जिथे बुडालो तिथेच होता समोर माझ्या उभा किनारा!

Submitted by सतीश देवपूरकर on 4 August, 2012 - 05:57

गझल
जिथे बुडालो तिथेच होता समोर माझ्या उभा किनारा!
निमूट मीही, निमूट तोही, कुणीच केला नव्हे पुकारा!!

कुठे कुठे पेरले मला मी, मलाच ठाऊक ना स्वत:ला;
उद्या जरी मी नसेन, माझा असेल चोहीकडे पसारा!

न मेघ काळा नभात कोठे, न पावसाची कुठे निशाणी;
तरी कसे मोर नाचती हे? कशास ते दावती पिसारा?

असा कसा कैफ चालण्याचा? नसे तमा ठेच लागण्याची?
तरी बरे वाट देत होती क्षणाक्षणाला मला इशारा!

कळे न हा कोणता ऋतू जो असाच दारावरून गेला....
वसंत नाही तरी तरूंना मधेच आला कसा घुमारा?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<तरी बरे वाट देत होती क्षणाक्षणाला मला इशारा!>>
छान कल्पना!
आपल्या गझल छान असतात.

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,तुझेच मी गीत गात आहे, ह्या गाण्याच्या लयीत गा म्हणावं.

'वैभू' आता उंदरा- मांजराची, सावळ्या- कावळ्याची सोंगं बास झाली. जरा माणसात या.
मोहीनी पवारने मारलेली कमीच पडली वाटतं Lol

ऑर्फीचा सुधाकर होवू शकतो सुधाकरचा ऑर्फी

पण वैवकु नेहमी वैवकुच होता ,आहे अन् राहील !!
हे उंदीर - मांजर ,कावळा ,शेळी ही असली सोंगं मी कधी केली नाहीत

मोहीनी पवार चुकीच्या जागी मला भिडली .........(भारतीताईन्च्या कवितेवर) म्हणून मी आवरतं घेतलं ..तिला फोन नंबर दे म्हणालो मग बोलू तर ती गायब झाली ......मग मीही नाद सोडला

मोहीनी पवार चुकीच्या जागी मला भिडली .........(भारतीताईन्च्या कवितेवर) म्हणून मी आवरतं घेतलं ..तिला फोन नंबर दे म्हणालो मग बोलू तर ती गायब झाली ......मग मीही नाद सोडला

वैभ्या, तुला काय भिडायचं. एखाद्या मोठ्या गझलकाराच्या आश्रयाने वाढलेलं बांडगूळ तू. भारतीताईची कविता चुकीची जागा असते हेही म्हणून घेतलंस तेवढ्यात. तुला फोन नंबर द्यायला खुळ लागलंय बे? तुझं असेल प्रिपेड. हिम्मत संपली की बॅलन्स संपला

बादवे हे बघ मोहिनी ........तू माबोवर माझ्यापेक्ष जुनीयेय्स . तू लेखनही काही केलं नाहीयस . तुझा हा आयडी अ‍ॅड्मीन कृपेनं उद्या गंगेला मिळाला तर तुला काय फरक पडणारय मला सांग ?
माझ्याबाबतीत जर माझा हा आयडी उडवला गेला तर माझं लेखन सुद्धा जाईल जे मला परवडणार नाही आयडी काय मी नवीन कसाही नवीन तयार करीनच की गं ....

म्हणून मला माझं इथं माबोवर असणं जपावं लागतं...तुला काय भांडायचं ते फोनवर भांडूयाना आपण

माझा नंबर ९०२८५८८८४१ आहे कधीही फोन कर !!

माझ्याबाबतीत जर माझा हा आयडी उडवला गेला तर माझं लेखन सुद्धा जाईल जे मला परवडणार नाही

बाकीच्यांना परवडेल कुलकर्ण्या तुझे लेखन उडवले गेले तर. इतरांचा विचार करत जा. तुला फोन करू? लाजलज्जा नाही बे मला? काय ते इथे बोल. फसवा विठ्ठलभक्त

प्रोफेसराच्या गझलांनी उच्छाद मांडल्याने ही असली खनिज तेलं उगवली मायबोलीवर

वैभ्या, तुला राखी बांधली असती, पण तुला स्वतःच रक्षण नाही करता येत ते बहिणीच काय करणार

टाळ बडवत फिर सोलापूरात, लयीत बडव पण टाळ

इतर शेर लयीत म्हणता येत नाहीत.
<<<

सुधाकर Lol

=======================

कुठे कुठे पेरले मला मी, मलाच ठाऊक ना स्वत:ला;
उद्या जरी मी नसेन, माझा असेल चोहीकडे पसारा! << वा वा, सुंदर

असा कसा कैफ चालण्याचा? नसे तमा ठेच लागण्याची?
तरी बरे वाट देत होती क्षणाक्षणाला मला इशारा!<< छानच

कळे न हा कोणता ऋतू जो असाच दारावरून गेला....
वसंत नाही तरी तरूंना मधेच आला कसा घुमारा?<< मस्त

===============

न मेघ काळा नभात कोठे, न पावसाची कुठे निशाणी;
तरी कसे नाचती मोर हे? कशास ते दावती पिसारा?<<<

इथे हिरण्यकेशी भंगलंय प्रोफेसर साहेब

ज्ञानेशजी आपला सात्विक सन्ताप मी समजू शकतो
त्यामुळे माझे काही प्रतिसाद उडवत आहे

आपणास झालेल्या मनस्तापाबद्दल क्षमस्व

.............सेम टू यू ,प्रो. साहेब!!

धन्यवाद भूषणराव! चूक दुरुस्त केली आहे. कृपया पहाता का?
अवांतर:
परवा विमान वळताना आपण वेळ काढतो म्हणाला होता...........
वाट पहात आहे!
......प्रा.सतीश देवपूरकर

मोहिनी पवारजी!
आमच्यासारख्या पामरांच्या नावाचा उद्धार आपल्याकडून झाल्याचे पाहून धन्य झालो! मायबोलीवर उच्छाद कोणीही घालू शकतो हो! आपणही मोकळे आहात उच्छाद घालायला. पण गझलेतून/शेरातून घातलात, तर तो जास्त प्रेक्षणीय होईल!
आपण खनिज तेलेच काय, सोने,चांदी, काहीही उगवू शकता. कुणी अडवले तुम्हाला. पेरा तर आधी, मग काय उगवते पाहू!
........प्रा.सतीश देवपूरकर

सतीश देवपूरकर उगाच मोर नाचतात का? निसर्गात काय काय होते याची किमान माहिती आधी उपलब्ध करून घ्या. मोर म्हणजे वरातीतला मवाली नव्हे की रेकॉर्ड लागली की लागला पाय उडवायला. म्हणे असे कसे मोर नाचती हे. मोर नाचायला पाऊस पडावा लागतो हे माहीत आहे का?