सई समोर तू

Submitted by भारती.. on 3 August, 2012 - 04:36

सई समोर तू..

मेघश्याम चेहरा उदयमोकळी नजर
मनी अथाह ओठावर स्मितसदाफुली बहर
सई समोर तू बघ हा क्षण दिगंत जाहला
पुनः अनंत वाटांतून परतुनी स्थिरावला

हा प्रहर उन्हातला प्रचंड या इमारती
माणसेच माणसे .. रहदारी वाहती
असेच इथून जायचे कुठूनसे कुठेतरी
खुळेच वागवीत भार देहावर,अंतरी

विसरू सारेच हेही -.पडू दे गतीचा विस्मर
मुक्तछंद भरकटूया रस्त्यांच्या ओळींवर
मनामध्ये कितीतरी सुडौल शब्द साठले
तुझ्याही वृत्ती सहकंपित स्नेहभार दाटले

प्रीत साहिली किती वंचनाही पाहिली
जन्माची झोळी बघ पूर्ण भरून वाहिली
वाहू दे तसेच नेत्र ओठी गीत येऊ दे
सांध्यरंग क्षितिजाचे अंतरंगी उतरू दे..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताई काव्य नेहमीइतकेच ओतप्रोत भरले आहे या रचनेत
कविता मस्त झालीय

वृत्त मुळात छान आहे
र्‍ह्स्व -दीर्घात योजलेले बदल काही ठिकाणी त्रुटी वाटतात
काही ठिकाणी हिंदी /उर्दू बहरांच्या शब्द उच्चारणशैलीचा वापर करावा लागतो

एकूणच लय अगदीच मुक्तछंदी नाही की अगदीच वृत्तबद्धही ;.. ही गोष्ट फार आवडली

मोहिनि पवार् = बाई(स्त्री), राहणार मुम्बाई(mumbai)
अजून यांनी काही लेखन केले नाही

टीपः वरील द्विपदीस कंस सोडून वाचल्यास लयीत वाचता येते

मोहिनीदेवी आपल्या अवलोकनावरून आपल्याबद्दल मिळालेली माहिती आहे ही
इतकी उपयुक्त महिती तिथे नोन्दवून ठेवल्याबद्दल धन्यवाद !!

कण्णी काप>>>>>>>>>...भषा सोलापुर्री वाटते !!

भारतीताई : मोहिनीच्या अचकट-विचकट प्रतिसादामुळे मी भरकटत गेलो
त्यामुळे तुम्हाला व इतर वाचक /प्रतिसादकाना मनस्ताप झाला असेल तर क्षमस्व !!

आपला नम्र
वैवकु

सुंदर आहे. मला आवडली कविता.
अंगभूत लय छान वाटतेय.. गुणगुणत वाचता येतेय. शब्दयोजना देखील सुरेख !!
मैत्रिणींचं भेटणं.. भरकटणं छानच उतरलंय कि !

आभार वैभव,शशांकजी,किरण.. माझी ही आवडती रचना,मैत्रीण नावाच्या महान प्रेम-ऊर्जा-स्त्रोतासाठी लिहिलेली/अनुभवलेली.. इथे एक वेगळीच मैत्रीण अवतरलेली दिसतेय..स्त्रीच्या मुखवट्याआडून लढणारं, बडबडणारं कुणी..

पहिल्या दोन ओळी नीटशा समजल्या नाहीत... उदयमोकळी नजर आणि मनी अथाह....हे शब्दच कळले नाहीत
बाकी कविता चांगली जमलेय.

खूप धन्स बेफिकीर, आणि हो तुमची अनुपस्थिती अल्पकाळाचीच आहे असे मानते.

आभार प्रमोदजी!

मेघश्याम चेहरा उदयमोकळी नजर
मनी अथाह ओठावर स्मितसदाफुली बहर
सई समोर तू बघ हा क्षण दिगंत जाहला
पुनः अनंत वाटांतून परतुनी स्थिरावला

.ही माझी सई,..तिच्या मेघासारख्या सावळ्या चेहर्‍याला उजळणारे तिच्याच निर्मळप्रेमळ नजरेचे उजळ प्रभातकिरण.. तिचं मन किती तल्लख, विशाल, अथांग..पण ही सखोलता लपवणारं एक सदाफुलीसारखं बहरलेलं साधंसोपं हसू ओठांवर.

अशी मनस्वी तेजस्वी तू समोर येतेस तेव्हा जगण्याचा तो क्षण माझ्यासाठी ब्रम्हांडाएवढा मोठा होतो,पुनः परतून त्याच्या अनंत शक्यतांसह माझ्या चिमटीत सामावतो..

तुझ्याबरोबर असताना माझे अस्तित्वभान असे विस्तारत,समृद्ध होत जाते ..सईबाई, किती श्रीमंत केले आहेस मला!!

तू अशीच भेटत रहा,या प्रचंड शहरात प्रयोजनशून्य वाटणार्‍या दैनंदिन जीवनाला स्नेहाचा,आनंदाचा ठेवा गवसू दे.

मैत्रिणींचं प्रेम..थोडं मिरवावंसं वाटलं.. आहेतच त्या तशा.

विसरू सारेच हेही -.पडू दे गतीचा विस्मर
मुक्तछंद भरकटूया रस्त्यांच्या ओळींवर
मनामध्ये कितीतरी सुडौल शब्द साठले>>>

सुरेख! आवडली...!

आभार के.अंजली,लाजो, हा अनुभव तुम्ही घेतला असणार..
आभार बागुलबुवा स्पष्ट मतासाठी..असो.,हा अनुभव माझ्यासाठी खूप खरा आहे.कुणाला कृत्रिमही वाटू शकतो. अन भाषाभिव्यक्ती..त्वचेसारखी.तिला पर्याय नसतो.
वैभव,तुमचं पहिलं निरीक्षण बरोबर होतं.छंदोबद्ध अन मुक्तच्छंद यांच्या मधली एक जागा explore
करायला मला खूप आवडतं.

वैभव,तुमचं पहिलं निरीक्षण बरोबर होतं.>>>>>>>>

धन्यवाद भारतीताई
_________________________

अवांतर : तुम्ही मला जे काम, काल फोनवरून करायला सांगितलं होतं ते मी आज केलंय ताई !!

Pages