यावर्षीचा आमचा "स्वातंत्र्यदिन"

Submitted by जिप्सी on 16 August, 2012 - 13:59

गेल्या दोनवर्षाप्रमाणेच याही वर्षी आमच्या ऑफिसमध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्यदिन साजरा केला. पहिल्या वर्षी प्रत्येक टिमला एक एक राज्य दिले होते आणि त्या राज्याची संस्कृती सादर करावयाची होती. दुसर्‍या वर्षी प्रत्येक टिमला एक एक सण दिला होता आणि त्याचे सादरीकरण करावयाचे होते. यावर्षीही अशीच काही हटके थीम आम्ही घेतली होती आणि ती म्हणजे भारतातील ऐतिहासिक्/पुरातन वास्तु सादर करायची. यात आठ टिम होत्या आणि त्यातील एक एक टिमला ताजमहाल, लाल किला, सांची स्तूप, सुवर्णमंदिर, हावडा ब्रीज, महाराष्ट्रातील किल्ला, इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया अशी नावे आली होती. याच बरोबर स्वातंत्र्यपूर्व काळातील एक नाट्य सादर करावयाचे होते. सर्वच टिमने अत्यंत कमी वेळात (फक्त ३ दिवसात) हा सारा देखावा (रोजचे काम सांभाळुन) सादर केला. यातील सगळी कलाकुसर ऑफिस कामाच्या तासानंतर केली आहे. ताजमहालचे सगळे डिटेल्स त्या टिमने रेडिमेड न आणता स्वत: केल्या आहेत.माझ्या टिमने लाल किल्ला उभारला होता. Happy अशा तर्‍हेने गेल्या तीन वर्षाप्रमाणे यंदाही आमच्या ऑफिसात स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा झाला.

गेल्यावर्षीच्या फोटोंची लिंक इथे पहा. Happy

आमचा लाल किल्ला Happy
(यात थर्माकॉल विकत आणुन कटिंग करून ब्रशने रंगवला आहे. कुठेही स्प्रे पेंटिंग नाही. :-))
प्रचि ०१

प्रचि ०२
हावडा ब्रीज
(आईस्क्रीम स्टिकपासुन बनवलेला)
प्रचि ०३

प्रचि ०४
ताजमहाल
(सगळी कलाकृती टिम मेंबर्सनी हातानेच केली आहे.)
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
इंडिया गेट
प्रचि ०९

प्रचि १०
सांची स्तूप
प्रचि ११

प्रचि १२
गेटवे ऑफ इंडिया
प्रचि १३
सुवर्णमंदिर (अमृतसर)
प्रचि १४
किल्ला
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
लोकमान्य टिळक
प्रचि २१
झांशीची राणी
प्रचि २२
दांडी यात्रा
प्रचि २३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कस्काय मिसलं होतं मी?????

जिप्सी, कसले जबरदस्त हौशी लोकं आहेत तुझ्या हापिसात. अतिशय सुरेख कलाकृती सादर केल्यात आणि स्वातंत्र्यदिन खूपच छान साजरा केलायत. सह्ही क्रियेटिव्हिटी!!

ताजमहाल तर अप्रतिम!!! Happy (स्वारी हां, लाल किल्ल्यापेक्षा मला ताजमहाल आवडला म्हणून. Proud )

सही रे... हे सर्व फोटोज् पहायला आत्ता वेळ मिळाला...
ताजमहाल तुम्ही स्वतः बनवलात?
तुफान.

Pages