"एकाकी"

Submitted by -शाम on 16 August, 2012 - 13:36

प्रत्येकाच्याच नशिबात असतो हा प्रवास
मुक्कामाचं ठिकाण माहित असलेला....

लागत नाही वेळ श्वासाइतकाही
कोसळायला....

सावरत सावरत थरथरत असतो
आतून-आतून क्षणाक्षणाला...

सगळं जग खुजं दिसतं
इतकीच काय ती गंमत

गाफील प्रवासी या उंचीचं कौतुक करतात
पण हळहळतो कोण

कड्यावरल्या,
एकाकी धोंड्यासाठी...

...........................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

वाह भाऊ! तुझ्या प्रोजेक्टरपसून अजून आवडीने वाचतोरे तुझे लिखाण

लागत नाही वेळ श्वासाइतकाही
कोसळायला....>>>>>> ही उंची होती कवितेची. ह्यात आर्तताही आहे.

शुभेच्छा रे.