pkarandikar50 on 22 September, 2008 - 15:30

माझ्या एका मित्राने मला बेन ओक्रि ह्या सुप्रसिद्ध नायजेरियन कवि आणि लेखकाची एक सुन्दर कविता पाठवली. ती अशी :
त्या कवितेचा मराठी अनुवाद करण्याचा मोह मला आवरला नाही.

एकेका अनाम वास्तवाच्या
देवडीवर
कधी एखादे भय साण्डते
किम्वा एखादा भ्रम मिटतो
तसा एखादा चमत्कारसुद्धा
घडू शकतो...
नियतीलाहि चक्रावणरा.....
बेन ओकरी

गुलमोहर: 

बापू करन्दिकर

चुकून मूळ कविता द्यायची राहून गेली. क्षमस्व! ती कविता अशी आहे:
Ben Okri _Poem

“At the gate of each
Unnameable
Reality
It is possible
To lose
A fear
And an illusion:
It is possible
To witness
Miracles
In your life -
By surprising
Your destiny."
-Ben Okri

बापू, मला वाटते बेन ओक्रीची ही मूळ कविता आशावादी आहे.. तुमचा अनुवाद हा जास्त दैववादी (Fatalistic) वाटतो आहे मला. अर्थात हे माझे मत झाले.

टण्या, प्राथमिकतः अगदी Happy मी पहिल्यांदा दोन्ही वाचले तेव्हा मलाही वाटले की मूळ कविता यत्नवादी तर अनुवाद दैववादी झालाय... पण मग वाटले की अनुवादात 'नियतीलाही चक्रावणारा' असा जो चमत्कार आहे तो तरी कोण करणार ? या चमत्काराने नियतीलाही बुचकळ्यात टाकले आहे, याचा अर्थ हा चमत्कार नियतीबाह्य आहे, म्हणजे माणसाने नियतीवर विजय मिळवून घडवून आणला आहे... असा अर्थ मी लावला. मूळ कविता यत्नवादी आहे याला अनुमोदन. By surprising Your destiny असा शब्दप्रयोग आहे, By surprising The destiny असा नाही हे मला सूचक वाटले.
अर्थात, तो चमत्कार देवाने घडवला असाही अर्थ लावता येईल Happy

    ***
    Life : The most virulent STD

    मी यत्नवादापेक्षा आशावाद हा शब्द वापरला ह्याचे कारण 'possible' ह्या शब्दाचा दोनदा उपयोग.. यत्नवाद थोडासा अधिक डिटर्मिनिस्टिक असतो.. होइलच अश्या पद्धतीचा.. ही कविता सकारात्मक आशावादी म्हणता येइल..

    बापू, सर्वप्रथम ही कविता व तिचा अनुवाद इथे दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पण मला वाटते की अनुवादात थोडीशी गडबड झाली आहे..

    At the gate of each
    Unnameable
    Reality

    ह्यातला each हा शब्द एकेका ह्या शब्दाने रुपांतरीत होउ शकत नाही.. प्रत्येक किंवा तसा एखादा शब्द वापरायला हवा.. आता unnameable reality म्हणजे काय? आपल्या आयुष्यात येणारा असा एखादा प्रसंग, घटना, काळ की जो आपण कधी यापुर्वी अनुभवलाच नव्हता किंवा ज्याची शक्यता/कल्पनादेखील आपण केली नव्हती? असा प्रसंग का ओढवला? किंवा कुणामुळे आला? नियतीमुळे? एखाद्या सर्वशक्तिमान अस्तित्त्वामुळे?

    दुसर्‍या कडव्यातील
    By surprising
    Your destiny
    हे काय सुचित करत आहे? नियतीला कोण आश्चर्यचकित करणार? कश्याने करणार? प्रयत्नांनी, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोडीने? पुन्हा पहिल्या कडव्यातील शेवटच्या दोन ओळी.
    It is possible
    To lose
    A fear
    And an illusion
    'नियतीने किंवा त्या सर्वशक्तिमान अश्या अस्तित्त्वाने ठरवलेला डाव आपण (मनुष्याने) उधळुन लावला, त्याचा पराभव केला ह्यात अश्या (भ्रामक) विश्वासाचा पाडाव होतो आणि अश्या अतार्कीक भितीवर आपण मात करतो, असा तर ह्या ओळींचा अर्थ होत नाहिये का?

    स्लार्टी मला आता ही कविता यत्नवाद/आशावादापेक्षाही अधिक मूलभूत काहितरी सांगणारी वाटत आहे.

    चूभूदेघे.

    त.टी. : साम्यवादी सोव्हिएत संघामध्ये माझी प्रोपगंडा मिनिस्ट्रीमध्ये उच्चपदावर नेमणूक झाली असती. Happy

    स्लार्टीचे रसग्रहण मला अधिक बरोबर वाटते आहे आता.

    मला slarty चे interpretation जास्ती अचूक वाटले.
    It is possible....
    It is possible....
    To witness.....

    ह्या ओळी तटस्थपणे लिहिलेल्या आहेत. "अमुक हे शक्य आहे" अशा स्वरुपामधे. पण त्या पाठोपाठ शेवटच्या दोन ओळी येतात त्या ह्या सर्व ओळींचा अर्थ बदलून टाकतात. "By surprising your destiny" मधे स्वत:चे परिश्रम अध्यार्हुत आहेत. "माणसाने नियतीवर विजय मिळवून घडवून आणला आहे" हा ढोबळ अर्थ पुढे येतोय.

    किती मार्मिक आणि रसग्राही प्रतिसाद आलेत. वा! माझ्याकडून अनुवादात काही अक्षम्य चुका झाल्या हे अगदी कबूल. मला ती कविता आवडण्याचे मुख्य कारण तीचा सकारात्मक भाव. तोच नेमका माझ्या अनुवादात हरवला, हे मला एकदम मान्य. आता थोडी दुरुस्ती:

    हरेक अनाम वास्तवाच्या
    देवडीवर
    कधी एखादे भय साण्डते
    किम्वा एखादा भ्रम मिटतो
    तसा एखादा चमत्कारसुद्धा
    घडवता येतो ..
    आपल्याच नियतीला चक्रावणरा.....
    -बेन ओकरी

    हे जरा जास्त बर?

    बापू करन्दिकर

    छान लिहीलंय सगळ्यांनीच. मी ही कविता वाचली तशीही मला आवडली पण तेव्हा मूळ कविता इथे पोस्ट केली नव्हती.
    मला वाटतं मूळ कविता वास्तवाच्या सामर्थ्याबद्दल आहे. CBDG