भरतनाट्यमचा ड्रेस्/साडी कुठे मिळेल?

Submitted by प्राजक्ता on 13 August, 2012 - 11:56

माझ्या मुलिच्या भरतनाट्यम रिसायटल साठी ड्रेस् घ्यायचा आहे, असा रेडिमेड ड्रेस पुण्यात कुठे मिळेल? आता भारतात येवु तेव्हा घ्यायचा विचार आहे.
असा ड्रेस शिवुन देणारी एखादा/एखादी टेलर महित असेल तरी अवश्य सांगा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे ड्रेस मिळतात. मी पॉझिटिव्हली उद्या माझ्या वहिनीचा संपर्क क्रमांक आपल्याला संपर्कातून पाठवेन. तिची मुलगी, म्हणजे माझी पुतणी, नृत्यांगना असून हे माझ्या वहिनीला माहीत आहे. Happy

प्राजक्ता, माझ्याकडे माझ्या मुलीचे ३ वेगवेगळ्या साईज मधले ड्रेस आहेत. सगळे पुण्यातूनच शिवून आणलेले आहेत. मी इथे अ‍ॅरीझोनात असते. संपर्कातून मेल करशील का ?

प्रजक्ता हे बघ:
http://www.dancecostumesandjewelry.com/indian-dance-dress-readymade/

त्यांच्याकडे custom made options पण आहेत. तू तुला हवा तो रंग/ काठ वैगरे चा रेफ. फोटो पण देउ शकतेस.
किंमती भारतात कदाचीत स्वस्त असतील पण कथ्थ्क ड्रेस - घागरा/ कोटी शिलाई २०००रुपये + आहे, भरतनाट्यम अजून जास्त असू शकेल

ऑनलाईन ऑप्शनने मागे ड्रेसेस शिवुन घेतला होता साधारण ८०-९० डॉ खर्च येतोच शिवाय मुल पटपट वाढतात त्यामूळे outgrow ही लवकर होतात..
देशात स्वस्त मिळेल म्हणून विचार चालला होता.

मी सहा महिन्यापूर्वी भारतवारीत पुण्याला शिवून घेतला होता. बर्‍यापैकी भारी साडीचा. शिलाई १५०० रुपये होती. पुण्यात जे कल्पना साडीचे प्रसिद्ध दुकान आहे त्यासमोर एक मार्केट आहे - बहुतेक महालक्ष्मी मार्केट नाव आहे. तिथे आतमधे टेलर आहे. त्याच्याकडे पुस्तकच आहे. कत्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी सगळे शिवतो.

माझ्या मुलीचा ड्रेस अतिशय सुरेख शिवला दिसायला पण पायात खूप घट्ट झाला. अगदी शेवटी घाईत पिक अप केल्याने भारतात घालून बघितला नाही. इथे आल्यावर वायाच गेल्यात जमा. तेव्हा माप एकदा घालून नीट आहे की नाही जरूर बघणे. माझी मुलगी एकदम बारीक आहे चणीने. तरीही खूप घट्ट झाला Sad

मधुरीमा!(म्हणजे आधिची सुमॉ ना!) टेलरचा नंबर आहे का ग तुझ्याकडे?
असेल तर मेल किंवा विपू करशिल का?