कळेना..

Submitted by अमेलिया on 3 August, 2012 - 05:30

अजून ही तुझ्यामध्ये माझा, जीव का अडकतो कळेना
तुझे रंग घेऊन स्वप्नी, अजूनही का तुज स्मरते कळेना

मी अखंड झुरत्या क्षणांत तुझिया, तुला शोधूनी बघते
का तुझ्या भेटीचा ऋतू हवासा, न येई फिरुनी कळेना

आकाश तुझे अन तुझ्या चांदण्या, न माझे काही उरले
वाट तुझी-माझी सरली, अन गाव तुझा का सुटला कळेना

जरी मी जपले माझ्यात तुला, लपवूनी जगापासून
परी तुझ्यात ना मी उरले जराशी, का नाहीस जपले कळेना

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण, कसले मीटर अन काय... असे काहीही डोक्यात नव्हते आणि आताही विचार केला तर सांगू शकणार नाही. या बाबतीत मी खरंच ढ आहे.
ही भावना उतरवायची होती एवढेच.
स्वल्पविराम द्यायचा प्रयत्न केला आहे.
Happy